Posts

Showing posts from April, 2021

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट

Image
  वाशिम जिल्ह्यातील आजचा  कोरोना _ अलर्ट ( दि. ३० एप्रिल २०२१ ,  सायं. ५.०० वा.)   वाशिम जिल्ह्यात आणखी ४४८ कोरोना बाधित   वाशिम शहरातील अल्लाडा प्लॉट येथील १, अंबिका नगर येथील १, बालाजी नगर येथील १, सामान्य रुग्णालय परिसरातील ३, सिव्हील लाईन्स येथील १०, देवळे हॉस्पिटल परिसरातील १, देवपेठ येथील १, गणेशपेठ येथील २, गुप्ता ले-आऊट येथील ३, इनामदारपुरा येथील १, आययुडीपी कॉलनी येथील ७, लाखाळा येथील १, महाराणा प्रताप चौक येथील १, म्हाडा कॉलनी येथील २, मंत्री पार्क येथील १, निमजगा येथील ३, राजनी चौक येथील १, रेल्वे स्टेशन परिसरातील २, श्रावस्ती नगर येथील १, शुक्रवार पेठ येथील १, स्वराज कॉलनी येथील १, विनायक नगर येथील ३, योजना कॉलनी येथील २, योजना पार्क येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ८, अडोळी येथील २, जांभरुण परांडे येथील १, जांभरुण येथील १, कळंबा महाली येथील १, तांदळी बु. येथील १, काटा येथील ४, माळेगाव येथील ११, पंचाळा येथील १, पार्डी टकमोर येथील ३, सोंडा येथील १, तामसी येथील ८, तोरणाळा येथील ४, वाई येथील २, वारला येथील १२, झाकलवाडी येथील १, सुपखेला येथील १, हिवरा रोहिला...

डॉ.राजानंद पट्टेबहादुर यांना आचार्य पदवी बहाल.

Image
डॉ.राजानंद पट्टेबहादुर यांना आचार्य पदवी बहाल. वाशिम - ( युगनायक न्युज नेटवर्क )वाशिम नजीकच असलेल्या ग्राम केकतउमरा येथील डॉ.राजानंद सखाराम पट्टेबहादुर यांनी इतिहास विषयात मुंबई विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती (पीएच.डी) ही पदवी नुकतीच संपादन करण्याचा मान मिळविला आहे." वऱ्हाड (बेरार) प्रांतातील स्वातंत्र्य चळवळ 1885 - 1947,"  या विषयावर राजानंद पट्टेबहादुर यांनी व्ही जी वझे मुलुंड, मुंबई महाविद्यालयाच्या इतिहास संशोधन केंद्रातून संशोधन केले असून या केंद्रामार्फत आपला उपरोक्त विषयावर मुंबई विद्यापीठास प्रबंध सादर केला .पट्टेबहादूर यांना प्राचार्य डॉ.व्ही.के.खाडे यांनी मार्गदर्शन केले. पट्टेबहादूर हे मुळचे मु.पो.केकतऊमरा, जि.वाशिम येथिल असून ते सध्या बी.जे.हायस्कूल जि.प.ठाणे येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी या अगोदर एम.फिल,एम.एड,नेट (इतिहास) या पदव्या मिळवल्या आहेत. मुंबई विद्यापीठाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा डॉ.किशोर गायकवाड, मार्गदर्शक प्राचार्य डाॅ.व्ही.के.खाडे, प्राचार्य डॉ.शर्मा ,प्रा.डाॅ.प्रिता निलेश ,वझे केळकर मुलुंड  महाविद्यालयाचे सचिव डॉ एम आर कुरूप ,डॉ. दत्तात्रय...

प्रधानमंत्री स्वनिधी योजने ची माहिती करिता ऑनलाईन वेबिनार चे आयोजन

Image
  प्रधानमंत्री स्वनिधी योजने ची माहिती करिता ऑनलाईन वेबिनार चे आयोजन मनिवाइज वित्तीय साक्षरता केंद्र रिसोड चा उपक्रम रिसोड - भारतीय रिझर्व बँक ,स्टेट बँक ऑफ इंडिया, व नाबार्ड यांच्या माध्यमातून क्रिसील फाउंडेशन च्या सहकार्याने मनिवाइज वित्तीय साक्षरता केंद्र च्या अंतर्गत ऑनलाईन वेबिनार चे आयोजन दि 30 एप्रिल 2021 रोज शुक्रवार ला करण्यात आले आहे.                    प्रधानमंत्री स्वनिधी योजना ची प्रभावी पणे माहिती होण्यासाठी या वेबिनार चे आयोजन करण्यात आले आहे सदर वेबिनार ला प्रमुख मार्गदर्शक म्हणून नगरपरिषद रिसोड चे एनयुएलएम विभाग चे सहाय्यक प्रकल्प अधिकारी राजेंद्र पट्टेबहादुर लाभणार आहेत .     सदर वेबिनार चे आयोजन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्था पक दत्तात्रय निनावकर नाबार्ड चे सहाय्यक व्यवस्थापक विजय खंडरे क्रिसील फाउंडेशन मुंबई चे राज्य व्यवस्थापक शक्ती भिसे ,मनिवाइज चे जिल्हा समन्वयक सत्यपाल चक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.तरी जास्तीत जास्त लोकांनी या वेबिनार चा लाभ घ्यावा असे आव्हान मनिवाइज केंद्र कार्यालय रिसो...

संचारबंदी नियमांची काटेकोर अंमलबजावणी आवश्यक - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

Image
  संचारबंदी नियमांची काटेकोर अंमलबजावणी आवश्यक -   जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.   कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार ·    शहरी व ग्रामीण भागात संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी आवश्यक ·    नियमांचे उल्लंघन करणारे दुकानदार, आस्थापनाधारकांवर कठोर कारवाई करा वाशिम ,   दि. २९ (जिमाका) :   संचारबंदी नियमावलीची जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. शहरी व ग्रामीण भागामध्ये या अनुषंगाने कार्यवाही करण्याची जबाबदारी संबंधित शासकीय यंत्रणा प्रमुखांनी चोखपणे पार पाडावी. यामध्ये कोणत्याही प्रकारची कुचराई झाल्यास संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिला. दुरदृश्य प्रणालीद्वारे आज, २९ एप्रिल रोजी आयोजित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, जिल्हा शल्य चिकित...

पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा वाशिम जिल्हा दौरा

Image
  पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा वाशिम जिल्हा दौरा वाशिम ,   दि. २९ (जिमाका) :   राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता पणन राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे ३० एप्रिल व १ मे २०२१ रोजी वाशिम जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. पालकमंत्री श्री. देसाई यांचे ३० एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वाजता वाशिम शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व राखीव. सायंकाळी ५.३० वाजता त्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक होईल. १ मे रोजी सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास पालकमंत्री श्री. देसाई उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी ९ वाजता ते कोविड-१९ संसर्गाच्या अनुषंगाने जिल्हा रुग्णालय व महिला रुग्णालय येथे भेट देवून पाहणी करतील. सकाळी १० वाजता पालकमंत्री श्री. देसाई यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे खरीप हंगाम पूर्वतयारी व कोविड-१९ च्या अनुषंगाने आढावा बैठ...

कामगारांच्या समस्या निवारणासाठी नोडल अधिकारी नियुक्त

Image
कामगारांच्या समस्या निवारणासाठी नोडल अधिकारी नियुक्त मुंबई,  दि. 28 : कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील व इतर राज्यातील कामगारांकडून प्राप्त होणाऱ्या विविध तक्रारींसंबंधात कार्यवाही व्हावी, याकरिता मुंबई येथील कामगार आयुक्त कार्यालय व मुंबई शहर कार्यालयाकरिता नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. नोडल अधिकारी यांनी राज्यातील व इतर राज्यातील स्थलांतरीत कामगारांकडून होणाऱ्या तक्रारीच्या अनुषंगाने सर्व संबंधितांशी समन्वय साधून कार्यवाही करावयाची आहे. नोडल अधिकारी यांची माहिती : सतिश तोटावार, सहाय्यक कामगार आयुक्त, भ्रमणध्वनी क्र. 9960613756, ई-मेल  adclkokandivision@gmail.com . मंगेश झोले, सरकारी कामगार अधिकारी, भ्रमणध्वनी क्र. 8451846222,  प्रविण जाधव, सहायक कामगार आयुक्त, भ्रमणध्वनी क्र. 8329695218,  ई-मेल dyclmumbaicity  gmail.com  कामगार आयुक्त कार्यालय, मुंबई (मुंबई मुख्यालय) मुंबई शहर कार्यालय, मुंबई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या सूचना

Image
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या सूचना मुंबई, दि. २८ : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या तरतुदी विचारात घेऊन राज्यात यंदा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१वा वर्धापन दिन समारंभ गतवर्षी प्रमाणेच अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात यावा, अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेमार्फत आज निर्गमित करण्यात आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाने कोविड-१९ च्या अनुषंगाने दिलेल्या सुरक्षित वावर व इतर सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे. सर्वांसाठी मास्क बंधनकारक राहील, याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाबाधितांची वाढती रुग्ण संख्या विचारात घेऊन कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी (Break The Chain) व या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने १३ एप्रिल २०२१ च्या आदेशान्वये १ मे २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात संचारबंदीसह कडक निर्बंध लागू केले आहेत. या तरतुदी विचारात घेऊन राज्यात महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन समारंभ गतवर्षी प्रमाणेच अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या दृष्टीने व...

लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना मिळणार टोकन

Image
  लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना मिळणार टोकन वाशिम ,   दि. २९ (जिमाका) :   जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वर्षांवरील व्यक्तींना कोविड -१९ लसीकरण सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात लसीकरणाचा वेग व व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. लसीकरण केंद्रावर नागरिक लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहे. त्याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न झाल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष षण्मुगराजन एस. यांनी एका आदेशाद्वारे सर्व तहसीलदार ,  गटविकास अधिकारी ,  नगर परिषद व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी ,  तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधीक्षक यांना लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने नागरिकांना लसीकरणासाठी टोकन प्रणाली वाटपाची कार्यपद्धती व जबाबदारीचे एकत्रितपणे नियोजन करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत.

‘महिलांनी घडविलेला महाराष्ट्र’ या विषयावर उद्या निवेदिका क्ष‍िप्रा मानकर यांचे व्याख्यान

Image
‘महिलांनी घडविलेला महाराष्ट्र’ या विषयावर उद्या निवेदिका क्ष‍िप्रा मानकर यांचे व्याख्यान   नवी दिल्ली, दि. 29 : सुप्रसिद्ध निवेदिका क्षिप्रा मानकर या ‘महिलांनी घडविलेला महाराष्ट्र’ या विषयावर उद्या शुक्रवार, दिनांक 30 एप्रिल 2021 रोजी महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे 38 वे पुष्प गुंफणार आहेत. महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेली 60 वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने 19 मार्च 2021 पासून “महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला” सुरु आहे. या व्याख्यानमालेत 30 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता क्ष‍िप्रा मानकर या ‘महिलांनी घडविलेला महाराष्ट्र’ या विषयावर विचार मांडणार आहेत. क्षिप्रा मानकर यांच्या विषयी मूळच्या अमरावतीच्या असणाऱ्या क्ष‍िप्रा मानकर या उत्कृष्ट निवेदिका,  समुपदेशक म्हणून प्रसिद्ध आहेत. अमरावती विद्यापीठातून बी.एस.सी. पूर्ण केले. यासह त्यांनी पत्रकारितेत, समाजकार्य या विषयात पदवीत्तोर शिक्षण पूर्ण केले. अमरावतीतील स्थानिक आरसीएन या डिजिटल माध्यमांच्या त्या संचालक आहेत. त्यां...

डॉ.हुसेन रुग्णालय दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाखांचे धनादेशाद्वारे वितरण : पालकमंत्री छगन भुजबळ

Image
डॉ.हुसेन रुग्णालय दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाखांचे धनादेशाद्वारे वितरण : पालकमंत्री छगन भुजबळ   नाशिक, दि.२९ (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक महानगरपालिकेच्या डॉ.झाकिर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेत कोविड कक्षातील 22 रुग्णांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत शासनाने जाहीर केली होती. त्याप्रमाणे मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ऑक्सिजन दुर्घटनेत मृत झालेल्या 22 रुग्णांपैकी 16 मृतांच्या वारसांना पाच लाख रुपये मदतीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले असून उर्वरीत 6 जणांचे तांत्रिक बाबींची पूर्तता करुन लवकरच त्यांना देखील धनादेश अदा करण्यात येतील, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. या वारसांना करण्यात आले धनादेशाचे वितरण: ऑक्सिजन दुर्घटनेत मृत झालेले अमरदीप नारायण नगराळे यांचे वारस म्हणून त्यांच्या पत्नी मंगला नगराळे यांना धनादेश अदा करण्यात आलेला आहे. भ...

कोरोना_अलर्ट

Image
  कोरोना _ अलर्ट ( दि. २९ एप्रिल २०२१ ,  सायं. ५.०० वा.)   वाशिम जिल्ह्यात आणखी ५२४ कोरोना बाधित   वाशिम शहरातील आयशा मस्जिद परिसरातील १, अकोला नाका परिसरातील २, सामान्य रुग्णालय परिसरातील २, सिव्हील लाईन्स येथील ३, दंडे चौक येथील १, गद्दिपुरा येथील १, गवळीपुरा येथील १, हिंगोली नाका येथील १, आययुडीपी कॉलनी येथील २, काटीवेस येथील १, लाखाळा येथील ३, मदिना मस्जिद परिसरातील १, नालंदा नगर येथल १, जुनी नगरपरिषद परिसरातील ३, रेनॉल्ड हॉस्पिटल परिसरातील १, स्वागत लॉन जवळील १, व्यंकटेश कॉलनी येथील १, काटा रोड येथील १, देवपेठ येथील २, बसस्थानक मागील २, गणेशपेठ येथील १, विनायक नगर येथील १, काळे फाईल येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, अनसिंग येथील ७, देपूळ येथील १, देवठाणा येथील १, जांभरुण नावजी येथील ६, जांभरुण येथील १, काकडदाती येथील ११, कार्ली येथील १, नागठाणा येथील १०, पार्डी टकमोर येथील २, सावंगा जहांगीर येथील १, सार्सी येथील १, सावरगाव बर्डे येथील १, शेलू येथील १, सोनखास येथील १, तामसाळा येथील १, तामसी येथील १, तांदळी येथील २, तोंडगाव येथील १, उकळीपेन येथील १, उमराळा येथील १, ...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेसाठी ५ मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Image
  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेसाठी ५ मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन वाशिम ,   दि. २७ (जिमाका) :   तालुका कृषि अधिकारी कार्यालय, वाशिमकरिता राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेसाठी सन २०२०-२१ या आर्थिक वर्षामध्ये रोपवाटिका अंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी एक लक्षांक शिल्लक असून याकरिता पात्र शेतकऱ्यांनी ५ मे २०२१ पर्यंत वाशिम तालुका कृषि अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन वाशिमचे तालुका कृषि अधिकारी यांनी केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची किमान ०.४० हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. रोपवाटिका उभारणीसाठी पाण्याची कायमस्वरूपी सोय असावी. कृषि पदविकाधारक महिला यांना प्रथम प्राधान्य राहील, महिला गट किंवा महिला शेतकरी यांना द्वितीय प्राधान्य, भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी व शेतकरी गट यांना तृतीय प्राधान्य राहील. प्राप्त अर्जांची छाननी करून लकी ड्रॉ पद्धतीने निवड करण्यात येईल, असे वाशिमचे तालुका कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना कोरोना_अलर्ट

Image
  वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना  कोरोना _ अलर्ट ( दि. २८ एप्रिल २०२१ ,  सायं. ५.०० वा.)   वाशिम जिल्ह्यात आणखी ३३० कोरोना बाधित   वाशिम शहरातील संतोषी माता नगर येथील १, अकोला नाका येथील २, अयोध्या नगर येथील १, बागवानपुरा येथील १, बाळू चौक येथील १, भवानी नगर येथील १, चंडिकावेस येथील १, सिव्हील लाईन्स येथील ७, दत्त नगर येथील ३, देवळे ले-आऊट येथील १, ज्ञानेश्वर नगर येथील १, ड्रीमलँड सिटी येथील ४, शासकीय निवासस्थान परिसरातील ५, गोंदेश्वर येथील ३, गुप्ता ले-आऊट येथील १, आययुडीपी कॉलनी येथील १३, जवाहर कॉलनी येथील १, काळे फाईल येथील ५, लाखाळा येथील १०, माधव नगर येथील १, महेश नगर येथील ३, नगरपरिषद परिसरातील १, निमजगा येथील २, पाटणी चौक येथील १, पुसद नाका येथील २, सिंधी कॅम्प येथील १, शुक्रवार पेठ येथील ४, विनायक नगर येथील ५, योजना कॉलनी येथील १, काटा रोड येथील १, हनुमान मंदिर परिसरातील १, योजना पार्क येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ४, अनसिंग येथील १, बाभूळगाव येथील २, देगाव येथील १, देपूळ येथील ३, धुमका येथील १, फाळेगाव येथील १, गिव्हा येथील १, जयपूर येथील १, केकतउमरा येथी...

‘औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ वेब पोर्टलचे उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अनावरण

Image
  ‘औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ वेब पोर्टलचे उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अनावरण मुंबई, दि. 28 : केंद्रीय सांख्य‍िकी कार्यालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या अधिपत्याखालील अर्थ व सांख्य‍िकी संचालनालय व उद्योग विभागाच्या अधिपत्याखालील उद्योग संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे. या वेब पोर्टलचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या दि. 29 एप्रिल, 2021 रोजी सकाळी 10.30 वा. उपमुख्यमंत्री यांच्या दालनात करण्यात येणार आहे, असे अर्थ व सांख्यिकी संचालनालय यांच्यामार्फत कळविण्यात आले आहे.