‘महिलांनी घडविलेला महाराष्ट्र’ या विषयावर उद्या निवेदिका क्ष‍िप्रा मानकर यांचे व्याख्यान


‘महिलांनी घडविलेला महाराष्ट्र’ या विषयावर उद्या निवेदिका क्ष‍िप्रा मानकर यांचे व्याख्यान



 नवी दिल्ली, दि. 29 : सुप्रसिद्ध निवेदिका क्षिप्रा मानकर या ‘महिलांनी घडविलेला महाराष्ट्र’ या विषयावर उद्या शुक्रवार, दिनांक 30 एप्रिल 2021 रोजी महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे 38 वे पुष्प गुंफणार आहेत.

महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेली 60 वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने 19 मार्च 2021 पासून “महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला” सुरु आहे. या व्याख्यानमालेत 30 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता क्ष‍िप्रा मानकर या ‘महिलांनी घडविलेला महाराष्ट्र’ या विषयावर विचार मांडणार आहेत.

क्षिप्रा मानकर यांच्या विषयी

मूळच्या अमरावतीच्या असणाऱ्या क्ष‍िप्रा मानकर या उत्कृष्ट निवेदिका,  समुपदेशक म्हणून प्रसिद्ध आहेत. अमरावती विद्यापीठातून बी.एस.सी. पूर्ण केले. यासह त्यांनी पत्रकारितेत, समाजकार्य या विषयात पदवीत्तोर शिक्षण पूर्ण केले. अमरावतीतील स्थानिक आरसीएन या डिजिटल माध्यमांच्या त्या संचालक आहेत. त्यांनी अमरावतीमधील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा स्त्री रूग्णालय, जिल्हा सामान्य रूग्णालय (असंसर्गजन्य रोग नियंत्रण अभियान) समुपदेशक म्हणून काम केलेले आहे. त्या अनेक विषयांवर व्याख्याने देत असतात.

श्रीमती मानकर यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये अमरावती विद्यापीठाचा उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेविका पुरस्कार, उत्कृष्ट एनएसएस फर्स्ट कलर होल्डर पुरस्कार, उत्कृष्ट वक्ता पुरस्कार असे विविध पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण

शुक्रवार, दिनांक 30 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी 7 वाजता परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटर हँडल, फेसबुक आणि युट्यूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे ‍मराठी  ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi  आणि ‍ इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI, फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/ आणि फेसबुक मीडिया ग्रुप

https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share  तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi युट्यूब चॅनेल वर पाहता येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू