‘गाव तेथे अधिकारी’ संकल्पनेअंतर्गत ग्राम गोवर्धन येथे अभ्यासिकेची स्थापना

 ‘गाव तेथे अधिकारी’ संकल्पनेअंतर्गत ग्राम गोवर्धन येथे अभ्यासिकेची स्थापना



  
म.भा. माळी महासंघ व सावित्री महिला मंचचा पुढाकार
ग्रामीण भागातील तरुणांच्या स्वप्नांना मिळाले आधाराचे पंख
वाशीम - ग्रामीण भागातील दुर्बल घटकातील हुशार विद्यार्थी मोठे अधिकारी व्हावेत व ग्रामीण भागातील शिक्षणाचे सशक्तीकरण व्हावे या उदात्त दृष्टीकोनातून अखिल भारतीय माळी महासंघाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष तथा वंचित बहूजन आघाडीच्या प्रदेश सदस्या सौ. किरणताई गिर्‍हे यांच्या विशेष पुढाकारातून रिसोड तालुक्यातील ग्राम गोवर्धन येथे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ‘गाव तेथे अधिकारी’ संकल्पनेअंतर्गत २५ ऑक्टोंबर रोजी अभ्यासिकेची स्थापना करण्यात आली. या अभ्यासिकेमुळे गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी हक्काचे व्यासपिठ मिळाले असून या अभ्यासिकेमुळे त्यांच्या स्वप्नांना आधाराचे पंख मिळाले आहेत.
    ग्रामीण भागातील मुलांनी मोठ्या कष्टाने पदवी घ्यावी आणि सरकारी नोकरीसाठी कायम संघर्ष करावा तर मुलींनी कॉलेजच तोंड बघावं आणि दिल्या घरी सुखी व्हावं. हीच परंपरा ग्रामीण भागात चालत आली आहे. मात्र ग्रामीण भागातील गोरगरीब परिवारातील हुशार विद्यार्थ्यांनाही शासकीय सेवेची संधी मळावी या हेतुने सौ. किरणताई गिर्‍हे यांनी सामाजीक उपक्रमांतर्गत ‘गाव तेथे अधिकारी’ हा संकल्प उचलला आहे. याअंतर्गत अशोक विजयादशमी व धर्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून अभ्यासिका स्थापनेचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संजय सोनुने, प्रमुख मार्गदर्शिका सौ. किरणताई गिर्‍हे तर प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष रविन्द्र देशमुख, उपाध्यक्ष धांडे, तालुकाध्यक्ष सैय्यद अकील सैय्यद हुसेन, पोफळे, सोनोने, अंभोरे काका, सौ. सविता मोरे, पी. जी. अंभोरे, पांडुरंग कलासरे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे तौसिफ शेख, अतिश अंभोरे, संतोष कळासरे, बाळू लेमाडे, उमेश कळासरे आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविकातुन प्रा. अरुण अंभोरे यांनी अभ्यासिकेचे महत्व विषद केले. यावेळी प्रा. नागसेन धांडे यांनी परिवर्तन आणि प्रवर्तन याबद्दल विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करुन किरणताईनी अभ्यासिकेची निर्मिती करून ग्रामीण भागातील मुलांच्या मनात स्पर्धेची ओढ निर्माण केली असे म्हटले. अभ्यासिका निर्माण करणे म्हणजे सुजाण नागरिकाची निर्मिती करने असे वंचितचे जिल्हाध्यक्ष देशमुख म्हणाले. या अभ्यासिकेमुळे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा प्रश्न सुटणार असल्याचे प्रतिपादन वंचितचे रिसोड तालुका अध्यक्ष अकील भाई यांनी केले. पोफळे यांनी त्रिशरण आणि बाबासाहेबांचे पुस्तकावरील प्रेम कसे होते हे सांगितले. सम्यकचे निरीक्षक जीवन पडघान यांनी आपले मत मांडले. कार्यक्रमाचे संचलन विनोद अंभोरे तर आभार पडघान व कळासरे यांनी मानले. यावेळी समस्त विद्यार्थी व गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह गावकरी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू