Posts

Showing posts from January, 2021

नारी शक्ती पुरस्कारासाठी ३१ जानेवारीपर्यंत प्रस्ताव आमंत्रित

Image
  नारी शक्ती पुरस्कारासाठी ३१ जानेवारीपर्यंत प्रस्ताव आमंत्रित वाशिम ,  दि. २८ :  केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या नारी शक्ती पुरस्काराकरिता प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले आहेत. व्यक्ती अथवा संस्थेला ३१ जानेवारी २०२१ पर्यंत  www.narishaktipuraskar.wcd. gov.in  किंवा  www.wcd.nic.in  या संकेतस्थळावर आपले प्रस्ताव ऑनलाईन स्वरुपात सादर करता येतील.   प्रस्ताव केवळ ऑनलाईन स्वरूपातच स्वीकारले जाणार आहेत.   ३१ जानेवारी नंतर आलेल्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही. वैयक्तिक पुरस्काराकरिता अर्जदाराचे वय हे पुरस्कार वर्षाच्या १ नोव्हेंबर रोजी २५ वर्षे पूर्ण असावे. अर्जदार संस्था असेल तर संबंधित क्षेत्रात किमान ५ वर्षांचा कार्यरत असावी. अर्जदाराने हा पुरस्कार किंवा स्त्री शक्ती पुरस्कार या पूर्वी प्राप्त केलेला नसावा. दरवर्षी २० फेब्रुवारी रोजी सदर पुरस्कार प्राप्तकर्त्यांच्या नावाची घोषणा करण्यात येवून ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनी पुरस्कार प्रदान करण्यात येतो. याबाबतची सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या पुरस्क...

कवठा येथील महिलांच्या सोलर एनर्जी कंपनीचा शुभारंभ

Image
महाराष्ट्राला भूषणावह ठरेल अशी यशोगाथा निर्माण केली – पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार कवठा येथील महिलांच्या सोलर एनर्जी कंपनीचा शुभारंभ मागासवर्गीय महिलांनी उभारलेला राज्यातील पहिलाच प्रकल्प वर्धा, दि 26 (जिमाका):- सावित्रीबाई फुलेंनी मुलींच्या शिक्षणासाठी लढा दिला, त्यावेळी त्यांच्यावर चिखल आणि दगडांचा मारा झाला होता. त्यांनी झेललेल्या संकटापेक्षा तुम्ही केलेले कष्ट कमी असले तरी सावित्रीबाई फुले यांच्याकडून प्रेरणा घेऊन तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन त्यांचेच स्वप्न साकार करीत आहात. ग्रामीण भागातील महिलांनी निर्माण केलेली वेगळ्या प्रकारच्या उद्योगाची ही यशोगाथा संपूर्ण महाराष्ट्रासाठी भूषणावह आहे ,असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल केदार यांनी केले वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील कवठा झोपडी या गावात मागासवर्गीय महिलांनी तेजस्वी सोलर एनर्जी को-ऑपरेटिव्ह संस्था निर्माण करून या माध्यमातून सोलर पॅनल निर्मितीचा उद्योग उभारला आहे. आज याचा शुभारंभ पालकमंत्री यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोल...

वाशिम जिल्ह्यातील सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

Image
  वाशिम जिल्ह्यातील सरपंच पदाच्या  आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर वाशिम ,   दि. २५ (युगनायक न्युज नेटवर्क) :   जिल्ह्यातील सन २०२०-२०२५ दरम्यान सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार संबंधित तालुकास्तरावर २ फेब्रुवारी २०२१ रोजी आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. महिला आरक्षण सोडतीसाठी ४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आरक्षण सोडत होणार आहे. तरी इच्छुकांनी सदर सोडतीस उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजा चा वापर टाळा- युग गुरु शिक्षण संस्थेचे जनतेला आवाहन

Image
प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजा चा वापर टाळा- युग गुरु शिक्षण संस्थेचे जनतेला आवाहन   -अध्यक्ष-अॅड.भारत गवळी रिसोड:-दिनांक २४/१/२०२१(भारत कांबळे) वाशिम जिल्ह्यातील सर्व जनतेला युग गुरु बहु. शिक्षण संस्था रिठद तालुका रिसोड च्या वतीने जाहीर आवाहन करण्यात येते की, आपल्या सभोवताली जर जमिनीवर, कचऱ्यात आपला राष्ट्रीय ध्वज टाकु नये याची काळजी घ्यावी तसेच कुठल्याही ठिकाणी जर आपला राष्ट्रीय ध्वज पडलेला दिसल्यास त्याला त्वरीत उचलावे आणि आपल्या ध्वजाचा अपमान होऊ देऊ नये, घरातील लहान मुले जर प्लास्टिक किंवा कागदी राष्ट्रीय ध्वजाची मागणी करत असतील तर त्यांना त्यांना प्लास्टिक व कागदी राष्ट्रीय ध्वज देऊ नये  कारण त्यांना त्यांच्या कडून ध्वजाचा अपमान होऊ शकतो तसेच जनतेने २६ जानेवारीला आपण जिथे असाल त्या ठिकाणी जर आपल्या कानावर राष्ट्रीय गीत आल्यास तिथेच असाल त्या परिस्थितीत सावधान स्थितीत उभे राहून राष्ट्रीय गीताचा सन्मान करा. असे  आवाहन संस्थेच्या वतीने युग गुरु शिक्षण संस्थेचे -अॅड.भारत गवळी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले.

स्वयंरोजगार स्थापना आणि प्रगती करिता आरसेटी प्रशिक्षण व आर्थिक साक्षरता महत्वपूर्ण.

Image
स्वयंरोजगार स्थापना आणि प्रगती करिता आरसेटी प्रशिक्षण व आर्थिक साक्षरता महत्वपूर्ण. भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था, नांदेड द्वारा ग्रामीण भागातील बेरोजगार व्यक्तींकरिता स्वयं रोजगार आणि कौशल्य विकास अंतर्गत दिनांक 21 जानेवारी पासून आयोजित दहा  दुग्ध व्यवसाय आणि गांढुळ खत निर्मिती प्रशिक्षणाचे अर्धापुर तालुक्यातील ग्राम पाटनूर येथे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणा मध्ये दुग्ध व्यवसाय संबंधी तसेच वैक्तिमत्व विकास आणि उद्योजकता विकासाचे, कार्यप्रेरणा, आर्थिक साक्षरता इत्यादींचे सविस्तर प्रशिक्षण देण्यात येणार असून, विविध कार्यक्रम, खेळ आणि क्षेत्र भेटी द्वारा त्यांच्या मध्ये प्रेरणा निर्माण करण्यात येत असते. सदर प्रशिक्षण कार्यक्रम भारतीय स्टेट बँक आरसेटी मार्फत आयोजित केला असून प्रशिक्षण कालावधी मध्ये प्रशिक्षणार्थ्यांची जेवणाची सुद्धा व्यवस्था मोफत करण्यात आली आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन दिव्यांग व्यक्तींच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आले, उदघाटन समारंभाला ऋषिकेश कोंडेकर, संसाधन व्यक्ती-सेबी, कुसुमताई बाळकृष्ण काळे, काशीबाई संभाजी काळे, आ...

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ‘संयुक्त पदवी स्तर परीक्षा २०२०’ अंतर्गत विविध पदांची भरती

Image
  स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ‘संयुक्त पदवी स्तर परीक्षा २०२०’ अंतर्गत विविध पदांची भरती परीक्षेचे नाव :  स्टाफ सिलेक्शन कमिशन संयुक्त पदवी स्तर परीक्षा २०२० एकूण जागा :  ६५०६ पदाचे नाव : गट ब १. सहायक लेखापरीक्षण अधिकारी (असिस्टंट ऑडिट ऑफिसर) २. सहायक लेखा अधिकारी (असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर) ३. सहायक कक्ष अधिकारी (असिस्टंट सेक्शन ऑफिसर) ४. सहायक (असिस्टंट) ६. आयकर निरीक्षक ७. निरीक्षक ८. सहायक सक्तवसुली अधिकारी (असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर) ९. उपनिरीक्षक (सब इंस्पेक्टर) १०. सहायक/ अधीक्षक (असिस्टंट/ सुपरिंटेंडेंट) ११. विभागीय लेखापाल (डिविजनल अकाउंटंट) १२. उपनिरीक्षक (सब इन्स्पेक्टर) १३. कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी गट क १४. लेखा परीक्षक (ऑडिटर) १५. लेखापाल (अकाउंटेंट) १६. कनिष्ठ लेखापाल (ज्युनियर अकाउंटंट) १७. वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक १८. कर सहाय्यक १९. उपनिरीक्षक (सब इन्स्पेक्टर) शैक्षणिक पात्रता :  कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी : पदवी व बारावीत गणितामध्ये किमान ६०% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी. उर्वरित पदे : कोणत्याही शाखेतील पदवी. परीक्षा शुल्क...

संवैधानिक बाबींवर केंद्राने सकारात्मक बाजू मांडावी – मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची मागणी

Image
  मराठा आरक्षणातील संवैधानिक बाबींवर केंद्राने सकारात्मक बाजू मांडावी – मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची मागणी मुख्यमंत्री लिहिणार पंतप्रधानांना पत्र, राज्यातील खासदारही भेटीस जाणार सर्व पक्षीय   नेत्यांना सहकार्याचे आवाहन मुंबई, दि. ८ :  मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर करण्यासाठी इंद्रा साहनी प्रकरणाच्या निवाड्यातील ५० टक्क्यांची मर्यादा आणि १०२ व्या घटनादुरूस्तीचा राज्य सरकारांच्या अधिकारांवरील परिणाम आदी संवैधानिक व न्यायालयीन बाबींवर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सकारात्मक पद्धतीने बाजू मांडावी, असे आवाहन मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे. मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना श्री.चव्हाण बोलत होते. सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) आरक्षणाच्या खटल्यातील संवैधानिक पेच केंद्र सरकारच्या पातळीवरच सोडवले जाऊ शकतात. त्यामुळे केंद्र सरकारने यासंदर्भात स्पष्ट भूमिका घेणे आवश्यक असून, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच पंतप्रधानांना पत्र ...

बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवू नका

Image
बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवू नका अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांचे आवाहन   मुंबई, दि. ९ :  राज्यात बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यात येऊ नयेत. काही समस्या असेल तर पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १८००२३३०४१८ वर त्वरित संपर्क करुन त्याची माहिती द्यावी, असे आवाहन पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी जनतेस केले आहे. श्री.केदार म्हणाले, मुंबई येथे ३ कावळे, ठाणे येथे १५ बगळे (इंग्रेटस) व २ पोपट या पक्षांचे तसेच परभणी येथे एका कुक्कुटपालन फार्ममधील ८०० पक्षांचे, दापोली येथे ६ कावळे व बीड येथे ११ कावळ्यांचे मृत्यू झाल्याचे आढळून आल्याने त्यांचे नमुने तपासण्यांचे काम सुरू आहे. तसेच सदर नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील निशाद प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तपासणीचे निष्कर्ष हाती येण्यास ४८ ते ७२ तास लागू शकतात. श्री. केदार यांनी सर्व पोल्ट्रीधारक तसेच सर्वसामान्य जनतेस कळविले की, राज्यातील कोणत्याही गावामध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलां...

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची केंद्रे देशभरात निर्माण व्हावीत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Image
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची केंद्रे देशभरात निर्माण व्हावीत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न   पुणे, दि. 9 : ऊस संशोधनामध्ये अग्रेसर असणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची केंद्रे राज्याबरोबरच देशभरात निर्माण व्हावीत तसेच या केंद्रांचा विस्तार जगभरात व्हावा, अशी सदिच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 44 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली(ऑनलाईन) तर ज्येष्ठ नेते तथा संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'तांत्रिक कार्यक्षमता अहवाल', 'आसवनी अहवाल' चे प्रकाशन आणि साखर संघाच्या 'दिनदर्शिका-2021' चे प्रकाशन करण्यात आले. सभेस कामगारमंत्री तथा संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री विजयसिंह...

शोकाकुल मातांची आसवं पुसायला मुख्यमंत्री आले सोनझारी वस्तीत!

Image
  शोकाकुल मातांची आसवं पुसायला मुख्यमंत्री आले सोनझारी वस्तीत! सर्वसामान्यांच्या वेदनेशी एकरूप होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या भावनिकतेचे अनोखे दर्शन नागपूर, दि. 10 : भंडारा जिल्हा रुग्णालयास लागलेल्या आगीत आपली बाळं गमावलेल्या मातांच्या सांत्वनासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज स्वतः भोजापूर गावातील सोनझारी वस्तीत आले! अशा भीषण दुःखाच्या प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रच जणू आपल्या पाठीशी असल्याचा दिलासा आज या दोन्ही मातांना मुख्यमंत्र्यांनी स्वतः भेटून दिला! भंडारा येथील या भीषण घटनेत भोजापूर जवळच्या सोनझारी येथील गीता बेहरे यांची अवघ्या महिनाभराची मुलगी दगावली. शहराजवळ असलेल्या भोजापूर गावातील सोनझारी ही अवघ्या पाचसहाशेची वस्ती. या वस्तीत बेहरे कुटुंबीय राहतात. मोलमजुरी करून ते आपली उपजीविका करतात. गीता आणि विश्वनाथ यांचा विवाह दोन वर्षांपूर्वी झालेला. मृत बालिका हे त्यांचे पहिलेच अपत्य. जन्मत:च बाळाचे वजन अत्यंत कमी असल्याने तिला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशु केंद्रात दाखल करण्यात आले होते. तेथे गेले दोन महिने तिच्यावर उपचार सुरू होते. चांगल्या उपचारांमुळे तिच्या प...

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट

Image
  वाशिम जिल्ह्यातील आजचा  कोरोना_अलर्ट (दि. ११ जानेवारी २०२१, सायं. ५.०० वा.) वाशिम जिल्ह्यात आणखी १६ कोरोना बाधित काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील योजना कॉलनी परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचा १, पिंपळगाव येथील २, रिसोड शहरातील २, मोहजा येथील १, भोकरखेडा येथील २, पळसखेड येथील १, मालेगाव तालुक्यातील आमखेडा येथील १, मंगरुळपीर शहरातील जांब रोड येथील १, कारंजा शहरातील महसूल कॉलनी येथील  १, शहरातील इतर ठिकाणची १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेर २ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तसेच  ९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  कोरोना बाधितांची सद्यस्थिती एकूण पॉझिटिव्ह – ६७७२ ऍक्टिव्ह – १०६ डिस्चार्ज – ६५१४ मृत्यू – १५१ (टीप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट

Image
  वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट (दि. ०९ जानेवारी २०२१, सायं. ५.०० वा.) #वाशिम जिल्ह्यात आणखी ११ कोरोना बाधित काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील गणेश पेठ येथील १, ग्रीन पार्क कॉलनी परिसरातील १, शिवाजी नगर येथील १, केकतउमरा येथील २, रिसोड शहरातील शिवाजी चौक परिसरातील १, भोकरखेडा येथील १, मंगरुळपीर शहरातील पंचशील नगर येथील १, शेलूबाजार येथील २, मोहरी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. तसेच ८ जणांना डिस्चार्ज देण्यात  आला आहे.   कोरोना बाधितांची सद्यस्थिती एकूण पॉझिटिव्ह – ६७५६ ऍक्टिव्ह – ९९ डिस्चार्ज – ६५०५ मृत्यू – १५१ (टीप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

१२ जानेवारीपासून जिल्ह्यात युवा सप्ताहाचे आयोजन

  १२ जानेवारीपासून जिल्ह्यात युवा सप्ताहाचे आयोजन वाशिम ,  दि. ०८ (जिमाका) :  क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १९ जानेवारी २०२१ या कालावधीत जिल्ह्यात युवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय स्तरावर विविध स्पर्धा, उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. १२ जानेवारी रोजी सप्ताहाचे उद्घाटन होणार असून स्वामी विवेकानंद यांचे कार्य, तत्वज्ञान व विचार याबाबत युवांचे प्रबोधन, युवाबाबत उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती, युवक, युवतींचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच १५ ते २० वर्षे मुले-मुली आणि २० वर्षांवरील ते २९ वर्षांखालील युवक व युवती अशा दोन गटात विज्ञान-तंत्रज्ञान, प्रगती, समाजसेवा उपाय, युवांपुढील आव्हाने, नैसर्गिक साधन संपत्ती जतन करण्याकरिता युवांची भूमिका, स्वच्छता अभियान आदी विषयांवर जिल्हास्तरावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. १४ जानेवारी रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये लोकशाही बळकटीमध्ये...

डी.एल.एड शासकीय कोट्यातील रिक्त जागांच्या प्रवेशांसाठी विशेष फेरी

  डी.एल.एड शासकीय कोट्यातील रिक्त जागांच्या प्रवेशांसाठी विशेष फेरी वाशिम ,  दि. ०८ (जिमाका) :  सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता प्राथमिक शिक्षण पदविका (डी.एल.एड. )  प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील जागा रिक्त असल्याने त्या विशेष फेरीद्वारे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार असल्याचे राज्यस्तरीय डी.एल.एड. प्रवेश निवड, निर्णय व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा पुणे येथील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे सहसंचालक यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने प्रवेश होईल. यासाठी विद्यार्थी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) च्या  www.maa.ac.in   या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करु शकतात. याबाबत सविस्तर सूचना, पडताळणी केंद्राची यादी ,  प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयनिहाय रिक्त जागा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण), पुणेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. इयत्ता १२ वी उत्तीर्ण (खुला संवर्ग ४९.५ टक्के व खुला संवर्ग वगळून इतर संवर्ग ४४...

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट

Image
  वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट (दि. ०८ जानेवारी २०२१, सायं. ५.०० वा.)   वाशिम जिल्ह्यात आणखी ०२ कोरोना बाधित   काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार मानोरा तालुक्यातील खंडाळा येथील १, कारंजा तालुक्यातील दुधोरा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याची नोंद झाली आहे. तसेच ९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या काही दिवसांत जिल्ह्याबाहेर झालेल्या एका मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.       कोरोना बाधितांची सद्यस्थिती   एकूण पॉझिटिव्ह  –  ६७४५ ऍक्टिव्ह  –  ९६ डिस्चार्ज  –  ६४९७ मृत्यू  –  १५१   (टीप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचे नियमित शासन सेवेत समायोजन करण्याबाबत कार्यवाही करा

Image
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचे नियमित शासन सेवेत समायोजन करण्याबाबत कार्यवाही करा मुंबई, दि. 7 : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवाप्रवेश नियमात विहित पद्धतीने बदल करुन या कर्मचाऱ्यांना नियमित शासन सेवेत तातडीने समायोजित करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष श्री.नाना पटोले यांनी दिले. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमित शासन सेवेतील समायोजनाबाबत विधानभवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत आमदार श्री.दीपक केसरकर, मुख्य सचिव श्री.संजयकुमार, वित्त विभागाचे उप सचिव श्री.मु.नी.धुरी, आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ.सतिश पवार, आयुक्त डॉ.रामास्वामी, उप सचिव श्री. व.मु.भरोसे, ग्रामविकास विभागाचे उप सचिव श्री.विजय चांदेकर, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे मुख्य समन्वयक श्री.अरुण खरमाटे, अध्यक्ष श्री.कुंदा सहारे व श्री.किरण शिंदे उपस्थित होते. श्री.पटोले म्हणाले, कोविड महामारीच्या कालावधीमध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मोठे योगदान दिले आहे. मंत्री गटा...

महाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही; राज्यात बर्ड फ्लू सर्वेक्षण कार्यक्रम नियमित सुरू – पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार

Image
  महाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही; राज्यात बर्ड फ्लू सर्वेक्षण कार्यक्रम नियमित सुरू – पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार मुंबई दि.7 : राज्यातील विविध जिल्ह्यांमधून पक्षांचे घशातील द्रवांचे नमुने, विष्ठेचे नमुने तसेच रक्तजल नमुने तपासणीत बर्ड फ्लू रोगासाठी नकारार्थी आढळून आले आहे. राज्यात बर्ड फ्लू सर्वेक्षण कार्यक्रम नियमित राबविण्यात येत असून पुढेही सातत्याने राबविण्यात येणार आहे. तसेच सध्या महाराष्ट्रात बर्ड फ्लू नसल्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले. श्री. केदार म्हणाले,पशुसंवर्धन विभागाद्वारे दरवर्षी बर्ड फ्लू सर्वेक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो. या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांमधून पक्षांच्या घशातील द्रवांचे नमुने, विष्ठेचे नमुने तसेच रक्तजल नमुने तपासणीसाठी गोळा करण्यात येतात. यांची तपासणी पश्चिम विभागीय रोगनिदान प्रयोगशाळा, पुणे या 5 राज्यांसाठी पशुरोग निदानाच्या शीर्षस्थ प्रयोगशाळेमध्ये तपासण्यात येतात. सन 2020-21 मध्ये या संस्थेने आजतागायत राज्यातील एकूण 1715 विष्ठा नमुने, 1913 रक्तजल नमुने 1549 घशातील द्रवांचे नमुन्यांची तपासणी आरट...

जिल्हास्तरीय स्थानिक तीन शासकीय सुट्ट्या जाहीर

Image
जिल्हास्तरीय स्थानिक तीन शासकीय सुट्ट्या जाहीर वाशिम ,  दि. ०७ :  १६ जानेवारी १९५८ व ६ ऑगस्ट १९५८ च्या शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी जिल्हास्तरीय स्थानिक तीन सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. या सुट्ट्या २०२१ वर्षामध्ये संपूर्ण वाशिम जिल्ह्याकरिता लागू असणार आहेत. यामध्ये शुक्रवार, १४ मे २०२१ रोजी अक्षय तृतीया, सोमवार, १३ सप्टेंबर २०२१ रोजी गौरी पूजन व बुधवार, ६ ऑक्टोंबर २०२१ रोजी सर्वपित्री अमावास्या या सुट्ट्यांचा समावेश आहे. या सुट्टया जिल्ह्यातील दिवाणी ,  फौजदारी न्यायालये व अधिकोष यांना लागू होणार नाहीत ,  असे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

राज्यातील अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Image
  राज्यातील अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन मुंबई, दि. 7 : सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी डीबीटी (MAHADBT) पोर्टल दि. ०३ डिसेंबर  २०२० पासून कार्यान्वित झाले असून,  https://mahadbtmahait.gov.in  या  संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.   महाविद्यालय स्तरावर शिष्यवृत्ती / शिक्षण शुल्क परीक्षा शुल्काच्या प्रलंबित अर्जाबाबत   महाडिबीटी  संगणक प्रणाली सन २०१९-२० मधील विद्यार्थ्यांचे अर्ज भरणे, अर्ज अद्ययावत करणे तसेच विद्यार्थ्यांनी भरलेले अर्ज पुढील कार्यवाहीसाठी फॉरवर्ड करणे इत्यादी करिता महाडिबीटी संगणक प्रणाली दि.०३.१२.२०२० पासून सुरु करण्यात आली  आहे. सबब सर्व महाविद्यालयांना सूचित करण्यात येते की, महाविद्यालय स्तरावरील सर्व प्रलंबित अर्ज दिलेल्या कालावधीत पडताळणी करुन त्यावर योग्य ती कार्यवाही करावी. तसेच सन २०१९-२० या वर्षातील ...

पोलीस शिपाई भरती २०१९ करीता एसईबीसी (SEBC) उमेदवारांना दिलासा – गृहमंत्री अनिल देशमुख

Image
पोलीस शिपाई भरती २०१९ करीता एसईबीसी (SEBC) उमेदवारांना दिलासा – गृहमंत्री अनिल देशमुख   मुंबई, दि. 7 : राज्यात पोलीस भरती 2019 करीता एसईबीसी (SEBC) च्या ज्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत, त्यांना मोठा दिलासा देण्यात येत असून गृह विभागाकडून दि. 4 जानेवारी 2021 रोजी निर्गमित केलेला शासन निर्णय रद्द करण्यात येत आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. पोलीस शिपाई भरती 2019 करीता ज्या एसईबीसी (SEBC) उमेदवारांनी अर्ज केले होते, त्यांना शासनाच्या सा.प्र.वि. कडील दि. 23 डिसेंबर 2020 च्या शासन निर्णयाचा लाभ देण्याच्या दृष्टीकोनातून सुधारित शासन निर्णय गृह विभागाकडून लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

विविध उपक्रमांमधील ३० टक्के निधी महिला उद्योजकतेसंदर्भातील उपक्रमांसाठी वापरणार – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक

Image
विविध उपक्रमांमधील ३० टक्के निधी महिला उद्योजकतेसंदर्भातील उपक्रमांसाठी वापरणार – कौशल्य  विकास मंत्री नवाब मलिक महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी आता राज्य नाविन्यता सोसायटीमध्ये स्वतंत्र ‘महिला उद्योजकता कक्ष’ मुंबई, दि. ४ : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून राज्यातील महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी कौशल्य विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमध्ये स्वतंत्र ‘महिला उद्योजकता कक्ष’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय सोसायटीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमधील ३० टक्के निधी महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी वापरणे, विद्यार्थीदशेतच महिलांना उद्योजकतेचे प्रशिक्षण देण्यासाठी विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये ‘विद्यार्थिनी उद्योजकता क्लब’ स्थापन करणे असे विविध उपक्रमही राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली. यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले. कौशल्य विकास मंत्री श्री.मलिक म्...