पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा वाशिम जिल्हा दौरा
पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा वाशिम जिल्हा दौरा
वाशिम, दि. २९ (जिमाका) : राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता पणन राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे ३० एप्रिल व १ मे २०२१ रोजी वाशिम जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
पालकमंत्री श्री. देसाई यांचे ३० एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वाजता वाशिम शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व राखीव. सायंकाळी ५.३० वाजता त्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक होईल.
१ मे रोजी सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास पालकमंत्री श्री. देसाई उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी ९ वाजता ते कोविड-१९ संसर्गाच्या अनुषंगाने जिल्हा रुग्णालय व महिला रुग्णालय येथे भेट देवून पाहणी करतील. सकाळी १० वाजता पालकमंत्री श्री. देसाई यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे खरीप हंगाम पूर्वतयारी व कोविड-१९ च्या अनुषंगाने आढावा बैठक होणार आहे. दुपारी १२.३० ते २ वाजेपर्यंत वाशिम शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दुपारी २ वाजता वाशिम येथून जालनाकडे प्रयाण करतील.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME