Posts

Showing posts from June, 2022

शासकीय दाखला घेण्यासाठी ई केंद्र सुविधा

Image
शासकीय दाखला घेण्यासाठी ई केंद्र सुविधा दहावी-बारावीचे नुकतेच निकाल लागले आहेत. निकालानंतर पुढील शैक्षणिक कामांसाठी लागणाऱ्या दाखल्यांकरिता विद्यार्थी व पालकांची लगबग सुरु झाली आहे. तहसिल कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये, सेतू केंद्र, आपले सरकार पोर्टलकेंद्र अशा ठिकाणच्या वाऱ्या पालकांना सतत कराव्या लागतात. एप्रिल ते जुलैअखरे डोमिसाईल, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर व रहिवासी, आदी स्वरूपाचे विविध दाखल्यांसाठी पालक आणि विद्यार्थ्यांच्या फेऱ्या चालू राहतात. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या दाखल्यांसाठीही शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागतात. अशावेळी दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये त्रूटी आढळल्यातर पुन्हा फेऱ्या वाढतात. यामुळे वेळेसोबत विनाकारण आर्थिक नुकसानही होते. पालक आणि विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, त्यांची दलांलामार्फत फसवणूक होऊ नये यासाठी शासनाने ई-सेवा केंद्र, आपले सरकार, सेतु यासारख्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. या सेवांमुळे शासकीय दाखले मिळणे सोपे झाले आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी शासनाने विविध सेवा उपलब्ध करु...

कृषी विद्यार्थ्यांचे डाळ गिरणीचे मार्गदर्शन शिबीर संपन्न

Image
  कृषी विद्यार्थ्यांचे डाळ गिरणीचे मार्गदर्शन शिबीर संपन्न   पातूर : (युगनायक न्यूज नेटवर्क ) डॉ . पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय शिर्ला ( अंधारे ) येथील विद्यार्थी तौसिफ शेख, राज शिरसाट यांनी ग्रामीण कृषी व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत खानापूर (पातूर) येथील श्री गजानन ऍग्रो डाळ गिरणी येथे नुकतीच भेट देऊन मार्गदर्शन केले . तेथील कामकाज आणि कार्यप्रणाली, कामगार कशाप्रकारे काम करतात व तेथील कर्मचारी कशाप्रकारे मशीन चालवतात हे त्यांनी जाणून घेतले . उपस्थित कामगार आणि मालक यांच्याशी संवाद साधला . शेतीसोबत जोडधंदा सुरू करून कामगार सक्षम होतील , असे मत कृषी विद्यार्थी तौसिफ शेख यांनी यावेळी व्यक्त केले . महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . आर.पी. खरडे , कार्यक्रम समन्वयक प्रा . एस . टी . कव्हर , कार्यक्रम अधिकारी प्रा . पी.ए. देशमुख व विषय तज्ज्ञ प्रा . एस . ए . खवणे यांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले .

शासकीय रक्तकेंद्र , जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे ‘ रक्तदाता दिवस ‘’ उत्साहात साजरा

Image
  शासकीय रक्तकेंद्र , जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे ‘ रक्तदाता दिवस ‘’ उत्साहात साजरा  वाशिम : (युगनायक न्यूज नेटवर्क ) वाशिम  येथे  जिल्हा  सामान्य रुग्णालयातील ‘ शासकीय सक्तकेंद्र ‘ येथे आज 14 /06/2022 रोजी जागतिक रक्तदाता दिवस  साजरा करण्यात आला . या कार्यक्रमासाठी  जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ व्ही टी  काळबांडे , अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सी के यादव , बालरोगतज्ञ बी एस थोरात , त्रिरोगतज्ञ डॉ शैख ,  संत निरंकरी मिशन चे अध्यक्ष एम अंभोरे , ऊयाशीम   रक्त केंद्र प्रमुख डॉ पी एम मोरे व रक्त संक्रमण अधिकारी डॉ हरीदास मुंडे हे  उपस्थित  होते . या कार्यक्रमात  कार्ल लांड्स्टीनर ( Father of Transfusion Medicine) यांच्या प्रतिमेला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यत आली .   या  कार्यक्रमामध्ये वाशिम जिल्ह्यातील सर्व रक्तदान शिबीर आयोजकांचा प्रमाणपत्र  व सन्मान चिन्ह देऊन शासकीय रक्त केंद्र मार्फत सत्कार करण्यात आला. रक्त केंद्र प्रमुख डॉ पी एम मोरे यांनी सर्व  उपस्थिताना रक्त दान करण्य...

धनगर समाज युवा मल्हार सेना वाशिम जिल्हाध्यक्ष पदी मा. मदनभाऊ तिरके यांची निवड

Image
  धनगर समाज युवा मल्हार सेना वाशिम जिल्हाध्यक्ष पदी मा. मदनभाऊ तिरके यांची निवड  रिसोड (युगनायक न्यूज नेटवर्क ) मा. ‌मदन भाऊ तिरके यांची धनगर समाज युवा मल्हार सेना वाशिम जिल्हाध्यक्ष पदी निवड  करण्यात आली संस्थापक अध्यक्ष मनोज श्रीराम सर, राज्यसचिव ज्ञानेश्वर मुखमाले यांच्या आदेशावरून नियुक्ती करण्यात आली, संघटनेने त्यांच्यावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा समाजकार्य करण्याची संधी दिली ,व सत्कार करण्यात आला, सत्कार करते एकनाथ भाऊ कष्टे विदर्भ कार्याध्यक्ष, भगवान हुले जिल्हा सचिव, पांडुरंग नव्हाळे युवक तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर तिरके वाकद सर्कल अध्यक्ष , अजय चवरे शहराध्यक्ष रिसोड, दशरथ भाऊ कष्टे नितीन भाऊ बोडके त्याबद्दल मनःपुर्वक अभिनंदन  व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा  शुभेच्छुक: धनगर समाज युवा मल्हार सेना वाशिम जिल्हा 

अक्षर साधना साहित्य संघाच्या वतीने प्रा.डॉ. सुभाष राऊत यांचा सहृदय सत्कार

Image
  अक्षर साधना साहित्य संघाच्या वतीने प्रा.डॉ. सुभाष राऊत यांचा सहृदय सत्कार   चिखली :(युगनायक न्यूज नेटवर्क ) दि. 10 जून  2022   बुलढाणा जिल्ह्यातील   सर्वपरिचीत प्रा.डॉ.  सुभाष राऊत सर यांची संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठा तर्फे इंग्रजी विषयाचे  Ph.D.Guide  पदी नियुक्ती झाल्याबद्दल फुले, शाहू, आंबेडकरी चळवळ आणि शैक्षणीक क्षेत्रासाठी भूषणावह असणाऱ्या या कार्याचा कौतुक सोहळा अक्षर साधना साहित्य संघाचे अध्यक्ष प्रा‌. बी‌.ए.खरात सर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 10 जून 2022 ला प्रा. डॉ. सुभाष राऊत सर यांचे निवासस्थानी संपन्न झाला. मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे  पूजन करून, प्रा. साबळे सर व प्रा. बी.ए.खरात सर यांनी प्राध्यापक डॉ. सुभाष राऊत यांना शाल  व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.  प्रा. बी.ए. खरात  यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्राध्यापक डॉ.सुभाष राऊत यांना शुभेच्छा देऊन सरांचे कौतुक केले. या छोटेखानी सहृदय सत्कार सोहळ्यात प्रा. साबळे , प्रा .डोंगरदिवे  प्रा.संजय  निकाळजे यां...

जागतिक रक्तदान दिनानिमित्त ( 14 जुन ) शासकीय रक्तकेंद्र तर्फे जनतेस आवाहन

Image
जागतिक रक्तदान दिनानिमित्त  ( 14 जुन )  शासकीय रक्तकेंद्र तर्फे जनतेस आवाहन l       वाशिम . (युगनायक न्यूज नेटवर्क ) शासकीय रक्त केंद्र जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम तर्फे संपूर्ण वाशिम जिल्ह्यातील सरकारी व  खाजगी रुग्णालयांना मोफत  रक्तपुरवठा केला जातो . आपल्या शासकीय रक्त केंद्राचे वार्षिक रक्त संकलन  केवळ 2500-3000  एवढेच आहे . या  रक्त केंद्रामार्फत  वाशिम जिल्ह्यातील सर्व  sickle cell , thallasemia ग्रस्त मुले , गरोदर माता/भगिनी , Anemia ग्रस्त रुग्ण व Accident  झालेल्या रुग्णांना मोफत ( Donor card वर)  रक्त पुरवठा करण्यात येतो त्यामुळे प्रत्येक दिवसाला  20-25 रक्त पिशव्यांची मागणी शासकीय रक्तपेढीला येते .           परंतु जिल्ह्याकरिता स्वतंत्र शासकीय रक्तकेंद्राची स्थापना होऊन देखील गेल्या १२  वर्षापासून  पुरेश्या प्रमाणात ऐच्छिक  रक्तदात्याकडून   रक्त संकलन  होत नाही.त्यामुळे जास्तीत जास्त तरुण (१८ ते ५५ वर्षं) वयोगटातील व्यक्तींनी स्वइच्छेने रक्...

कल्पेश अंभोरे यांच्या वाढदिवसा निमित्त रिठद येथे विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

Image
  कल्पेश अंभोरे यांच्या वाढदिवसा निमित्त रिठद येथे विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न रिसोड . (युगनायक न्यूज नेटवर्क ) दि. १०जुन रोजी रिठद येथील  आंबेडकरी चाळवळीतील युवा नेतृत्व कल्पेश अंभोरे यांच्या वाढदिवसा निमित्त युग गुरु बहु. शिक्षण संस्था, रिठद च्या वतीने  रिठद येथे विविध ठिकाणी  वृक्षारोपण करून  कल्पेश कोंडूजी अंभोरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेच्या वतीने वृक्षारोपण करिता  भारतीय रोपट्याचा पुरवठा केला त्यात प्रामुख्याने पिंपळ , वड, कडुलिंब, बेल, उंबर, आणि बदाम या रोपट्याचा समावेश आहे  या वृक्षारोपण करिता  दैनिक संवाद युगनायकांचा  या वृत्तपत्राचे मुख्यसंपादक  ऍड. भारत गवळी (अध्यक्ष.-युग गुरु बहु. शिक्षण संस्था, रिठद ), उपसंपादक, सुरेश अंभोरे, उपस्थित होते. वृक्षारोपण संदर्भात कल्पेश अंभोरे यांनी  मनोगत व्यक्त करतांना वृक्ष हे मानव उत्क्रांती अगोदर निर्माण झालेली पहिली सजीव गोष्ट आहे. जी काळानुसार लोप पावत असुन त्याचा परिणाम आज  मानव प्रजातीवर  पडताना दिसुन येतो. याला कारण हा फक्त आणि फक्त माणू...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण -राष्ट्रीय हरित सेना एस एम सी इंग्लिश वाशीमच्या चिमुकल्यांचा उपक्रम

Image
  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण -राष्ट्रीय हरित सेना एस एम सी इंग्लिश वाशीमच्या चिमुकल्यांचा उपक्रम      वाशीम : (युगनायक न्यूज नेटवर्क ) प्रदूषणाचा  भस्मासुर  पृथ्वीला गिळू पाहत आहे  .प्रदूषणाच्या समस्येने सर्वत्र उग्र रूप धारण केलेले असून पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक झाले आहे. या संबंधी समाजाला जागृत करण्यासाठी व समाजामध्ये वृक्षारोपण व संवर्धनासाठी जनजागृती करण्यासाठी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो  .या दिनाचे औचित्य साधून स्थानिक एस एम सी इंग्लिश स्कूल वाशिम येथे निसर्ग इको क्लब च्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्य मीना उबगडे होत्या  त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व त्यांनी यावेळी पर्यावरणाच्या व समाजाच्या दृष्टीने वृक्षारोपण व संवर्धन कसे महत्त्वाचे आहे याचे महत्त्व विद्यार्थ्यांना  समजावून सांगितले .  कार्यक्रमाचे आयोजन व संचलन राष्ट्रीय हरितसेनेचे समन्वयक अभिजीत मुकुंदराव जोशी यांनी केले  .वृक्षार...

वाशीम येथे प्रा. डॉ. शरण खानापुरे यांची विभागीय कार्यशाळा.

Image
  वाशीम येथे प्रा. डॉ. शरण खानापुरे यांची विभागीय कार्यशाळा.   वाशीम (युगनायक न्यूज नेटवर्क ) : वाशीम येथे दि.5 जून 2022 ला अग्रसेन भवन, अग्रसेन चोक, जुनी नगर परिषद, वाशीम येथे महाराष्ट्र राज्यातील कोळी महादेव, टोकरे कोळी, मल्हार कोळी, डोंगरे कोळी, ढोर कोळी, यांना 70 वर्षा पासून संविधानिक अधिकारा पासून जाणून बुजून वंचीत ठेवणाऱ्या सर्व पडताळणी समित्या, प्रांत अधिकारीआदिवासी मंत्री, आमदार, खासदार. केंद्र सरकार कडून महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्रतील लोकसंखेच्या आधारे आदिवासी लोकसंख्या ही 9% आहे त्या पैकी अनुसूचित क्षेत्रामध्ये 4% च्या लोकसंख्येवर 11 आमदार आणी 2  खासदार यांचे राखीव मतदार संघ असतात/निवडून येतात,आणी उर्वरित विस्तारित क्षेत्रातील मधील 5% लोकसंखेच्या आधारे 15 आमदार आणी 2खासदार यांच्यासाठी मतदार संघ राखीव असतात,विस्तारित क्षेत्रातील मधील आदिवासी यांची ची लोकसंख्या दाखवून, ज्यांच्या नावाने हजारो करोड रुपये निधी उचल्ल्या जातो,आणी 15आमदार 2 खासदार, निवडून येतात,त्या कोळी जमातीला साधे जात प्रमाणपत्र, व वेधता प्रमाणपत्र सुद्धा दिले जात नाही. ई. स.1871पासून आज अखेर पर्यं...

जिल्ह्यातील ३५ युवतींकरीता उद्योजकता विकास अंतर्गत महिला टेलरिंग चे मोफत प्रशिक्षण

Image
  जिल्ह्यातील ३५ युवतींकरीता उद्योजकता विकास अंतर्गत महिला टेलरिंग चे मोफत प्रशिक्षण नांदेड : (युगनायक न्यूज नेटवर्क ) येथे कार्यरत असलेल्या भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI), नांदेड येथे दिनांक ०१.०६.२०२२ पासून ३०.०६.२०२२ या कालावधीत ३० दिवसीय 'महिला टेलर' प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणाचा उदघाटन कार्यक्रम गजानन पातेवार, जिल्हा अभियान व्यवस्थापक, उमेद अभियान नांदेड तसेच राम भलावी, संचालक, भारतीय स्टेट बँक आरसेटी नांदेड, अतिष गायकवाड, कौशल्य समन्वयक, पंचायत समिती नांदेड, प्रियंका चव्हाण, कौशल्य समन्वयक, पंचायत समिती, हदगाव, हिमायतनगर, बालाजी गिरी, कौशल्य समन्वयक, पंचायत समिती मुखेड, देगलूर, आशिष राऊत, फॅकल्टी, भारतीय स्टेट बँक आरसेटी, नांदेड, विश्वास हट्टेकर, फॅकल्टी, आरसेटी नांदेड तसेच ३५ प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून पार पडला, या प्रशिक्षणाचा नांदेड जिल्ह्यातील ग्रामिण भागातील १८ ते ४५ वयोगटातील ३५ युवती लाभ घेत असून सदर प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना उद्योजकता विकास आणि कौशल्य विकास...

महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा वाशिम च्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी जिल्हा वाशिम चा पाठिंबा

Image
  महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा वाशिम च्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी जिल्हा वाशिम चा पाठिंबा वाशीम . (युगनायाक न्यूज नेटवर्क ) गत सहा दिवसापासून सर्व महाराष्ट्रभर परिचारिका संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी सामान्य रुग्णालयासमोर आंदोलन सुरू आहे.अद्याप पर्यंत शासनाने याची साधी दखल सुद्धा घेतली  नाही.यापूर्वी सुद्धा आंदोलना दरम्यान आरोग्यमंत्री मा. राजेशजी टोपे साहेबांनी मागण्या पूर्ण करण्यासंबंधी लेखी आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता न झाल्याने वंचित बहुजन आघाडी वाशिम च्या वतीने प्रदेश सदस्य सौ. किरणताई गि-हे ,जिल्हा महासचिव सोनाजी इंगळे तथा तालुका उपाध्यक्ष विष्णू सरकटे व अनेक पदाधिकाऱ्यांनी  आंदोलना ला भेट दिली .व पक्षाच्या वतीने खंबीर पाठिंबा जाहीर केला .आंदोलन कर्त्यांसोबत सखोल चर्चा केली .यात पदोन्नती,पदनिर्मिती, पदभरती कायमस्वरूपी करण्यात यावी,महागाई भत्ता केंद्रप्रमाणे द्यावा,गणवेश भत्ता द्यावा.वयक्तिक व सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी पदनामात बदल करावा.केंद्राप्रमाणे वेतनवाढी द्याव्या.अर्जित रजा 300 पेक्षा जास्त झाल्यास त्या रद्द न करता पुन्हा उपभोगण्याची...

वाकद येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९७ जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Image
  वाकद येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९७ जयंती मोठ्या उत्साहात साजरी रिसोड (प्रतिनिधी - युगनायक न्यूज नेटवर्क ) पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९७ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली व पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. व जयंतीनिमित्त  रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले .त्यावेळी समाज बांधव व गावकरी मंडळींनी मोठ्या संख्येने रक्तदान दिले उत्साहात कार्यक्रम पार पडला, त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य अमित पाटिल खडसे, पं.स.सभापती बंडु भाऊ हाडे,ध.स.युवा मल्हार सेना वाशिम जिल्हाध्यक्ष एकनाथ कष्टे , टायगर ग्रुप रिसोड तालुकाध्यक्ष अक्षय भाऊ कराळे, राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हाध्यक्ष तथा माजी उपसरपंच मा दिपक भाऊ तिरके, जगु भाऊ तिरके, बालाजी तिरके (तलाठी) मदन भाऊ तिरके रिसोड तालुका अध्यक्ष ध.स.युवा मल्हार सेना, अशोक तिरके, बालाजी श्रीराम तिरके,धोंडु इंगळे, उध्दव प्रल्हाद बैडवाले ग्रामपंचायत सदस्य नव्हाळे,ज्ञानेश्वर तिरके सर्कल अध्यक्ष, ज्ञानेश्वर बोरकर,राजु तिरके, महादेव तिरके, गजानन तिरके,विशाल तिरके, कैलास तिरके, अनिल तिरके, किशोर तिरके, विठ्ठल तिरके, विशाल...