शरद देशमुख यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा सन्मान पुरस्कार
शरद देशमुख यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा सन्मान पुरस्कार जउळका रेल्वे प्रतिनिधी महाराष्ट्र शिक्षक पॅनल ( Msp) तर्फे श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाशिम येथील तंत्रस्नेही उपक्रमशील शिक्षक श्री शरद दत्तराव देशमुख यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवासन्मान पुरस्कार 2022 प्रदान करण्यात आला श्री शरद देशमुख यांनी ज्ञानयात्री तंत्रस्नेही शैक्षणिक स्थळाची निर्मिती करून त्याद्वारे विविध व नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी सातत्याने दररोज न चुकता राबवले यामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम दररोज विविध प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून वर्षभर राबवत आहे. तसेच गाथा बलिदानाची, शिकु आनंदे, गोष्टीचा शनिवार, विज्ञानाचा गुरुवार दिनविशेष चाचणी व्हाट्सअप स्वाध्याय ई लायब्ररी थँक्स फॉर टीचर या व अशा अनेक उपक्रमाद्वारे शैक्षणिक स्थळ अद्यावत ठेवून याद्वारे लाखो शिक्षक विद्यार्थी व पालकांपर्यंत घराघरात पोहोचले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगी...