युवापिढीने स्वयं रोजगाराची कास धरावी - संचालक सूर्यकांत फाळके
युवापिढीने स्वयं रोजगाराची कास धरावी - संचालक सूर्यकांत फाळके वाशीम (युगनायक न्युज नेटवर्क ) :- युवापिढीने स्वयं रोजगाराची कास धरून आपला विकास करावा जेणे करून आपण आर्थिक स्वयंपूर्ण होऊ असे प्रतिपादन सूर्यकांत फाळके संचालक SBI RSETI वाशीम यांनी दहा दिवशीय बकरिपालन प्रशिक्षण समारोप प्रसंगी व्यक्त केले SBI RSETI च्या वतीने ग्राम बेलखेडा येथे दहा दिवसाचे बकरी पालन प्रशिक्षण आयोजन करण्यात आले होते त्या प्रशिनाचा समारोप नुकताच झाला शेवटच्या दिवशी बाह्या परिक्षक श्री डॉ काळे सर व श्री डॉ अमोल अवचार सर यांनी अत्यंत शिस्तीत प्रशिकणाथ्री ची परीक्षा घेऊन त्यांना मार्गदर्शन केले व त्या नंतर त्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले या वेळी RSETI चा कर्मचारी वर्ग उपस्थित होते मार्गदर्शक म्हणून नारायण महाले यांनी काम पाहिले.