अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी मार्जिन मनी योजना
अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी मार्जिन मनी योजना
वाशिम, दि. २९ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या ८ मार्च २०१९ च्या शासन निर्णयाप्रमाणे केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकातील लाभार्थ्यांसाठी मार्जिन मनी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सूचना ९ डिसेंबर २०२० च्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आल्या आहे.
सदरचा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे. तरी जिल्ह्यातील या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या लाभार्थ्यांनी शासन निर्णयातील नमूद करण्यात आलेल्या सर्व अटी व शर्तीची पूर्तता करून प्रस्ताव सामाजिक न्याय भवन येथील समाज कल्याण कार्यालयात सादर करावा, असे आवाहन समाज कल्याणच्या सहायक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME