प्रधानमंत्री स्वनिधी योजने ची माहिती करिता ऑनलाईन वेबिनार चे आयोजन
प्रधानमंत्री स्वनिधी योजने ची माहिती करिता ऑनलाईन वेबिनार चे आयोजन
मनिवाइज वित्तीय साक्षरता केंद्र रिसोड चा उपक्रम
रिसोड - भारतीय रिझर्व बँक ,स्टेट बँक ऑफ इंडिया, व नाबार्ड यांच्या माध्यमातून क्रिसील फाउंडेशन च्या सहकार्याने मनिवाइज वित्तीय साक्षरता केंद्र च्या अंतर्गत ऑनलाईन वेबिनार चे आयोजन दि 30 एप्रिल 2021 रोज शुक्रवार ला करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री स्वनिधी योजना ची प्रभावी पणे माहिती होण्यासाठी या वेबिनार चे आयोजन करण्यात आले आहे सदर वेबिनार ला प्रमुख मार्गदर्शक म्हणून नगरपरिषद रिसोड चे एनयुएलएम विभाग चे सहाय्यक प्रकल्प अधिकारी राजेंद्र पट्टेबहादुर लाभणार आहेत .
सदर वेबिनार चे आयोजन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्था पक दत्तात्रय निनावकर नाबार्ड चे सहाय्यक व्यवस्थापक विजय खंडरे क्रिसील फाउंडेशन मुंबई चे राज्य व्यवस्थापक शक्ती भिसे ,मनिवाइज चे जिल्हा समन्वयक सत्यपाल चक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.तरी जास्तीत जास्त लोकांनी या वेबिनार चा लाभ घ्यावा असे आव्हान मनिवाइज केंद्र कार्यालय रिसोड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME