‘औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ वेब पोर्टलचे उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अनावरण

 ‘औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ वेब पोर्टलचे उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अनावरण


मुंबई, दि. 28 : केंद्रीय सांख्य‍िकी कार्यालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या अधिपत्याखालील अर्थ व सांख्य‍िकी संचालनालय व उद्योग विभागाच्या अधिपत्याखालील उद्योग संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे.

या वेब पोर्टलचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या दि. 29 एप्रिल, 2021 रोजी सकाळी 10.30 वा. उपमुख्यमंत्री यांच्या दालनात करण्यात येणार आहे, असे अर्थ व सांख्यिकी संचालनालय यांच्यामार्फत कळविण्यात आले आहे.


Comments

Popular posts from this blog

राज्यातील १ हजार ८०० तरुणांना मिळणार डिजिटल मार्केटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशिक्षण

‘मुंबई’चा वारसा सांस्कृतिक एकजुटीचा – ज्येष्ठ पत्रकार तथा खासदार कुमार केतकर

ग्रामीण उत्पादनाच्या ऑनलाईन मार्केटिंगवर भर द्या – कृषी व पदुम विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार मत्स्य उत्पादन, किसान क्रेडिट कार्ड वाटपात प्रगतीची आवश्यकता