डॉ.राजानंद पट्टेबहादुर यांना आचार्य पदवी बहाल.
डॉ.राजानंद पट्टेबहादुर यांना आचार्य पदवी बहाल.
वाशिम - (युगनायक न्युज नेटवर्क)वाशिम नजीकच असलेल्या ग्राम केकतउमरा येथील डॉ.राजानंद सखाराम पट्टेबहादुर यांनी इतिहास विषयात मुंबई विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती (पीएच.डी) ही पदवी नुकतीच संपादन करण्याचा मान मिळविला आहे." वऱ्हाड (बेरार) प्रांतातील स्वातंत्र्य चळवळ 1885 - 1947," या विषयावर राजानंद पट्टेबहादुर यांनी व्ही जी वझे मुलुंड, मुंबई महाविद्यालयाच्या इतिहास संशोधन केंद्रातून संशोधन केले असून या केंद्रामार्फत आपला उपरोक्त विषयावर मुंबई विद्यापीठास प्रबंध सादर केला .पट्टेबहादूर यांना प्राचार्य डॉ.व्ही.के.खाडे यांनी मार्गदर्शन केले. पट्टेबहादूर हे मुळचे मु.पो.केकतऊमरा, जि.वाशिम येथिल असून ते सध्या बी.जे.हायस्कूल जि.प.ठाणे येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी या अगोदर एम.फिल,एम.एड,नेट (इतिहास) या पदव्या मिळवल्या आहेत. मुंबई विद्यापीठाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा डॉ.किशोर गायकवाड, मार्गदर्शक प्राचार्य डाॅ.व्ही.के.खाडे, प्राचार्य डॉ.शर्मा ,प्रा.डाॅ.प्रिता निलेश ,वझे केळकर मुलुंड महाविद्यालयाचे सचिव डॉ एम आर कुरूप ,डॉ. दत्तात्रय वाघ व प्रा डाॅ प्रिती बगाडे यांचे डॉ.राजानंद पट्टेबहादुर यांनी खास आभार मानले आहेत.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानी प्रेरित होऊन त्यांनी ही पदवी प्राप्त केली आहे.कालकथित शांताबाई सखारामजी पट्टेबहादुर आणि आयु. भिमराव सोनवणे यांच्या आशीर्वादाने आणि प्रा.डाॅ दिपक बनसोड , प्रा.डाॅ.सुरेश भदरगे यांच्या सहकार्याने त्यांनी आपले संशोधनकार्य पूर्ण केले आहे.आचार्य पदवी मिळाल्या बद्दल त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक व अभिनंदन होत आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME