अनेक दिवसांपासून बंद असलेल्या घंटा गाड्या नगर परिषदे कडुन शहर वासियांच्या सेवे साठी सुरू करण्यात आल्या.
अनेक दिवसांपासून बंद असलेल्या घंटा गाड्या नगर परिषदे कडुन शहर वासियांच्या सेवे साठी सुरू करण्यात आल्या.
नागरिकांनी सुखा व ओला कचरा घंटागाडय़ात टाकावे. न प अध्यक्ष पुनम पाटोळे.
लोणार तालुका विशेष प्रतिनिधी.
लोणार नगर परिषदे ने दिलेल्या घनकचरा व्यवस्थापनाचा कंत्राट संपल्या ने गेल्या अनेक दिवसांपासून घंटागाडय़ाचे काम बंद होते. या मुळे शहर वासियांना कोरोना काळात अनेक समस्या निर्माण झाली होती. शहराच्या प्रत्येक वार्डात रस्त्यात घाणिचे साम्राज्य जशे निर्माण झाले होते या कडे काही काळ न प चे दुर्लक्ष झाले होते. या कडे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष श्री गजानन अंकुशराव मापारी यांनी न प ला आठवण करून दिली की जगप्रसिद्ध लोणार शहर घाणिच्या विळख्यात सापडले आहे. घाणिच्या साम्राज्या बद्दल एका निवेदनाद्वारे शहराच्या प्रत्येक वार्डात व वाडाच्या प्रत्येक गल्ली बोळात घाणिच्या साम्राज्या मुळे परेशानीत व आरोग्याच्या दृष्टीने जिव धोक्यात येण्याची शक्यता आहे तरी नगर परिषदे ने या कडे लक्ष केंद्रित करावे. न प ने या बाबीवर लक्ष केंद्रित केले व जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सज्ज झाले. व सोमवारी 27 जुन 2021 पासून नवीनच गाड्यांचा उदघाटन करून गाड्या सुरू करण्यात आल्या. कोरोना सारख्या भयानक आजाराच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या दृष्टीकोनातून शहराची साफसफाई चे काम सुरू झाले भाजपा शहराध्यक्ष गजानन अंकुशराव मापारी दैनिकाच्या प्रतिनिधींनी बोलताना सांगितले की घाणी मुळे शहरवासीयांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता कोरोना काळात घाणिचे साम्राज्य असने म्हणजे नागरिकांच्या जिवाला मोठा धोकाच निर्माण होने असे वाटत होते घाणी मुळे मोकाट जनावरांचे सुळसुळाट झाले होते. 27 जुन पासून गाडी वाला आया धर से कचरा निकाल सुरू झाले. सकाळी 7 गाड्या व दुपारी तीन ते चार गाडय़ा दोन वेळेत शहरवासीयां साठी सुरू झाली. यात एकुण 22 मजुरांची टीम व दोन सुपरवायझर नेमण्यात आल्या चे कळते. अनेक दिवसांपासून जमा झालेला कचरा दोन वेळात सुरू झालेल्या गाड्या झपाटय़ाने कचरा गोळा करून कचरा कमी करतील. या कामाचे कंत्राट पुण्याची कंपनी (BHPL) ला देण्यात आले आहेत. या गाडीया चे उदधाटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्तव्यदक्ष सभापती श्री संतोष भाऊ मापारी. यांच्या हस्ते नारळ फोडून उदधाटण करण्यात आले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष श्री गजानन अंकुशराव मापारी. डॉ नेवरे. कॉग्रेस नेते साहेबराव पाटोळे. न प अध्यक्षा पुनम ताई पाटोळे. नगर सेवक गजानन जाधव. भाजपा चे सुंदर संचेती. आरोग्य अधिकारी आशोक निशचिन साहेब. आरोग्य विभागाचे शेख सलीम शेख रफीक. कंपनीचे लक्ष्मण कांबळे. व सौ सविता देवकाते अदि मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME