जिल्हास्तरीय स्थानिक तीन शासकीय सुट्ट्या जाहीर
जिल्हास्तरीय स्थानिक तीन शासकीय सुट्ट्या जाहीर
वाशिम, दि. ०७ : १६ जानेवारी १९५८ व ६ ऑगस्ट १९५८ च्या शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी जिल्हास्तरीय स्थानिक तीन सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. या सुट्ट्या २०२१ वर्षामध्ये संपूर्ण वाशिम जिल्ह्याकरिता लागू असणार आहेत.
यामध्ये शुक्रवार, १४ मे २०२१ रोजी अक्षय तृतीया, सोमवार, १३ सप्टेंबर २०२१ रोजी गौरी पूजन व बुधवार, ६ ऑक्टोंबर २०२१ रोजी सर्वपित्री अमावास्या या सुट्ट्यांचा समावेश आहे. या सुट्टया जिल्ह्यातील दिवाणी, फौजदारी न्यायालये व अधिकोष यांना लागू होणार नाहीत, असे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME