शाळाच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी लेखा परीक्षक नेमणे - आम आदमी पार्टीच्या वतीने विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री यांना निवेदन
शाळाच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी लेखा परीक्षक नेमणे - आम आदमी पार्टीच्या वतीने विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री यांना निवेदन
नाशिक, प्रतिनिधी (युगनायक न्युज नेटवर्क) दिनांक 30 जून रोजी मा मुख्यमंत्री ,मा महानगरपालिका आयुक्त ,मा मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद ,मा शिक्षण उपसंचालक ,मा शिक्षण अधिकारी महानगरपालिका ,मा शिक्षण अधिकारी जिल्हापरिषद याना शाळाच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी लेखा परीक्षक नेमणे बाबत व महानगरपालिका,जिल्हा परिषद,आदिवासी आश्रम शाळातील मुलांना शिक्षण मिळणे करता टॅब किंवा मोबाईल फोन उपलब्द करून ऑनलाईन शिक्षण सुविधा सुरू करून देणे बाबत दिलेले निवेदन
आम आदमी पार्टी नाशिकच्या वतीने दिनांक 3 जून ,दिनांक 25 जून रोजी देऊन देखील कुठलेही कारवाई न झाल्याने आज महानगरपालिका कार्यलयाबाहेर निदर्शने करण्याची परवानगी करता अर्ज देण्यात आला होता परंतु जमाव बंदी मुळे परवानगी मिळाली नसल्याने ,सरकारवाडा पोलीस यांचे सहकाऱ्यांने महानगरपालिका आयुक्त यांची भेट करून देण्यात अली तसेच आयुक्त यांचे सोबत खाजगी शाळांची मनमानी तसेच महानगरपालिका शाळेतील मुलाना ऑनलाईन शिक्षण मिळावे यावर चर्चा करण्यात आली व निवेदन देण्यात आले ,तसेच मा मुख्यमंत्री ,मा शिक्षण उपसंचालक ,मा मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद ,शिक्षण अधिकारी महानगरपालिका ,शिक्षण अधिकारी परिषद याना देखील निवेदन देण्यात आले
निवेदनात नमूद करण्यात आले की खाजगी शाळा सण 2020 ते 2021 ह्या वर्षात ऑनलाईन शिकवणे पलीकडे कुठल्याही सुविधा दिलेले नसताना पालक व विध्यार्थी यांचे पासून सक्तीने शुल्क वसुली करत आहेत ,
तसेच माघील वर्षीची फी न भरणाऱ्या विध्यार्थ्यांना निकालपत्र देखील दिले जात नाही ,तसेच सण 2021 ते 2022 वर्षाची प्रवेश देखील देने बंद करत आहेत व प्रवेश दिलेल्या विध्यार्थ्यना ऑनलाईन शिक्षणाची सुविधा देणार नाहीत असा दम देखील दिला जात आहे,
तसेच महानगरपालिका,जिल्हा परिषद, आदिवासी आश्रम शाळातील मुलांचे कोरोना काळात शिक्षण पूर्णतः बंद असल्याने त्यांना शिक्षण सुविधा उपलब्द करून देणे गरजेचे आहे, त्यांना टॅब किंवा मोबाईल फोन उपलब्द करून देण्यात यावेत व त्यांची शिक्षणाची गैरसोय दूर करावी
शाळांच्या मनमानीवर नियंत्रण आणणे करता आम आदमी पार्टीच्या वतीने आपणास दिनांक 3 जुन रोजी निवेदन देऊन देखील त्या बाबत आम आदमी पार्टीस कुठलाही खुलासा मिळालेला नाही
प्रमुख मागण्या
1,महानगरपालिका ,जिल्हा परिषद,आदिवासी आश्रम शाळेतील विध्यार्थ्यांना शिक्षण मिळणे करता टॅब किंवा मोबाईल फोन मोफत देण्यात यावा तसेच महानगरपालिका शाळेतील विध्यार्थ्यना ऑनलाईन शिक्षण सुरू करावे
2,माघील शैक्षणिक 2020ते 2021वर्षामध्ये वेगवेगळ्या सुविधांच्या नावाखाली फी घेउन देखील विध्यार्थ्यांना कुठलेही सुविधा न देता सक्तीने फी वसूल करणाऱ्या शाळा व कॉलेज यांची तपासणी करून विध्यार्थी व पालक याना फी परत करण्यात यावी
3,खाजगी शाळा व कॉलेज यानी शैक्षणिक फी वसुली करता कुठलेही सक्ती करू नये असे आदेश देण्यात यावे
4,नवीन सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्ष 2021 ते 2022 करता शाळा प्रवेशा करता 50 टक्के शुल्क कपात करण्यात यावी तसेच कुठलेही जादा शुल्क आकारण्यात येऊ नये
5,फी वसुली करता सक्ती करणाऱ्या तसेच विध्यार्थ्यांना त्रास देणाऱ्या सर्व खाजगी शाळा व कॉलेज यांच्यावर कारवाई करण्यात यावी
7,सर्व खाजगी शाळा व कॉलेजचे सन 2021 ते 2022 या शैक्षणिक वर्षाचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने देण्यात यावे
8,बिल्डिंग फंड तसेच डोनेशनच्या नावाने शुल्क घेणाऱ्या शाळा व कॉलेज वर कारवाई करण्यात यावी
8,प्रत्येक खाजगी शाळांचे लेखापरीक्षण करण्यात यावेत
9,खाजगी शाळा मध्ये फक्त ऑनलाईन शिकवणी शुल्क आकारण्यात यावे तसेच ज्या सुविधा विध्यार्थ्यांना कोरोना काळात शाळा बंद असल्याने मिळत नाहीत त्याचे शुल्क आकारण्यात येऊ नये
11,खाजगी शाळातील विध्यार्थ्यांचे गुणपत्रिका देण्यात याव्यात
11,दिनांक 3 जून रोजी दिलेल्या निवेदनावर काय कारवाई करण्यात आली त्या बाबत लेखी खुलासा मिळावा
12,खाजगी शाळा मध्ये कायदायच्या तरतुदी नुसार पालक शिक्षक संघ तयार करून मगच कार्यकारी समिती तयार करण्याचे आदेश देण्यात यावे
13,कायद्याच्या तरतुदी नुसार पालक शिक्षक संघ, कार्यकारी समिती, शाळेने ठरवलेली फी याचे फलक शाळेच्या दर्शनी भागात लावण्यात यावे
14,पालक व विधार्थी यांचे मदती करता तसेच शाळेच्या मनमानी वर नियंत्रण अनन्या करता हेल्पलाईन नंबर देण्यात यावे
खाजगी शाळांची सुरू असलेली मनमानी यावर नियंत्रण आणणे करता तसेच महानगरपालिका शाळेतील मुलाची होणारी शिक्षणाची गैरसोय दूर करण्यासाठी वरील मागण्याची लवकरात लवकर पूर्तता करण्यात यावी अन्यथा आम आदमी पार्टीचे वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देखील देण्यात आला निवेदनावर अँड प्रभाकर वायचळे ,अँड बंडूनाना डांगे ,अनिल कवशिक शहर उपाध्यक्ष ,जगमेर सिंग खालसा शहर सचिव ,अल्ताफ शेख मध्य विभाग प्रमुख ,नितीन भागवत शहर कार्यकारणी सदस्य ,विलास मोरे सक्रिय कार्यकर्ते यांच्या सह्या करण्यात आल्या आहेत
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME