लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना मिळणार टोकन

 लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना मिळणार टोकन




वाशिम, दि. २९ (जिमाका) : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वर्षांवरील व्यक्तींना कोविड -१९ लसीकरण सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात लसीकरणाचा वेग व व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. लसीकरण केंद्रावर नागरिक लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहे. त्याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न झाल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष षण्मुगराजन एस. यांनी एका आदेशाद्वारे सर्व तहसीलदारगटविकास अधिकारीनगर परिषद व नगरपंचायतीचे मुख्याधिकारीतालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधीक्षक यांना लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने नागरिकांना लसीकरणासाठी टोकन प्रणाली वाटपाची कार्यपद्धती व जबाबदारीचे एकत्रितपणे नियोजन करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत.

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू