डी.एल.एड शासकीय कोट्यातील रिक्त जागांच्या प्रवेशांसाठी विशेष फेरी

 डी.एल.एड शासकीय कोट्यातील

रिक्त जागांच्या प्रवेशांसाठी विशेष फेरी

वाशिमदि. ०८ (जिमाका) : सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता प्राथमिक शिक्षण पदविका (डी.एल.एड.प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील जागा रिक्त असल्याने त्या विशेष फेरीद्वारे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार असल्याचे राज्यस्तरीय डी.एल.एड. प्रवेश निवड, निर्णय व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा पुणे येथील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे सहसंचालक यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने प्रवेश होईल. यासाठी विद्यार्थी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) च्या www.maa.ac.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करु शकतात. याबाबत सविस्तर सूचना, पडताळणी केंद्राची यादीप्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयनिहाय रिक्त जागा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण), पुणेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

इयत्ता १२ वी उत्तीर्ण (खुला संवर्ग ४९.५ टक्के व खुला संवर्ग वगळून इतर संवर्ग ४४.५ टक्के गुणांसह) असलेले विद्यार्थी प्रवेशास पात्र आहेत. खुला संवर्गासाठी २०० रुपये, खुला संवर्ग वगळून इतर संवर्गासाठी १०० रुपये प्रवेश अर्ज शुल्क आकारले जाईल.

११ जानेवारी ते १४ जानेवारी २०२१ या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरता येईल. ११ जानेवारी ते १५ जानेवारी २०२१ या कालावधीत पडताळणी अधिकारी प्रमाणपत्रांची ऑनलाईन पडताळणी करतील. ११ जानेवारी ते १६ जानेवारी २०२१ या कालावधीत विद्यार्थी स्वतःच्या ‘लॉगीन’मधून प्रवेश घ्यावयाचे अध्यापक विद्यालय निश्चित करून स्वतःचे प्रवेशपत्र काढून घेऊ शकतील. ११ जानेवारी ते २० जानेवारी २०२१ या कालावधीत संबंधित अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य यांनी प्रवेशित विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करून स्वतःच्या ‘लॉगीन’मधून विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशित करून घ्यावे.

यापूर्वी ज्यांनी अर्ज पूर्ण भरुन करुन अप्रूव्ह (Approve) घेतला आहे. परंतु, प्रवेश घेतलेला नाही असे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. ज्यांचा अर्ज अपूर्ण किंवा दुरुस्ती (Correction) मध्ये आहे. तसेच नव्याने प्रवेश अर्ज भरुन प्रवेश घेण्यास इच्छूक असलेले सर्व उमेदवार अर्ज भरु शकतात. अर्ज ऑनलाईन अप्रूव्ह (Approve) केल्याशिवाय उमेदवाराचा प्रक्रियेत समावेश होणार नाही. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्याने स्वत:च्या लॉगीनमधूनच प्रवेश घ्यावयाच्या अध्यापक विद्यालयाची स्वत: निवड करुन लगेचच प्रवेशपत्र स्वत: ईमेल, लॉगीनमधून प्रिंट घेवून अध्यापक विद्यालयात चार दिवसाच्या आत प्रत्यक्ष प्रवेश घ्यावा. यानंतर (डी.एल.एड.प्रवेशासाठी कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही, राज्यस्तरीय डी.एल.एड. प्रवेश निवड, निर्णय व संनियंत्रण समितीने कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

अनोळखी वेडसर महिलांचा अपघात जाग्यावर ठार

आरसेटी आणि धान फाउंडेशन द्वारा ग्राम हळदा येथे उद्योजकता जागृती कार्यक्रमाचे आयोजन

बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार रोजगाराभिमुख शिक्षण; १ ऑक्टोबरपासून नोंदणीस सुरूवात – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर