पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेसाठी ५ मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेसाठी
५ मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
वाशिम, दि. २७ (जिमाका) : तालुका कृषि अधिकारी कार्यालय, वाशिमकरिता राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेसाठी सन २०२०-२१ या आर्थिक वर्षामध्ये रोपवाटिका अंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी एक लक्षांक शिल्लक असून याकरिता पात्र शेतकऱ्यांनी ५ मे २०२१ पर्यंत वाशिम तालुका कृषि अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन वाशिमचे तालुका कृषि अधिकारी यांनी केले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची किमान ०.४० हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. रोपवाटिका उभारणीसाठी पाण्याची कायमस्वरूपी सोय असावी. कृषि पदविकाधारक महिला यांना प्रथम प्राधान्य राहील, महिला गट किंवा महिला शेतकरी यांना द्वितीय प्राधान्य, भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी व शेतकरी गट यांना तृतीय प्राधान्य राहील. प्राप्त अर्जांची छाननी करून लकी ड्रॉ पद्धतीने निवड करण्यात येईल, असे वाशिमचे तालुका कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.
फक्त वाशिम पर्यंतच मर्यादित आहे का हि योजना ?
ReplyDelete