Posts

Showing posts from June, 2021

महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदीत घरेलू कामगारांना आवाहन

Image
  महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे  नोंदीत घरेलू कामगारांना आवाहन वाशिम ,   दि. ३० ( युगनायक न्युज नेटवर्क ) :  सरकारी कामगार अधिकारी कार्यालय अंतर्गत ३१ मार्च २०२१ पर्यंत महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदीत कामगारांनी त्यांच्या बँक खात्याचे पासबुक, आधारकार्ड व इतर वैयक्तिक तपशील  https://public.mlwb.in/public   या लिंकचा वापर करून अद्ययावत करावा. माहिती अद्ययावत करण्यामध्ये काही अडचणी आल्यास सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाच्या ७८७५८६७००८ किंवा ०७२५२-२३५०५३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी गौरव नालिंदे यांनी केले आहे.

खाटिक समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात कार्यवाही करणार – सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे

Image
  खाटिक समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात कार्यवाही करणार – सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे            मुंबई , ( युगनायक न्युज नेटवर्क )दि. 30 : खाटिक समाजाच्या मागण्यांसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेऊन या समाजबांधवांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी शासन प्रयत्न करेल, असे सामाजिक न्याय  व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. मंत्रालयातील दालनात अखिल भारतीय खाटिक समाजाच्या विविध मागण्यांबाबत सामाजिक न्याय  व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक  झाली.यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, सहसचिव दिनेश डिंगळे यासह वरिष्ठ अधिकारी तसेच अखिल भारतीय खाटिक समाजाचे अध्यक्ष संजय घोलप,सरचिटणीस सुजित धनगर यासह संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. सामाजिक न्यायमंत्री श्री.मुंडे म्हणाले, खाटिक समाजाच्या विविध मागण्या या धोरणात्मक निर्णयांच्या आहेत. त्यासाठी पूर्ण अभ्यासानंतर याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून निर्णय घेतला जाईल. या समाजासाठी स्वतंत्र महामंडळाची निर्म...

बुलढाणा जिल्ह्यातील उपकेंद्र उभारणीच्या कामांना गती द्या – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

Image
बुलढाणा जिल्ह्यातील उपकेंद्र उभारणीच्या कामांना गती द्या – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत मुंबई , ( युगनायक न्युज नेटवर्क )दि. 30 : बुलढाणा जिल्ह्याच्या विद्युत पायाभूत आराखड्यात समाविष्ट करण्यात आलेली उपकेंद्र उभारणीची कामे प्राधान्यक्रमाने पूर्ण करावीत, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले. बुलढाणा जिल्ह्यातील ऊर्जा विभागाच्या कामांची आढावा बैठक अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलढाणाचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या बैठकीत ऊर्जामंत्र्यांनी वरील सूचना दिल्या.   मंत्रालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीस ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, ऊर्जा विभागाचे उपसचिव प्रशांत बडगेरी, एमएसईबी सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे, महावितरणचे संचालक (संचलन) संजय ताकसांडे, संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत मंत्रालयातून तर नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता, बुलढाणाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आदी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे...

शाळाच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी लेखा परीक्षक नेमणे - आम आदमी पार्टीच्या वतीने विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री यांना निवेदन

Image
      शाळाच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी लेखा परीक्षक नेमणे  -  आम आदमी पार्टीच्या वतीने विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री यांना निवेदन नाशिक, प्रतिनिधी ( युगनायक न्युज नेटवर्क ) दिनांक 30 जून रोजी मा मुख्यमंत्री ,मा महानगरपालिका आयुक्त ,मा मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद ,मा शिक्षण उपसंचालक ,मा शिक्षण अधिकारी महानगरपालिका ,मा शिक्षण अधिकारी जिल्हापरिषद याना शाळाच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी लेखा परीक्षक नेमणे बाबत व महानगरपालिका,जिल्हा परिषद,आदिवासी आश्रम  शाळातील मुलांना शिक्षण मिळणे करता टॅब किंवा मोबाईल फोन उपलब्द करून ऑनलाईन शिक्षण सुविधा सुरू करून  देणे बाबत दिलेले निवेदन  आम आदमी पार्टी नाशिकच्या वतीने दिनांक 3 जून ,दिनांक 25 जून रोजी देऊन देखील कुठलेही कारवाई न झाल्याने आज महानगरपालिका कार्यलयाबाहेर निदर्शने करण्याची परवानगी करता अर्ज देण्यात आला होता परंतु जमाव बंदी मुळे परवानगी मिळाली नसल्याने ,सरकारवाडा पोलीस यांचे सहकाऱ्यांने महानगरपालिका आयुक्त यांची भेट करून देण्यात अली तसेच आयुक्त यांचे सोबत खाजगी शाळांची मनमानी तसेच...

अनेक दिवसांपासून बंद असलेल्या घंटा गाड्या नगर परिषदे कडुन शहर वासियांच्या सेवे साठी सुरू करण्यात आल्या.

Image
  अनेक दिवसांपासून बंद असलेल्या घंटा गाड्या नगर परिषदे कडुन शहर वासियांच्या सेवे साठी सुरू करण्यात आल्या. नागरिकांनी सुखा व ओला कचरा घंटागाडय़ात टाकावे. न प अध्यक्ष पुनम पाटोळे. लोणार तालुका विशेष प्रतिनिधी. लोणार नगर परिषदे ने दिलेल्या घनकचरा व्यवस्थापनाचा कंत्राट संपल्या ने गेल्या अनेक दिवसांपासून घंटागाडय़ाचे काम बंद होते. या मुळे शहर वासियांना कोरोना काळात अनेक समस्या निर्माण झाली होती. शहराच्या प्रत्येक वार्डात रस्त्यात घाणिचे साम्राज्य जशे निर्माण झाले होते या कडे काही काळ न प चे दुर्लक्ष झाले होते. या कडे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष श्री गजानन अंकुशराव मापारी यांनी न प ला आठवण करून दिली की जगप्रसिद्ध लोणार शहर घाणिच्या विळख्यात सापडले आहे. घाणिच्या साम्राज्या बद्दल एका निवेदनाद्वारे शहराच्या प्रत्येक वार्डात व वाडाच्या प्रत्येक गल्ली बोळात घाणिच्या साम्राज्या मुळे परेशानीत व आरोग्याच्या दृष्टीने जिव धोक्यात येण्याची शक्यता आहे तरी नगर परिषदे ने या कडे लक्ष केंद्रित करावे. न प ने या बाबीवर लक्ष केंद्रित केले व जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सज्ज झाले. व सोमवारी 27 जुन 2021 पा...

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून पोलीस अधिकारी रस्त्यावर उतरले.

Image
  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून पोलीस अधिकारी रस्त्यावर उतरले. नागरिकांनी नियमाचे पालन करावे. पोलीस उपनिरीक्षक भारत बरडे लोणार तालुका विशेष प्रतिनिधी. आज दिनांक 28-6-2021 सोमवार रोजी पोलीस अधिकारी जनतेच्या भल्या साठी व कोरोना ची तिसरी लाट रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन येणाऱ्या जाणाऱ्या अनेक गाडय़ांची तपासणी करून त्यांना मास्क लावून व विनाकारण फिरणाऱ्यांची विचार पुछ करुन समजून सांगितले की कोरोना सारख्या भयानक आजाराच्या प्रादुर्भाव आजुन गेला नाही. मागील एक ते दीड वर्षा पासुन कोरोना विषाणू चा प्रभाव  सुरू आहे. कोरोना ची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या लाटेचा धोका ओळखून आज दिनांक 28-6-2021 सोमवार रोजी पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरून नागरिकांना नियमाचे पालन करावे असे ही सांगत होते. आज आठवडी बाजार असल्याने अनेक खेड्यातले नागरिक लोणार ला बाजार करण्यासाठी येथे. त्या अनुषंगाने पोलीस अधिकारी विनायक चौक येथे होते. कारण की कोरोना चा तिसऱ्या लाटेत संसर्ग वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग सुरक्षेच्या न...

नाशिक कोर्टात प्रॅक्टिस करणारे अँड अनिता जगताप यांच्या झालेल्या विनय भंगावर समितीचे जिल्हाधिकारी यांना समितीच्या वतीने निवेदन

Image
  नाशिक कोर्टात प्रॅक्टिस करणारे अँड अनिता जगताप यांच्या झालेल्या विनय भंगावर समितीचे जिल्हाधिकारी यांना समितीच्या वतीने निवेदन नाशिक प्रतिनिधी : अँड रवी कांबळे  अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती व ब्रिक्स मानवाधिकार मिशन च्या वतीने आज राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप बाबा पाटील खंडारपूरकर यांच्या आदेशाने नाशिक येथील जिल्हा व सत्र न्यायालयात काम करणारे अँड अनिता जगताप मॅडम हे मागील पाच वर्षा पासून  एक दिवाणी दाव्यात काम करीत आहे परंतु सदर केस मद्ये अँड अनिता जगताप यांना वेळोवेळी धमक्या देण्यात आले होते.                        सदर आरोपी यांनी अँड अनिता जगताप यांच्या वर जीवघेणा हमला केल्यानें सदर समितीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला व सदर घटनेचे निवेदन मा जिल्हाधिकारी सो याना देण्यात आले..       सदर निवेदन देणे कामी समितीचे सदस्य उपस्थित होते श्री. गिरीराज महिरे सर( राष्ट्रीय समनव्यक),अँड विजय पवार (विधी विभाग अध्यक्ष महा राज्य) श्री. भिवानंद काळे (नाशिक जिल्हाध्यक्ष),अँड राणी आहेर (महिला...

जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

Image
  जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करा -           जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. वाशिम ,   दि. २८  :   वाशिम जिल्हा परिषदेच्या १४ निवडणूक विभागांत तसेच त्या अंतर्गत सहा पंचायत समित्यांच्या २७ निर्वाचक गणांमध्ये पोटनिवडणूक होत आहे. या निवडणूक क्षेत्रांमध्ये २२ जूनपासूनच आचारसंहिता लागू झाली असून निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. संबंधित क्षेत्रात आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज, २९ जून रोजी दुरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या आढावा बैठकीत दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणुकीची आचारसंहिता संबंधित निवडणूक क्षेत्रापुरतीच मर्यादित आहे. आचारसंहितेचे उल्लंघन होवू नये, यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. नामनिर्देशनपत्रे...

अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी मार्जिन मनी योजना

Image
  अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी मार्जिन मनी योजना वाशिम ,   दि. २९   :   सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या ८ मार्च २०१९ च्या शासन निर्णयाप्रमाणे केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकातील लाभार्थ्यांसाठी मार्जिन मनी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सूचना ९ डिसेंबर २०२० च्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आल्या आहे. सदरचा शासन निर्णय शासनाच्या  www.maharashtra.gov.in   या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे. तरी जिल्ह्यातील या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या लाभार्थ्यांनी शासन निर्णयातील नमूद करण्यात आलेल्या सर्व अटी व शर्तीची पूर्तता करून प्रस्ताव सामाजिक न्याय भवन येथील समाज कल्याण कार्यालयात सादर करावा, असे आवाहन समाज कल्याणच्या सहायक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा योजना अंतिम उत्तरसूची संकेतस्थळावर

Image
  राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा योजना अंतिम उत्तरसूची संकेतस्थळावर मुंबई , दि. 29 : घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना मंगळवार दि.०६.०४.२०२१ अंतिम उत्तरसूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक ०६ एप्रिल २०२१ रोजी इ. ८ वी साठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची अंतिम उत्तरसूची परिषदेच्या  www.mscepune.in   व  https://nmms. mscescholarshipexam.in   या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या परीक्षेच्या MAT व SAT पेपरच्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी, आक्षेप असल्यास ते परीक्षा परिषदेकडे २३ एप्रिल २०२१ अखेरपर्यंत पाठविण्याबाबत १६ एप्रिल २०२१ रोजीच्या प्रसिद्धी निवेदनाद्वारे कळविण्यात आले होते. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात येत आहे. या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन, आक्षेप स्विकारले जाणार नाहीत, तसेच या परीक्षेसाठी गुणपडताळ...

एसएनडीटी महिला विद्यापीठाने पुढील २५ वर्षांचा विकास आराखडा तयार करावा – विद्यापीठ भेटीप्रसंगी राज्यपालांकडून अपेक्षा

Image
  एसएनडीटी महिला विद्यापीठाने पुढील २५ वर्षांचा विकास आराखडा तयार करावा – विद्यापीठ भेटीप्रसंगी राज्यपालांकडून अपेक्षा मुंबई , दि. 29 : महर्षी कर्वे यांनी दूरदृष्टीने स्थापन केलेल्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाने पुढील २५ वर्षांत आपले स्वरूप कसे असावे याचा विकास आराखडा (ब्लू प्रिंट) तयार करून विद्यापीठाचा नावलौकिक जगात कसा वाढवता येईल यादृष्टीने विचार करावा अशी सूचना राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी केली. शिक्षकांनी अध्यापन करताना मातृभाषा, भारतीय संस्कृती व नितीमूल्य याबाबत विद्यार्थ्यांमध्ये आपुलकी निर्माण करावी, अशीही सूचना श्री.कोश्यारी यांनी केली. राज्यपाल कोश्यारी यांनी एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या जुहू येथील परिसराला भेट देऊन विभागप्रमुख तसेच प्राचार्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी व प्रकुलगुरू डॉ. विष्णू मगरे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. जगात आज जेंडर इक्वालिटीचा विचार होत असेल. परंतु भारताने त्याहीपुढे जाऊन स्त्रीशक्तीला श्रेष्ठत्व प्रदान केले आहे. धरणी माता, जगन्माता जगाचे संचलन व परिपोषण करता...

‘स्माईल’ योजनेतून मिळणार व्यावसायिक कर्ज

Image
  ‘स्माईल’ योजनेतून मिळणार व्यावसायिक कर्ज वाशिम ,   दि. २९  :   एन.एस.एफ.डी.सी. ,  नवी दिल्ली यांच्या माध्यमातून महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ यांच्या मार्फत कोविड-१९ च्या महामारीत अनुसूचित जातीच्या कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाला आहे ,  त्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासाठी वारसदाराला ‘स्माईल’ योजनेतून व्यावसायिक कर्ज उपलब्ध करून देण्याची योजना विचाराधीन आहे. या योजनेत १ लाख ते ५ लाखापर्यंत कर्ज मिळणार असून यामध्ये यांनी एस.एफ.एफ.डी.सी चा सहभाग ८० टक्के व भांडवल अनुदान २० टक्के मिळणार आहे. या योजनेसाठी व्याज दर ६ टक्के असून परतफेडीचा कालावधी ६ वर्ष आहे. सदर योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्जदार हा अनुसूचित जातीचा असावा. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ३ लाखापर्यंत असावे. अर्जदार हा कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखाच्या कुटुंबातील सदस्य असावा. कुटुंब प्रमुखाच्या रेशनकार्डमध्ये सदर सदस्याचे नाव असणे बंधनकारक आहे. मृत्यू पावलेल्या व्यक्तीची वयोमर्यादा ही १८ ते ६० वर्षांच्या दरम्यान असावी. मृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखाची मिळकत कुटुंबाच्या एकूण मिळकती पेक्ष...

कोरोना_अलर्ट वाशिम जिल्ह्यात आणखी ९ कोरोना बाधित; ३६ जणांना डिस्चार्ज

Image
  कोरोना _ अलर्ट ( दि. २९ जून २०२१)   वाशिम जिल्ह्यात आणखी ९ कोरोना बाधित; ३६ जणांना डिस्चार्ज   रिसोड :  शहरातील- १.   मंगरूळपीर :  शेलगाव- ३, पिंप्री अवगण- १, शहापूर- १.   कारंजा लाड :  शिवाजी नगर- १, बेंबळा- २.   काही दिवसांपूर्वी झालेल्या आणखी एका मृत्यूंची नोंद पोर्टलवर झाली आहे.   कोरोना बाधितांची सद्यस्थिती   एकूण पॉझिटिव्ह  –   ४१३९७ ऍक्टिव्ह  –  २०९ डिस्चार्ज  –  ४०५६८ मृत्यू  –  ६१९ ( टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर झालेल्या मृत्यूंची आहे. सदर आकडेवारी पोर्टलवर अपडेट झालेली आहे.)

दुध संकलन व वितरणास आता सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत मुभा

Image
  दुध संकलन व वितरणास आता सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत मुभा दुध संकलन व वितरणास आता सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत मुभा वाशिम ,   दि. २९ :   राज्यात डेल्टा व डेल्टा पल्स व्हेरियंटचे कोरोना विषाणू आढळून आल्याने टप्पा क्र. ३ अंतर्गत निर्बंध लागू करण्याच्या सूचना राज्य शासनाने निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात २८ जून २०२१ रोजीच्या सकाळी ७ वाजेपासून नवीन नियमावली करण्यात आली आहे. या नियमावलीमध्ये अंशतः बदल करून दुध संकलन व वितरणाच्या कालवधीत बदल करून आता दुध संकलन व वितरणास सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. यापूर्वी २६ जून रोजी निर्गमित केलेल्या आदेशामध्ये सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत केवळ दुध वितरणास मुभा देण्यात आली होती.

आशिया खंडातील सर्वात मोठी महिला फुटबॉल स्पर्धा महाराष्ट्रात – क्रीडामंत्री सुनील केदार

Image
  आशिया खंडातील सर्वात मोठी महिला फुटबॉल स्पर्धा महाराष्ट्रात – क्रीडामंत्री सुनील केदार मुंबई, दि. 29 : महाराष्ट्रात फुटबॉल खेळाला चालना मिळावी या उद्देशाने आशिया खंडातील  सर्वात मोठी एएफसी महिला आशिया  कप 2022 स्पर्धेचे आयोजन राज्यात करण्यात आले आहे. सह्याद्री अतिथीगृहात आशिया एएफसी महिला आशिया कप 2022 स्पर्धेच्या तयारी बाबतीत आयोजित आढावा बैठकीत क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार बोलत होते. यावेळी पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई जिल्हा फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष श्री.आदित्य ठाकरे, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष तथा खासदार प्रफुल्ल पटेल, राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया उपस्थित होते. क्रीडामंत्री श्री.केदार म्हणाले, एएफसी महिला आशिया  कप 2022 या स्पर्धेमुळे राज्यामध्ये क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन मिळणार आहे. आपल्या राज्यात फुटबॉल खेळाला चालना मिळावी आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्यातील मुंबई, नवी मुंबई आणि बालेवाडी पुणे येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथील स्टेडियम ...

मंत्रालयातील महिला बचत गटाचे उपाहारगृह सुरू होणार – सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

Image
    मंत्रालयातील महिला बचत गटाचे उपाहारगृह सुरू होणार – सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश मुंबई , दि. 29 : गरजूंना न्याय देणे महत्त्वाचे असून त्यानुसार कोरोना प्रादुर्भावामुळे बंद असलेल्या मंत्रालयातील महिला बचत गटाचे उपाहारगृह सुरू करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रशासनाला दिले. राज्यमंत्री श्री. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली महिला बचत गटाचे उपाहारगृह सुरू करण्याबाबत मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला सामान्य प्रशासन विभागाचे सह सचिव सोमनाथ बागुल, मंत्रालय सुरक्षाचे सहायक पोलीस आयुक्त मधुकर जवळकर, मंत्रालय सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता अशोक गायकवाड, गृह विभागाचे कक्ष अधिकारी बाबासाहेब खंदारे उपस्थित होते. कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच ‘टेक अवे’ या तत्वावर उपाहारगृह सुरू करण्याच्या सूचना श्री. भरणे यांनी यावेळी दिल्या. या निर्णयामुळे मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी आणि कामानिमित्त मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांची अल्पोपहाराची सोय होण्यास मदत होणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे देशभरात...

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत कर्ज योजनेबाबत आवाहन

Image
  महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत कर्ज योजनेबाबत आवाहन मुंबई , दि. 29 : कोविड-१९ या महामारीत ज्या अनुसूचित जातीच्या कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाला आहे. त्या कुटुंबियाचे पुनर्वसन करण्यासाठी व्यवसायासाठी कर्ज  देण्याची and Support for Marginalized Individuals for Livelihoods Enterprie (SMILE)  योजना महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत किमान  एक ते पाच लाख रूपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकणार आहे.यामध्ये एनएफडीसी दिल्लीचा ८० टक्के सहभाग असून भांडवली अनुदान २० टक्के मिळणार आहे. या योजनेचा कर्ज परतफेडीचा कालावधी सहा वर्षे असणार आहे. या योजनेसाठी पात्रता पुढीलप्रमाणे आहे. अर्जदार अनुसूचित जातीतील असावा, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रुपये ३.०० लाख पर्यंत असावे, अर्जदार हा कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबप्रमुखाच्या कुटुंबातील प्रमुखाच्या रेशनकार्डवर सदस्याचे नाव असणे बंधनकारक आहे, मृत्यू पावलेल्या व्यक्तीची वयोमर्यादा १८ ते ६० च्या दरम्यान असावी. मृत्यू पावलेल्या कुटुंबप्रमुखाची मिळकत कुटुंबाच्या एकूण मिळकतीपेक्षा जास्त असणे आ...

आदिवासी बचत गटांनी एकात्मिक कुक्कुटपालन योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Image
  आदिवासी बचत गटांनी एकात्मिक कुक्कुटपालन योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन नाशिक दि. 29  : आदिवासी विकास विभाग हा नेहमीच आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी काम करत असतो. या अनुषंगाने ग्रामीण आदिवासी पाड्यात रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी एकात्मिक कुक्कुटपालन योजना महत्त्वपूर्ण असणार आहे. याकरीता जास्तीत जास्त आदिवासी बचत गटांनी या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.   प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्यानुसार, राज्यातील विविध भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवासाठी उत्त्पन्नवाढीच्या दृष्टीने  आदिवासी विकास विभागाकडून विविध योजना राबविल्या जातात. शेती ही पावसावर आधारित असल्याने त्यातून निश्चित उत्पन्नाची शाश्वती नसते. त्यामुळे आदिवासी भागात शेतीस  जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन हा उत्तम पर्याय आहे. त्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी विकास प्रकल्प नाशिक, राजूर, कळवण, नंदुरबार, तळोदा, धुळे, शहापूर आणि पेण या कार्यक्षेत्रातील आदिवासींच्या स्वयंसहायता बचत गटांसाठी एकात्मिक कुक्कुटपालन योजनेच्या ...

कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे पालकांचा मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी किंवा पदव्युत्तरपर्यंतचे पूर्ण शुल्क माफ

Image
    कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे पालकांचा मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी किंवा पदव्युत्तरपर्यंतचे पूर्ण शुल्क माफ विद्यापीठ आणि अनुदानित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे इतर शुल्क माफ मुंबई , दि. २९ : कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे ज्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे आई/वडील/पालक मयत झाले असतील अशा विद्यार्थ्यांचे पदवी/पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करण्यात येत आहे, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली. मंत्री श्री.सामंत म्हणाले, अनुदानित महाविद्यालय व विद्यापीठीय विभागातील सर्व अभ्यासक्रमासाठी आकारण्यात येणाऱ्या इतर शुल्कांमधील जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन/उपक्रम शुल्क, कॉलेज मॅगेजीन शुल्क, संगणक शुल्क, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत निधी आणि युथ फेस्टिवल अशा ज्या बाबींवर कोणत्याही प्रकारे खर्च आकारण्यात आलेला नाही.त्या बाबींसाठी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. प्रयोगशाळा व ग्रंथालय यांची देखभाल व ग्रंथालयामध्ये ई-कन्टेंट विकत घेण्यासाठी खर्च करण्यात आला असल्याने याबाबतच्या शुल्कामध्ये ५...

कोविडमुळे निराधार झालेल्या बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनासोबत एनजीओंचे सहकार्य मोलाचे – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Image
  कोविडमुळे निराधार झालेल्या बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनासोबत एनजीओंचे सहकार्य मोलाचे – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर मुंबई , दि. 29: कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांच्या शालेय शुल्काची जबाबदारी आणि मुलांच्या समुपदेशनाची मोहीम स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शासन हाती घेत आहे. या संदर्भात महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत महिला व बालविकास विभाग आणि प्रोजेक्ट मुंबई तसेच इंडियन सायकियाट्रिक सोसायटी या संस्थांसोबत दोन सामंजस्य करार करण्यात आले.   कोविड-19 आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचे संरक्षण आणि संगोपनाची जबाबदारी पालकत्वाच्या नात्याने राज्यशासन समर्थपणे बजावत आहे. या बालकांना शैक्षणिक, व्यावसायिक प्रशिक्षण आदी सुविधा उपलब्ध करुन त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध आहे. अशातच या मुलांच्या शिक्षणासाठी तसेच मानसिक पुनर्वसनासाठी सामाजिक जबाबदारी म्हणून स्वयंसेवी संस्था पुढे येत आहेत ही बाब प्रशंसनीय आहे, असे उद्गार यावेळी मंत्री ॲड. ठाकूर यांनी काढले.   यावेळी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आय. ए....