जिल्ह्यातील गॅस एजन्सी वितरकांकडुन ग्राहकांची आर्थिक लुट
जिल्ह्यातील गॅस एजन्सी वितरकांकडुन ग्राहकांची आर्थिक लुट
आम आदमी पार्टीचे पुरवठा विभागाला निवेदन
वाशिम:
जिल्ह्यातील गॅस एजन्सी वितरक ग्राहकांची लाखो रूपयांची आर्थिक लुट करीत आहेत . गॅस वितरकांच्या या बेबंद कारभाराला लगाम घालुन ग्राहकांची होणारी लुट थांबवण्याची मागणी आम आदमी पार्टीचे राम पाटील यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दिनांक 21 ऑक्टोंबर रोजी निवेदन देवून केली आहे.
निवेदनात नमुद आहे की, वाशिम जिल्ह्यातील सव॔ गॅस एजन्स्याचे हजारों ग्राहक आहेत परंतु सव॔ वितरक एजन्सी ग्राहकांची लुट करीत असुन ग्राहकांची आर्थिक फसवणुक करीत आहेत. यामधे नवीन गॅस कनेक्शन साठी गॅस वितरक ग्राहकांना आवाजवी पैश्याची आकारणी करीत आहेत .गॅस शेगडी घेणे बंधनकारक नसतांना सुद्धा गॅस एजन्सी धारक नवीन गॅस कनेक्शन घेण्यासाठी ग्राहकांना गॅस शेगडी घेण्यास जबरदस्ती करीत आहेत. याशिवाय इतरही वस्तु नेण्यास त्यांना भाग पाडत आहेत. शहरी भागात घरपोच सिलेंडर डिलेवरीच्या पैशाचा भरणा केल्यानंतरही संबंधीत डिलेवरी बॉय ग्राहकांकडुन 20 ते 30रू रक्कम पावती पेक्षा जास्त घेतल्या जातात. ग्रामीण भागातील ग्राहक सिलेंडर स्वत:हुन घेण्यासाठी आले असता या ग्राहकांकडुन घरपोच सिलेंडर चे पैसे परत न करता तेही पैसे रोखीने भरून घेतल्या जातात .ग्राहकांना अतिरिक्त सिलेंडर घ्यावयाचे असल्यास मनमानी भाव आकारून इतर साहित्य ग्राहकांच्या मस्तकी भाववाढ करुन दिल्या जाते. गॅसधारकांना गॅस कनेक्शनवर विम्याची तरतुद असतांना अद्याप कोणत्याही ग्राहकांना विम्याचे अधिकृत कागदपत्रे दिलेले नाहीत. याशिवाय इतरही मार्गाने गॅस एजन्सी चालक गॅस ग्राहकांची आर्थिक लुट करीत आहेत वरिल दिलेल्या मुद्याप्रमाणे मागील अनेक वर्षापासुन गॅस वितरक एजन्सीधारक ग्राहकांची आर्थिक लुट करीत आहेत.
तरी वर नमुद केलेल्या मुद्यांची चौकशी करुन संबधित गॅस एजन्सी चालकांवर कडक कारवाई करावी व ग्राहक हीत जोपासावे. कारवाई न झाल्यास आम आदमी पार्टीच्या वतीने जनजागृति करुन तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा आम आदमी पार्टीचे राम पाटील डोरले, विनोद पट्टेबहादुर यांनी निवेदनातुन दिला आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME