कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून पोलीस अधिकारी रस्त्यावर उतरले.

 कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून पोलीस अधिकारी रस्त्यावर उतरले.




नागरिकांनी नियमाचे पालन करावे. पोलीस उपनिरीक्षक भारत बरडे

लोणार तालुका विशेष प्रतिनिधी.

आज दिनांक 28-6-2021 सोमवार रोजी पोलीस अधिकारी जनतेच्या भल्या साठी व कोरोना ची तिसरी लाट रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन येणाऱ्या जाणाऱ्या अनेक गाडय़ांची तपासणी करून त्यांना मास्क लावून व विनाकारण फिरणाऱ्यांची विचार पुछ करुन समजून सांगितले की कोरोना सारख्या भयानक आजाराच्या प्रादुर्भाव आजुन गेला नाही. मागील एक ते दीड वर्षा पासुन कोरोना विषाणू चा प्रभाव  सुरू आहे. कोरोना ची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या लाटेचा धोका ओळखून आज दिनांक 28-6-2021 सोमवार रोजी पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरून नागरिकांना नियमाचे पालन करावे असे ही सांगत होते. आज आठवडी बाजार असल्याने अनेक खेड्यातले नागरिक लोणार ला बाजार करण्यासाठी येथे. त्या अनुषंगाने पोलीस अधिकारी विनायक चौक येथे होते. कारण की कोरोना चा तिसऱ्या लाटेत संसर्ग वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग सुरक्षेच्या नियम काटेकोर पणे पाळावे. कोरोना पासून वाचविण्यासाठी मास्क वापरणे. हात वारंवार स्वच्छ धुवावेत किंवा सॅनिटाईजर चा वापर करावे. सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करावे असे ही पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले या वेळी पोलीस उपनिरीक्षक भारत बरडे साहेब. सुरेश काळे साहेब. वाणी साहेब. ठाकरे साहेब. भोकरे साहेब. ट्राफिक पोलीस बंसोड साहेब अदि उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू