दुधावर प्रक्रिया करून विविध प्रकारचे नवनवीन पदार्थ तयार करता येतात कृषी दुतांची जनजागृती
दुधावर प्रक्रिया करून विविध प्रकारचे नवनवीन पदार्थ तयार करता येतात कृषी दुतांची जनजागृती
{कृषी दूतांनी बनविले दुधापासून विविध पदार्थ}
पातूर :(प्रतिनिधी )युगनायक न्युज नेटवर्क डॉ . पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय शिर्ला अंधारे पातूर येथील आठव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी मॉड्यूल कार्यक्रमांतर्गत दुधापासून विविध पदार्थ बनविले त्यात बासुंदी ,श्रीखंड ,पनीर ,खवा, कलाकंद, पेढा असे विविध पदार्थांना लागणारे साहित्य व त्याची कृती याचे प्रात्यक्षिक कृषिदूत त्यांनी करून दाखवले. दुग्ध व्यवसाय हा शेतीला पूरक असा जोडधंदा आहे. खेडेगावातील बऱ्याच लोकांचा उदरनिर्वाह दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहे. यामध्ये दुधावर प्रक्रिया करून विविध प्रकारचे नवनवीन पदार्थ तयार करता येतात. सध्या दुधाला व दुग्धजन्य पदार्थांना प्रचंड मागणी आहे. फक्त दूध विकण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करून दुग्धजन्य पदार्थ तयार केल्यास दुधाचे आर्थिक मूल्य कित्येक पटीने वाढते. याबाबत कृषिदूत ऋषिकेश शेगोकार विषाखा राठोड, प्रणाली रोडे ,प्रणय राठोड, विवेक राठोड, तौसिफ शेख ,दिव्या ठाकूर व अंकिता वाकोडे यांनी पुढाकार घेऊन दुधापासून विविध पदार्थ कसे बनवायचे व बनवल्यावर कसे विकायचे व त्यापासून नफा कसा मिळवायचा याचे मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य डॉ. राम खरडे, प्रा. ओम जाधव व प्रा. पुनम निर्मल व इतर प्राध्यापक वृंदांचे विशेष मार्गदर्शन लाभले...
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME