मशरूम उत्पादन, कुक्कुटपालन पालन क्षेत्रातील स्वयंरोजगाराच्या संधींबाबत आज वेबीनार


 

मशरूम उत्पादन, कुक्कुटपालन पालन क्षेत्रातील
स्वयंरोजगाराच्या संधींबाबत आज वेबीनार
वाशिमदि. २७ : कोरोना महामारीच्या संकटामध्ये शहराकडून गावाकडे आलेल्या युवकांसाठी स्थानिक संस्थांचा वापर करून अत्यंत कमी भांडवलात गावातच रोजगार निर्माण व्हावा, यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्र व कृषि विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार२८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते ५ वा. दरम्यान ‘मशरूम उत्पादन’ आणि ‘कुक्कुटपालन’ या विषयावर ऑनलाईन वेबीनारचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये कृषि विज्ञान केंद्राच्या शुभांगी वाटाणे ह्या ‘मशरूम उत्पादन’ या विषयवार, तसेच ‘डॉ. डी. एल. रामटेके हे ‘कुक्कुटपालन’ या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. तरी इच्छुक युवकयुवतींनी या वेबीनारमध्ये सहभागी होण्यासाठी ९६६ ५५२ ५६५१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सुनंदा बजाज यांनी केले आहे.





















































Comments

Popular posts from this blog

अनोळखी वेडसर महिलांचा अपघात जाग्यावर ठार

राज्यातील १ हजार ८०० तरुणांना मिळणार डिजिटल मार्केटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशिक्षण

जिल्ह्यात ५ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू