Posts

मशरूम उत्पादन, कुक्कुटपालन पालन क्षेत्रातील स्वयंरोजगाराच्या संधींबाबत आज वेबीनार

Image
  मशरूम उत्पादन, कुक्कुटपालन पालन क्षेत्रातील स्वयंरोजगाराच्या संधींबाबत आज वेबीनार वाशिम ,  दि. २७ :  कोरोना महामारीच्या संकटामध्ये शहराकडून गावाकडे आलेल्या युवकांसाठी स्थानिक संस्थांचा वापर करून अत्यंत कमी भांडवलात गावातच रोजगार निर्माण व्हावा, यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्र व कृषि विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार ,  २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते ५ वा. दरम्यान ‘मशरूम उत्पादन’ आणि ‘कुक्कुटपालन’ या विषयावर ऑनलाईन वेबीनारचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कृषि विज्ञान केंद्राच्या शुभांगी वाटाणे ह्या ‘मशरूम उत्पादन’ या विषयवार, तसेच ‘डॉ. डी. एल. रामटेके हे ‘कुक्कुटपालन’ या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. तरी इच्छुक युवक ,  युवतींनी या वेबीनारमध्ये सहभागी होण्यासाठी ९६६ ५५२ ५६५१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सुनंदा बजाज यांनी केले आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात घटनापीठाचे गठन करण्याची मागणी पुन्हा व ताबडतोब करणार! – मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण

Image
मराठा आरक्षणासंदर्भात घटनापीठाचे गठन करण्याची मागणी पुन्हा व ताबडतोब करणार!   – मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण मुंबई, दि. 27 : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने तातडीने घटनापीठाचे गठन करून या आरक्षणाच्या अंमलबजावणीवरील तात्पुरती स्थगिती रद्द करण्याच्या अर्जावर सुनावणी करावी, अशी विनंती राज्य सरकारने यापूर्वीच केलेली आहे. आजच्या सुनावणीनंतर हीच विनंती पुन्हा एकदा व ताबडतोब केली जाणार असल्याचे मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.   सर्वोच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, ७ ऑक्टोबर रोजी घटनापीठाचे गठन करून त्यासमोर अंतरिम स्थगिती निरस्त करण्याच्या अर्जावर सुनावणी करण्याची मागणी राज्य सरकारने केली होती. परंतु, हे प्रकरण तीन सदस्यीय खंडपीठाकडे पाठवले गेले. प्रत्यक्षात १० ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 'मेन्शनिंग ब्रॅंच'ने राज्य सरकारच्या वकिलांना ईमेल पाठवून हे 'लार्जर बेंच'चे प्रकरण असल्याचे स्पष्ट केले होते. त्यापश्चातही या अर्जावरची सुनावण...

भ्रष्टाचार निर्मुलनासाठी ‘सत्यनिष्ठा प्रतिज्ञा’

Image
  भ्रष्टाचार निर्मुलनासाठी ‘सत्यनिष्ठा प्रतिज्ञा’ वाशिम ,  दि. २७ :  दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी भ्रष्टाचार निर्मुलनासाठी सत्यनिष्ठा प्रतिज्ञा घेतली. देशाच्या आर्थिक ,  सामाजिक तथा राजकीय प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा एक मोठा अडथळा आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी तसेच सर्व कामे प्रामाणिक आणि पारदर्शकपणे करण्याची प्रतिज्ञा घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, तहसीलदार तथा अधीक्षक प्रशांत जाधव यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.   x

स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी देणार – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

Image
  स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी देणार – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे पुणे, दि. 27 : स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांची नोंदणी करून विविध योजना राबविण्याबरोबरच महामंडळाचे लवकरच बळकटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.   राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या संघटनांकडून विविध मागण्या व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बुद्रुक येथे बैठक आयोजित करण्यात आली.   श्री.पवार यांनी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडविण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. महामंडळाला देण्यात येणाऱ्या बळकटीसाठी सामाजिक न्याय विभागाच्या कार्याबाबत समाधान व्यक्त केले. महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांचे जास्तीत जास्त प्रश्न सोडविण्यासाठी नोव्हेंबरअखेर महामंडळाची नोंदणी करून डिसेंबरपासून महामंडळाचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची सूचना खासदार शरद पवार यांनी...

महाराष्ट्र मत्स्य विकास महामंडळाच्या कामकाजासंदर्भात आढावा बैठक

Image
  महाराष्ट्र मत्स्य विकास महामंडळाच्या कामकाजासंदर्भात आढावा बैठक मुंबई, दि. 27 : महाराष्ट्र मत्स्य विकास महामंडळाच्या कामकाजासंदर्भात आढावा बैठक मत्स्‌य व्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ मुख्यालय येथे घेण्यात आली.   यावेळी मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुमंत भांगे, मत्स्य व्यवसाय आयुक्त अतुल पाटणे, मत्स्योद्योग विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक युवराज फिरके, कार्यकारी अभियंता विवेक पाटील तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.   वर्सोवा फिशरी हार्बर प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या कामाची माहिती मत्स्य व्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांनी दिली.   महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम, केंद्र पुरस्कृत योजना अंतर्गत आनंदवाडी, ता.देवगड, जि.सिधुदूर्ग येथील बंदराचा विकास, ससून गोदी मासेमारी बंदराचे आधुनिकीकरण, सागरमाला योजनेंतर्गत मासेमारी बंदराचा विकास व मासे उतरवणी केंद्राचा विकास करण्यासाठी सर्वेक्षण करुन सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे, मत्स्य बाजारपेठ उभारणी...

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट

Image
(दि. २७ ऑक्टोबर २०२०, सायं. ६.०० वा.)   जिल्ह्यात आणखी २० कोरोना बाधित; ५८ जणांना डिस्चार्ज   काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील आययुडीपी कॉलनी परिसरातील १, सिव्हील लाईन्स येथील १, अनसिंग येथील २, मंगरूळपीर तालुक्यातील फाळेगाव येथील ६, सनगाव येथील २, आसेगाव येथील ३, सार्सी येथील १, मालेगाव तालुक्यातील डोंगरकिन्ही येथील १, कारंजा लाड शहरातील शिवाजी नगर येथील १, सुदर्शन कॉलनी येथील १, तसेच इतर ठिकाणची १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.   दरम्यान ,  जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ५८ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला असून गेल्या काही दिवसांत झालेल्या २ मृत्यूची नोंद आज घेण्यात येत आहे. तसेच जिल्ह्याबाहेर आणखी ७ बाधितांची नोंद झाली असून जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या १२ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.   कोरोना बाधितांची सद्यस्थिती   एकूण पॉझिटिव्ह  –  ५६३९ ऍक्टिव्ह  –  ४८७ डिस्चार्ज  –  ५०१५ मृत्यू  –  १३६   (टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ...

‘गाव तेथे अधिकारी’ संकल्पनेअंतर्गत ग्राम गोवर्धन येथे अभ्यासिकेची स्थापना

Image
  ‘गाव तेथे अधिकारी’ संकल्पनेअंतर्गत ग्राम गोवर्धन येथे अभ्यासिकेची स्थापना    म.भा. माळी महासंघ व सावित्री महिला मंचचा पुढाकार ग्रामीण भागातील तरुणांच्या स्वप्नांना मिळाले आधाराचे पंख वाशीम - ग्रामीण भागातील दुर्बल घटकातील हुशार विद्यार्थी मोठे अधिकारी व्हावेत व ग्रामीण भागातील शिक्षणाचे सशक्तीकरण व्हावे या उदात्त दृष्टीकोनातून अखिल भारतीय माळी महासंघाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष तथा वंचित बहूजन आघाडीच्या प्रदेश सदस्या सौ. किरणताई गिर्‍हे यांच्या विशेष पुढाकारातून रिसोड तालुक्यातील ग्राम गोवर्धन येथे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ‘गाव तेथे अधिकारी’ संकल्पनेअंतर्गत २५ ऑक्टोंबर रोजी अभ्यासिकेची स्थापना करण्यात आली. या अभ्यासिकेमुळे गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी हक्काचे व्यासपिठ मिळाले असून या अभ्यासिकेमुळे त्यांच्या स्वप्नांना आधाराचे पंख मिळाले आहेत.     ग्रामीण भागातील मुलांनी मोठ्या कष्टाने पदवी घ्यावी आणि सरकारी नोकरीसाठी कायम संघर्ष करावा तर मुलींनी कॉलेजच तोंड बघावं आणि दिल्या घरी सुखी व्हावं. हीच परंपरा ग्रामीण भागात चालत आली आहे. मात्र ग्राम...

महाराष्ट्र आणि अफगाणिस्तानमधील सांस्कृतिक संबंध दृढ करण्यावर भर – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

Image
  महाराष्ट्र आणि अफगाणिस्तानमधील सांस्कृतिक संबंध दृढ करण्यावर भर – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख मुंबई, दि. 26 : भारतीय सिनेमा आणि कलाकार अफगाणिस्तानमध्ये लोकप्रिय आहे. हीच लोकप्रियता येणाऱ्या काळातही अबाधित ठेवत महाराष्ट्र आणि अफगाणिस्तानमधील सांस्कृतिक संबंध दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.   अफगाणिस्तानच्या वाणिज्य दूत (कॉन्सुल जनरल) झाकिया वारदाक यांच्यासह शफीऊल्ला इब्राहीमी, रफीऊल्ला केलेवल, आसिफ नवरोझे, अहमाद वारीस या शिष्टमंडळाने सोमवारी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची मंत्रालयात भेट घेतली. या भेटीदरम्यान सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय, सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.   सांस्कृतिक कार्यमंत्री श्री.देशमुख म्हणाले की, महाराष्ट्र आणि अफगाणिस्तानमध्ये येणाऱ्या काळात वैद्यकीय, सांस्कृतिक देवाण घेवाण वाढावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून या दृष्टीने आराखडा तयार करण्याचे काम करण्यात येईल. अफगाणिस्तान हा ऐतिहासिक देश असल्याने तेथे अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. प्रख्यात बौद्ध बामी...

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण मध्ये पद भरती

Image
  महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण मध्ये पद भरती (युगनायक न्युज नेटवर्क)  पदाचे नाव :  सहायक संचालक – आईसी १ पद शैक्षणिक पात्रता :  पदव्युत्तर पदवी आणि अनुभव पदाचे नाव :  उपसंचालक – आईसी १ पद शैक्षणिक पात्रता :  पदव्युत्तर पदवी आणि अनुभव पदाचे नाव :  उपसंचालक – टीआय १ पद शैक्षणिक पात्रता :  सामाजिक शास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि अनुभव पदाचे नाव :  उपसंचालक – एसटीआय १ पद शैक्षणिक पात्रता :  एमबीबीएस आणि अनुभव पदाचे नाव :  भांडार अधिकारी १ पद शैक्षणिक पात्रता :  पदवी आणि अनुभव पदाचे नाव :  सहाय्यक संचालक – व्हि.वी.डी १ पद शैक्षणिक पात्रता :  सामाजिक शास्त्र/समाजशास्त्र/समाज कार्य विषयात पदव्युत्तर पदवी आणि अनुभव पदाचे नाव :  सहाय्यक संचालक – गुणवत्ता व्यवस्थापक (रक्त सुरक्षा) – १ पद शैक्षणिक पात्रता :  एमएससी/बीएससी आणि अनुभव पदाचे नाव :  सहाय्यक संचालक – गुणवत्ता व्यवस्थापक (लॅब सेवा) – १ पद शैक्षणिक पात्रता :  एमएससी/बीएससी आणि अनुभव पदाचे नाव :  सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी – ३ पदे शैक्षणि...

विद्यार्थ्यांना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

Image
  विद्यार्थ्यांना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत मुंबई, दि. 26 : विद्यार्थ्यांना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देतानाच मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संदर्भातील विविध प्रश्न तात्काळ सोडविले जातील, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.   श्री.सामंत यांनी मुंबई विद्यापीठाच्या स्पोर्ट पॅव्हेलियनला भेट देऊन विकासात्मक कामांची पाहणी केली. मुंबई शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या पॅव्हेलियनचा विकास होणे आवश्यक असून या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या खेळातील कौशल्याला चालना मिळेल. क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी या ठिकाणाचा विकास होणे गरजेचे आहे त्यासाठी लागणारे सहकार्य विद्यापीठ प्रशासनाला केले जाईल, असे श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.   यावेळी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर व सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नूतन जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी प्रभार स्वीकारला

Image
  नूतन जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी प्रभार स्वीकारला वाशिम ,   दि. २६ (युगनायक न्युज  नेटवर्क  ) :   जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून शण्मुगराजन एस. यांनी आज, २६ ऑक्टोबर रोजी प्रभार स्वीकारला. मावळते जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्याकडून त्यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली.   जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. हे २०१३ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी धारणी येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी, बुलडाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. रुजू झाल्यानंतर नूतन जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्ग ,  नियंत्रण आणण्यासाठी करण्यात येणारे उपाय योजना ,  चाचण्यांची स्थिती याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.

२ नोव्हेंबर रोजीचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द

  २ नोव्हेंबर रोजीचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द  वाशिम ,   दि. २६ (युगनायक न्युज  नेटवर्क ) :   कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी एकाच ठिकाणी होणारी लोकांची गर्दी टाळणे ,  सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे २ नोव्हेंबर २०२० रोजीचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. पहिल्या सोमवारी शासकीय सुट्टी येत असल्यास त्यानंतरच्या कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी हा लोकशाही दिन आयोजित केला जातो. मात्र , ‘ कोरोना ’ चा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात एकाच ठिकाणी लोकांनी एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे २ नोव्हेंबर रोजीचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

आयबीपीएस लिपीक (सीआरपी-लिपीक-X) भरती प्रक्रियेस मुदतवाढ

Image
  पदाचे नाव : सीआरपी-लिपीक-X   शैक्षणिक अर्हता : पदवी   अर्ज करण्याची अंतिम तारीख : 6 नोव्हेंबर 2020   अधिक माहितीसाठी :  https://www.ibps.in/  

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट

Image
  वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट (दि. २५ ऑक्टोबर २०२०, सायं. ६.०० वा.) जिल्ह्यात आणखी २२ कोरोना बाधित; २७ जणांना डिस्चार्ज काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील रेनॉल्ड हॉस्पिटल परिसरातील १, मंगरुळपीर तालुक्यातील मानोली येथील २, मालशेलू येथील १, पोधा येथील १, वनोजा येथील १, भूर येथील १, रिसोड शहरातील गंगा माँ शाळा परिसरातील २, सवड येथील २, केशवनगर येथील १, मसला पेन येथील २, वाडी वाकद येथील १, मालेगाव शहरातील वार्ड क्र. अकरा येथील १, डव्हा येथील १, कारंजा लाड येथील सुदर्शन कॉलनी परिसरातील १, मोठे श्रीराम मंदिर परिसरातील १, मोखड येथील १, इंझा येथील १, काकड शिवणी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या २७ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच गेल्या काही दिवसांतील आणखी ४ मृत्यूची नोंद आज घेण्यात आली आहे. कोरोना बाधितांची सद्यस्थिती एकूण पॉझिटिव्ह – ५५८८ ऍक्टिव्ह – ५४७ डिस्चार्ज – ४९०९ मृत्यू – १३१ (टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर का...

जिल्ह्यातील गॅस एजन्सी वितरकांकडुन ग्राहकांची आर्थिक लुट

 जिल्ह्यातील गॅस एजन्सी वितरकांकडुन ग्राहकांची आर्थिक लुट  आम आदमी पार्टीचे पुरवठा विभागाला निवेदन वाशिम: जिल्ह्यातील गॅस एजन्सी वितरक ग्राहकांची लाखो रूपयांची आर्थिक लुट करीत आहेत . गॅस वितरकांच्या या बेबंद कारभाराला लगाम घालुन ग्राहकांची होणारी लुट थांबवण्याची मागणी आम आदमी पार्टीचे राम पाटील यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी  यांना दिनांक  21 ऑक्टोंबर रोजी निवेदन देवून केली आहे. निवेदनात नमुद आहे की, वाशिम जिल्ह्यातील सव॔ गॅस एजन्स्याचे हजारों ग्राहक आहेत परंतु सव॔  वितरक एजन्सी ग्राहकांची लुट करीत असुन ग्राहकांची आर्थिक फसवणुक करीत आहेत. यामधे नवीन गॅस कनेक्शन साठी गॅस वितरक ग्राहकांना आवाजवी पैश्याची आकारणी करीत आहेत .गॅस शेगडी घेणे बंधनकारक  नसतांना सुद्धा गॅस एजन्सी धारक नवीन गॅस कनेक्शन घेण्यासाठी ग्राहकांना गॅस शेगडी घेण्यास जबरदस्ती करीत आहेत. याशिवाय इतरही वस्तु नेण्यास त्यांना  भाग पाडत आहेत. शहरी भागात घरपोच सिलेंडर डिलेवरीच्या पैशाचा भरणा केल्यानंतरही संबंधीत डिलेवरी बॉय ग्राहकांकडुन  20 ते 30रू रक्कम पावती पेक्षा जास्त घेतल्या जातात. ग्रा...

पंचशील नगर वाशिम येथे अशोक विजयादशमी धम्म चक्र प्रवर्तन दिन ऊत्साहात संपन्न झाला.....

Image
  पंचशील नगर वाशिम येथे अशोक विजयादशमी धम्म चक्र प्रवर्तन दिन ऊत्साहात संपन्न झाला ..... या वेळी महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी गायक कविनंद ऊर्फ मधुकर गायकवाड, गायिका विद्याताई भगत, कुसुमताई सोनुने, विश्रांतीबाई गायकवाड, चतुराबाई काशिदे, भीमराव काशीदे, सखाराम ताजणे, सुनील इंगोले, आदित्य सहस्रबुद्धे, संगीता गायकवाड, फुलाबाई इंगळे, पुष्पा पाईकराव, रूपाली पाईकराव, शोभाबाई कांबळे, आकाश पडघान, सुनिता खंडारे शेषराव पाईकराव,सुमेध गायकवाड, प्रताप गायकवाड, भाष्कर गायकवाड, अर्चना गायकवाड, आदि उपस्थित होते.  जेष्ठ गायिका विद्याताई भगत व कुसुमताई सोनुनेयांच्या हस्ते धम्मध्वजारोहन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ कवी मधुकर गायकवाड यांनी केले व त्रीशरण पंचशीलाचे सामुदायिक पठन करण्यात आले  तर श्रेया गायकवाड या चिमुकलीने प्रेरणादायी भाषन केले. प्रमुख मार्गदर्शन एनडीएमजे चे राज्य सहसचिव पी एस खंदारे यांनी केले. आभार भीमराव काशीदे यांनी केले.

रेमेडेसिवीर व इतर औषधे विक्रीसंदर्भात प्रशासनाने काटेकोर नियंत्रण ठेवावे – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Image
रेमेडेसिवीर व इतर औषधे विक्रीसंदर्भात प्रशासनाने काटेकोर नियंत्रण ठेवावे – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर    अमरावती, दि. २४ : खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांना रेमडेसिविर इंजेक्शन वाजवी किंमतीत मिळावे यासाठी शासनाने त्याचे दर निश्चित केले आहेत. अमरावतीसह राज्यातील  प्रत्येक जिल्ह्यात  २ हजार ३६० रुपयांना हे इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी  एक औषध केंद्रही निश्चित करण्यात आले आहे. यामुळे रुग्णांना वेळेवर आणि वाजवी किंमतीत रेमडेसीविर इंजेक्शन मिळावे यासाठी  प्रशासनाने दक्षता घेण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.   राज्यातील शासकीय रुग्णालयामध्ये हे औषध मोफत उपलब्ध आहे. परंतु खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना हे औषध मिळत नसल्याच्या अथवा महाग मिळत असल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन शासनाने हा निर्णय घेतला. त्यामुळे खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना निश्चित केलेल्या दरात रेमडेसीविर उपलब्ध होण्याकरीता अन्न व औषध प्रशासनामार्फत प्रत्येक जिल्ह्यातील खाजगी औषधी के...

‘कोरोनारूपी रावणाचा नाश करू या’- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा

Image
‘कोरोनारूपी रावणाचा नाश करू या’- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा   मुंबई, दि. २४ :-   विजयादशमी म्हणजे संकटावर, वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवण्याची प्रेरणा. यंदाच्या या विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या उत्सवातून सीमोल्लंघन करून विजय खेचून आणण्याची प्रेरणा घेऊन आपण एकजुटीने कोरोना विषाणूरूपी रावणाचा नाश करू या, असे आवाहन करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दसऱ्याच्या पुर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना संकटावर मात करून महाराष्ट्र नव्या जोमाने भरभराट आणि समृद्धीकडे वाटचाल करेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.   मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, लढवय्या महाराष्ट्र अशी आपली ओळख आहे. आपण अनेकदा संकटांचा यशस्वी मुकाबला केला आहे. त्यामुळे कोरोना विषाणुच्या विरोधातील लढ्यातही आपण सर्व भेद बाजुला ठेवून एकवटले आहोत. कोरोनाच्या संकटातच निसर्गाची अवकृपा झाली. पण या सगळ्या संकटांना न डगडगमता सामोरे जात आहोत. कोरोनाच्या विषाणूला पराजीत करण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोह...

विनायकदादा पाटील यांच्या निधनामुळे बहुआयामी नेतृत्व हरपले – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

Image
विनायकदादा पाटील यांच्या निधनामुळे बहुआयामी नेतृत्व हरपले – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात   मुंबई, दि. २४ :   ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, लेखक, वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. राजकीय, सामाजिक, कृषी, सहकार क्षेत्रात विनायक दादा यांनी आपल्या कामातून वेगळी ओळख निर्माण केली होती. शेती, माती, संस्कृतीसाठी सतत कार्यरत असणाऱ्या विनायकदादा पाटील यांच्या निधनाने बहुआयामी नेतृत्व गमावले आहे, अशा शब्दात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.   विनायकदादा पाटील यांनी सरपंच म्हणून राजकारणाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर पंचायत समिती सभापती, आमदार आणि मंत्री असा त्यांचा चढता राजकीय आलेख राहिला. राज्याच्या मंत्रीमंडळात त्यांनी उद्योग, सांस्कृतिक कार्य, क्रीडा आदी खात्यांची धुरा यशस्वीपणे सांभाळली. सहकार क्षेत्रातही त्यांचा दबदबा राहिला. नाशिक जिल्हा सहकारी भूविकास बँकेचे अध्यक्ष, निफाड सहकारी साखर कारखान्याचे संचालक, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. महाराष्ट्र राज्य वनविका...

आजी/माजी सैनिकांच्या पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमात ५ टक्के जागांवर प्रवेश राखीव; जास्तीत जास्त ५ जागेची प्रचलित अट रद्द – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा

Image
  आजी/माजी सैनिकांच्या पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमात ५ टक्के जागांवर प्रवेश राखीव; जास्तीत जास्त ५ जागेची प्रचलित अट रद्द – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा मुंबई, दि.२४ :   उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व महाविद्यालयात पदविका व पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांकरिता राज्यातील आजी/ माजी सैनिकांच्या पाल्यांना प्रवेशासाठी आता ५ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. या पूर्वीची जास्तीत जास्त ५ जागेची अट रद्द करण्यात येत आहे, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत केली.   श्री. सामंत म्हणाले, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमध्ये समाविष्ट प्रत्येक अभ्याक्रमाकरिता ५ टक्के समांतर आरक्षण विहित करण्यात आले असून या प्रवेशाकरिता प्रत्येक संस्थेमध्ये असलेली जास्तीत जास्त ५ जागांची प्रचलित अट चालू शैक्षणिक वर्षापासून रद्द करण्यात येत आहे.   एमएचटी – सीईटी २०२० ऑनलाईन प्रवेश परीक्षेकरिता ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र डाऊनलोड केले होते, परंतु कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव आणि अतिवृष्टीमुळे परीक्षेस उपस...