महाराष्ट्र मत्स्य विकास महामंडळाच्या कामकाजासंदर्भात आढावा बैठक

 

महाराष्ट्र मत्स्य विकास महामंडळाच्या कामकाजासंदर्भात आढावा बैठक




मुंबई, दि. 27 : महाराष्ट्र मत्स्य विकास महामंडळाच्या कामकाजासंदर्भात आढावा बैठक मत्स्‌य व्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ मुख्यालय येथे घेण्यात आली.

 

यावेळी मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुमंत भांगे, मत्स्य व्यवसाय आयुक्त अतुल पाटणे, मत्स्योद्योग विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक युवराज फिरके, कार्यकारी अभियंता विवेक पाटील तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

वर्सोवा फिशरी हार्बर प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या कामाची माहिती मत्स्य व्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांनी दिली.

 

महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम, केंद्र पुरस्कृत योजना अंतर्गत आनंदवाडी, ता.देवगड, जि.सिधुदूर्ग येथील बंदराचा विकास, ससून गोदी मासेमारी बंदराचे आधुनिकीकरण, सागरमाला योजनेंतर्गत मासेमारी बंदराचा विकास व मासे उतरवणी केंद्राचा विकास करण्यासाठी सर्वेक्षण करुन सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे, मत्स्य बाजारपेठ उभारणी व नुतनीकरण, जलाशय विकास योजना, पिंजरा पद्धतीने मत्स्य संवर्धन प्रकल्प, अमरावती फिशरी हब उभारणे यासंदर्भातील कामांचा आढावा राज्यमंत्री श्री.भरणे यांनी घेतला.

 

आनंदवाडी मत्स्य बंदराचे बांधकाम, तेथील प्रस्तावित कामे, रोजगार निर्मिती, निधीची मागणी तसेच ससून गोदी मासेमारी बंदराचे नुतनीकरण, मत्स्य बंदरे व जेट्टी विकास योजनेचे सर्वेक्षण यामध्ये 43 मासळी उतरवणी केंद्राच्या कामांच्या सर्वेक्षणाकरीता प्रशासकीय मंजूरी मिळणे. यासंदर्भातही यावेळी आढावा घेण्यात आला. आनंदवाडी बंदराचे काम मार्च 2021 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. राज्यातील हर्णे, साखरनाटे, सातपाटी, जीवना, आगरदांडा, टेंभी, नायगांव, अर्नाळा या मत्स्य बंदराच्या कामाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू