२ नोव्हेंबर रोजीचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द

 २ नोव्हेंबर रोजीचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द 

वाशिम, दि. २६ (युगनायक न्युज  नेटवर्क ) : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी एकाच ठिकाणी होणारी लोकांची गर्दी टाळणेसोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे २ नोव्हेंबर २०२० रोजीचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. पहिल्या सोमवारी शासकीय सुट्टी येत असल्यास त्यानंतरच्या कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी हा लोकशाही दिन आयोजित केला जातो. मात्र, ‘कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात एकाच ठिकाणी लोकांनी एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे २ नोव्हेंबर रोजीचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.


Comments

Popular posts from this blog

राज्यातील १ हजार ८०० तरुणांना मिळणार डिजिटल मार्केटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशिक्षण

सुशिक्षित बेरोजगार संस्थांना होणार काम वाटप; १० ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

‘मुंबई’चा वारसा सांस्कृतिक एकजुटीचा – ज्येष्ठ पत्रकार तथा खासदार कुमार केतकर