Posts

शिरूर कासार येथील युवा सोनार व्यापारी विशाल कुलथे यांचा खून करणाऱ्या गुन्हेगारास कठोर शिक्षा द्या.

Image
शिरूर कासार येथील युवा सोनार व्यापारी विशाल कुलथे यांचा खून करणाऱ्या गुन्हेगारास कठोर शिक्षा द्या. (निवेदन देतांना सोनार समाज बांधव) नाशिक दि :- 31 ( जिल्हा प्रतिनिधी )   शिरूर कासार येथील युवा सोनार व्यापारी विशाल कुलथे यांचा खून करणाऱ्या गुन्हेगारास कठोर शिक्षा व्हावी.व तो खटला फास्ट स्ट्रॅक वर चालववा यासाठी नाशिक येथील सोनार समाजाच्या वतीने  मा. जिल्हाधिकारी साहेब.तसेच मा. तहसीलदार साहेब नाशिक.निवेदन देन्यात आले.या वेळी अमोल बाविसकर,महेंद्र डहाळे ,योगेश मैड,योगेश कुलथे, राहुल काजाळे प्रविन नागरे, आकाश नागरे तसेच सोनार समाज बांधव ऊपस्थीत होते.

स्वच्छता हिच आजारावरील औषध होय ... ........ अ‍ॅड रवी. एन.कांबळे.

Image
  स्वच्छता हिच आजारावरील औषध होय   . -अ‍ॅड रवी. एन.कांबळे.   अ‍ॅड रवी. एन.कांबळे.   जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक संपर्क क्रमांक 8208965759 .  मित्रानो ... शरीर म्हटलं  की स्वच्छता हा विषय दुर राहु शकत नाही.  त्यामुळे शरीरावर घाणीचे सम्राज्य असेल तर आजर हे होणारच .त्यातच आज करोना महामारी मध्ये जिवंत राहायचे असेल तर स्वच्छता हा विषय दुर कसा राहणार त्यातच मास्क बद्दल समाजामध्ये व लोकांमध्ये समज कमी  गैरसमज ज्यास्त आहे त्यामुळे माझ्या अनुभवावरून स्वच्छता व मास्क  हा लेख जनहितार्थ लिहीत आहे .कृपाया हा नो लेख सामान्य माणसा पर्यंत  पोहचने आज रोजी काळाची गरज आहे ............मास्क च्या उपयोगा बद्दल जेवढे ऐकावयास मिळते तेवढे कुठेही सांगितले जात नाही.परंतु दुरुपयोगा बद्दल कोणीही स्पष्ट मत व्यक्त करतो .तेव्हा बहुतेक लोक दुर्लक्ष्य करतात, तेव्हा आपल्या शरिराला आवश्यक असलेल्या ऑक्सिजन ची लेव्हल कमी होते, त्याला ज्यास्त प्रमाणात म्हणजे 24 तास   पर्यंत  मास्क ठेवल्यास लोक विविध आजाराला बळी पडू शकतात शरीरातील ऑक्सिजन लेव्हल कमी होणे ही ए...

ॲड.सुरेश आव्हाड व राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी ओ.बी.सी.सेल च्या दणक्याने पुरवठा यंञणा जागी झाली असुन विविध रेशण दुकानांची तपासणी सुरु झाली आहे.

Image
ॲड.सुरेश आव्हाड व राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी ओ.बी.सी.सेल च्या दणक्याने पुरवठा यंञणा जागी झाली असुन विविध रेशण दुकानांची तपासणी सुरु झाली आहे. नाशिक प्रतिनिधी ॲड रवि कांबळे नांदगाव तालुक्यातील गरीब व पाञ कार्डधारकांना रेशणवरील धान्य मिळत नसल्याची तक्रार प्राप्त होताच नांदगाव येथील तहसीलदार उदय कुलकर्णी यांची ॲड.सुरेश आव्हाड यांनी भेट घेऊन निवेदन देण्यात आले.सदरील निवेदनामधे कार्डधारकांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळावे, धान्याचा काळाबाजार करणार्या रेशण दुकानांची चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असुन सदरील मागण्यांची वेळीच दखल न घेतल्यास मोठे जनांदोलन छेडण्याचा ईशारा ॲड.सुरेश आव्हाड यांनी यावेळी दिला. सदरील निवेदणाची दखल घेऊन विविध दुकानांची पाहणी व चौकशी करण्याचे आदेश तहसीलदार साहेबांनी दिले असुन दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासण देखील यावेळी दिले आहे. रेशन व्यवस्थे बाबत कुठल्याही प्रकारच्या तक्रारी असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन ॲड.सुरेश आव्हाडयांनी केले संपर्क क्र ९७६७९६२००७

म्युकरमायकोसिसवर जन आरोग्य योजनेअंतर्गत आठ रुग्णांलयात होणार मोफत उपचार : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

Image
  म्युकरमायकोसिसवर जन आरोग्य योजनेअंतर्गत आठ रुग्णांलयात होणार मोफत उपचार : जिल्हाधिकारी सूरज मांढरे नाशिक ,  दि .30  मे  2021 ( युगनायक  न्युज नेटवर्क ) :  महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतंर्गत व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतंर्गत म्युकरमायकोसिस रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत असून, नाशिकमधील आठ रुग्णालयांत या आजरावर उपचार मोफत करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. या प्रसिद्धी पत्रकात जिल्हाधिकारी श्री. मांढरे म्हणतात, दिलासादायक म्हणजे म्युकरमायकोसिस रुग्णांवर उपचारासाठी लागणारी ‘अँटी फंगल’ आणि ‘एम्फोटेरीसिन बी’ इंजेक्शन ही औषधे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, नाशिक यांचेमार्फत रुग्णालयांना मोफत पुरविण्यात येत आहेत. महत्वाचे म्हणजे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांना योजनेत समाविष्ट रुग्णालयांमध्ये उपचारार्थ दाखल होऊन उपचार घेणे आवश्यक आहे. तसेच सदर योजना ही कॅशलेस पद्धतीने राबविली जात असून योजनेचा लाभ घेण्याकरिता  रुग्णालयात रुग्णांस भरती करतेवेळी कोणतेही रेशन कार्ड ...

नाशिक जिल्हा रेड झोन बाहेर कायम राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा : पालकमंत्री छगन भुजबळ

Image
नाशिक जिल्हा रेड झोन बाहेर कायम राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा : पालकमंत्री छगन भुजबळ नाशिक , दि.  30 ( युगनायक न्युज नेटवर्क ) :  जिल्ह्यात कडक निर्बंधामुळे कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली असली तरी, मृत्यूदर अजून घटलेला नाही. कोरोना पॉझिटिव्हीटी रेट कमी करण्याच्या दृष्टीने व जिल्हा रेड झोन बाहेर कायम राहण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन राज्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. आज येवला शासकीय विश्रामगृह येथे आयोजित येवला व निफाड तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती व उपाय योजनांचा व‍ विकास कामांचा आढावा  बैठकीत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर प्रांताधिकारी सोपान कासार (येवला), डॉ.अर्चना पठारे (निफाड) तहसीलदार प्रमोद हिले, शरद घोरपडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत खैरे, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.शैलजा कृपास्वामी, गट विकास अधिकारी उन्मेष देशमुख, संदीप कराड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता उन्मेश पाटील, तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी, येवला शहर पोलीस स्ट...

व्यवसाय प्रशिक्षण संस्था म्हणून सहभागासाठी मुंबईतील रुग्णालये, प्रशिक्षण संस्थांना संपर्क साधण्याचे आवाहन

Image
व्यवसाय प्रशिक्षण संस्था म्हणून सहभागासाठी मुंबईतील रुग्णालये, प्रशिक्षण संस्थांना संपर्क साधण्याचे आवाहन   मुंबई , ( युगनायक न्युज नेटवर्क )दि. ३० : साथीच्या रोगाशी संबंधित उद्भवलेल्या परिस्थितीत आरोग्य व वैद्यकीय क्षेत्राला कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी राज्यातील आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छूक असलेल्या युवक-युवतींना हेल्थकेअर, मेडीकल, नर्सिंग व डोमेस्टीक हेल्थकेअर वर्कर क्षेत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये व्यवसाय प्रशिक्षण संस्था म्हणून सहभागी होण्यासाठी मुंबई उपगनर व मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छूक शासकीय व खाजगी रूग्णालये, शासकीय वैद्यकीय प्रशिक्षण संस्था यांनी तसेच या योजनेतून प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनीही संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त यांच्यामार्फत करण्यात आले आहे. पॅरामेडिकल विषयक कुशल मनुष्यबळ निर्मिती सध्याच्या कोरोना संसर्गाच्या स्थितीत आरोग्य क्षेत्र अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहे. तथापि या क्षेत्रात विशेषत: पॅरामेडिकल विषयक कुशल मनुष्यब...

जिल्ह्यात ५५ ऑक्सिजन जनरेशन प्लांटच्या माध्यमातून ५० मेट्रिक टन ऑक्सिजनची होणार निर्मिती : पालकमंत्री छगन भुजबळ

Image
  जिल्ह्यात ५५ ऑक्सिजन जनरेशन प्लांटच्या माध्यमातून ५० मेट्रिक टन ऑक्सिजनची होणार निर्मिती : पालकमंत्री छगन भुजबळ नाशिक ,   दि .  ३० ( युगनायक न्युज नेटवर्क )   :   जिल्ह्यात सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये एकूण ५५ ठिकाणी ऑक्सिजन जनरेशन प्लांटच्या माध्यमातून ५० मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होणार असून जिल्हा ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्ण होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज येवला येथील ऑक्सिजन जनरेशन प्लांट व रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी येवला नगरपालिकेचे नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर ,  जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे ,  पंचायत समिती सदस्य मोहन शेलार ,  नगरपालिका गटनेते प्रवीण बनकर ,  प्रांताधिकारी सोपान कासार ,  तहसीलदार प्रमोद हिले ,  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात ,  निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत खैरे ,  वैद्यकीय अधिकारी डॉ.शैलजा कृपास्वामी ,  तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी ,  येवला शहर पोलीस...

आवश्यकतेनुसार खत, बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध – कृषीमंत्री दादाजी भुसे

Image
  आवश्यकतेनुसार खत, बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध – कृषीमंत्री दादाजी भुसे औरंगाबाद , दिनांक 30 ( युगनायक न्युज नेटवर्क ) :- जिल्हयात खरीप हंगामाच्या दृष्टीने सर्व शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार मुबलक प्रमाणात खत, बियाणे उपलब्ध करुन देण्याचे कृषी विभागाचे नियोजन असल्याची माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगाम आढावा बैठकी नंतर आयोजित पत्रकार परिषदेत श्री. भुसे बोलत होते. या वेळी फलोत्पादन व रोहयो मंत्री संदीपान भूमरे, महसूल  व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे, आमदार रमेश बोरनारे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले उपस्थित होते. कृषीमंत्री श्री. भुसे यांनी जिल्हयाला आवश्यक प्रमाणात खतांची, बियाणांची उपलब्धता ठेवण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत असून खत, बी, बियाणे याची कुठल्याही प्रकारची कमतरता भासणार नाही  असे  सांगूण श्री. भुसे यांनी शेतकऱ्याची युरीयाची मागणी ही जास्त असल्याने त्या वाढीव प्रमाणात युरीया, इतर खत उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे प्रधानमंत्र...

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट

Image
  वाशिम जिल्ह्यातील आजचा  कोरोना_अलर्ट (दि. ३० मे २०२१, सायं. ५ वा.)   वाशिम जिल्ह्यात आणखी १०८ कोरोना बाधित; १२४ जणांना डिस्चार्ज वाशिम :  बालाजी मंदिर जवळ- १ ,  शुक्रवार पेठ- १, शहरातील इतर ठिकाणचे- २, अनसिंग- ३, घोटा- १, काजळंबा- १, पार्डी टकमोर- १, तामसी- १, उकळीपेन- २, वाई- १, एकांबा- ४, माळेगाव- १. मालेगाव :  शहरातील- २, बोर्डी- १, ब्राह्मणवाडा- १, चिवरा- १, दुधाळा- २, जऊळका- १, पांगरी धनकुटे- १, शेलगाव- १, शिरपूर- १, वारंगी- १. रिसोड :  शहरातील- २, आसेगाव- १, चिखली- १, घोटा- १, खडकी सदार- १, रिठद- १, वाडी- १. मंगरूळपीर :  पोस्ट ऑफीस जवळ- १, शहरातील इतर ठिकाणचे- ४, आजगाव- १, अरक- १, कंझारा- २, पार्डी ताड- १, दाभा- १, धोत्रा- १, गणेशपूर- १, घोटा- १, कळंबा- १, पोटी- १, सनगाव- १, शेलूबाजार- ३, मोहरी- १. कारंजा लाड :  गरीब नवाज कॉलनी- १, प्रियदर्शनी कॉलनी- १, औरंगापूर- १, दिघी- ३, कामरगाव- १, खानापूर- १, लाडेगाव- ४, मनभा- २, मेहा- १, पिंप्री मोडक- ३, सोमठाणा- १, वढवी- १, विळेगाव- २, विरगव्हाण- १, पलाना- १. मानोरा :  जोतिबा नगर- १, भिलड...

प्रतिबंधानंतर पर्यटकांच्या सेवेसाठी एमटीडीसी होतेय सज्ज

Image
  प्रतिबंधानंतर पर्यटकांच्या सेवेसाठी एमटीडीसी होतेय सज्ज कर्मचाऱ्यांना आदरातिथ्य आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे ऑनलाईन प्रशिक्षण मुंबई ,( युगनायक न्युज नेटवर्क ) दि. 30 : सध्याच्या साथीच्या काळामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) पर्यटक निवासात साफसफाई, दुरुस्ती आणि निर्जंतुकीकरणाची कामे सुरु आहेत. त्याचबरोबर आता सध्याच्या प्रतिबंधात्मक कालावधीत एमटीडीसीमार्फत सर्व कर्मचाऱ्यांना विविध विषयांवर ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येत आहे.  महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील यांच्या संकल्पनेतून आणि उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांच्या नियोजनानुसार ही प्रशिक्षणे आयोजित करण्यात आली आहेत. महामंडळाचे पुणे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे यांनी ही माहिती दिली. एमटीडीसी आणि पुणे येथील महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षणे होत आहेत. या कौशल्य विकास प्रशिक्षणाअंतर्गत फ्रंट ऑफीस मॅनेजमेंट (Front Office Management) हाऊस किपींग (House Keeping) आणि फुड ॲण्ड बेवरेजेस (Food and Be...

जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरणाचा निर्णय कायम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांचे स्पष्टीकरण

Image
  जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरणाचा निर्णय कायम  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांचे स्पष्टीकरण वाशिम , दि. ३० ( युगनायक न्युज नेटवर्क ) : कोरोना बाधितांचे संस्थात्मक विलगीकरण करण्याचा निर्णय मागे घेण्यात आल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सदर माहितीला दुजोरा दिल्याचा दावा करण्यात आला असून सदर दावा चुकीचा आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संस्थात्मक विलगीकरणाचा निर्णय कायम असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिले आहे. कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात गाव पातळीवर विलगीकरण कक्ष स्थापन करून कोरोना बाधितांचे संस्थांत्मक विलगीकरण करण्यावर भर दिला जात आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात गाव पातळीवर विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात येत आहेत. असे असतांना काही प्रसारमाध्यमांमध्ये संस्थात्मक विलगीकरणाचा निर्णय मागे घेण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले असून यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक ...

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट

Image
  वाशिम जिल्ह्यातील आजचा  कोरोना_अलर्ट (दि. २९ मे २०२१, सायं. ५ वा.)   वाशिम जिल्ह्यात आणखी १५८ कोरोना बाधित; ४०६ जणांना डिस्चार्ज वाशिम :  बालाजी मंदिर जवळ- १ ,  सिव्हील लाईन्स- ३ ,  देवपेठ- १ ,  काळे फाईल- १ ,  खोडे माऊली- १ ,  लाखाळा- २ ,  माधव नगर- १ ,  साईलीला नगर- २ ,  संतोषी माता नगर- १ ,  शिंपी वेताळ- १ ,  सिंधी कॅम्प- १ ,  व्यंकटेश कॅम्प- १ ,  शहरातील इतर ठिकाणचे- ५ ,  अंजनखेड- १ ,  अनसिंग- २ ,  भटउमरा- १ ,  चिखली- १ ,  जांभरुण नावजी- १ ,  नागठाणा- १ ,  फाळेगाव-१ ,  सोनखास- २ ,  सुरकुंडी- १ ,  तामसी- २ ,  वारा जहांगीर- १, जनुना- १. मालेगाव :  शहरातील- ६ ,  भौरद- १ ,  बोराळा- १ ,  डोंगरकिन्ही- २ ,  एरंडा- १ ,  गुंज- १ ,  जऊळका- २ ,  मारसूळ- १ ,  नागरतास कॅम्प- ४ ,  शिरपूर- २ ,  सुकांडा- १ ,  वाघळूद- १ ,  जोडगव्हाण- १. रिसोड :  शहरातील- ३ ,  सिटी केअर हॉस्पिटल परिसर- १ ,...

थायलंडच्या उपासकांतर्फे ५० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाच्या स्वाधीन

Image
  थायलंडच्या उपासकांतर्फे ५० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाच्या स्वाधीन नागपूर , ( युगनायक न्युज नेटवर्क )दि.29 :    थायलंड येथील बौद्ध उपासक व उपासिकांतर्फे मिळालेले ५० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विभागीय आयुक्तांना सुपूर्द केले. उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे व त्यांच्या सुविद्य पत्नी रोजाना कांबळे यांच्या सहकार्याने हे ५ लिटर क्षमतेचे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर नागपूरसाठी मिळाले. यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले, कोरोना रुग्णांसाठी थायलंडमधील बौद्ध उपासक व उपासिकांनी दिलेली ही देणगी मानवतेची सेवा करणारी आहे. यासाठी राज्य सरकारच्या उद्योग खात्याचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे व त्यांच्या पत्नी रोजाना कांबळे यांनी केलेले सहकार्य खूप मोलाचे आहे.  थायलंडच्या बौद्ध उपासक व उपासिकांचे राज्य सरकार आभारी असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन अमन कांबळे यांनी केले. यावेळी आमदार अभिजित वंजारी,विभागीय आयुक्त डॉ.संजीवकुमार, भंते विजय रक्षिता,  प्रीतम बुलक...

केशरी शिधापत्रिकाधारकांना जून महिन्यासाठी सवलतीच्या दराने अन्नधान्याचे वितरण

Image
केशरी शिधापत्रिकाधारकांना जून महिन्यासाठी सवलतीच्या दराने अन्नधान्याचे वितरण राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ न मिळालेल्या मुंबई-ठाणे क्षेत्रातील शिधापत्रिकाधारकांना मिळणार लाभ मुंबई  ( युगनायक न्युज नेटवर्क )दि. २९-मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना माहे जून २०२१ करिता सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ  देण्यात येणार असल्याची माहिती मुंबईचे  शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा संचालक कैलास पगारे यांनी दिली. राज्यातील कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत एपीएल  (केशरी) शिधापत्रिकाधारकांना माहे मे- २०२० ते ऑगस्ट २०२० या चार महिन्याच्या कालावधीकरीता सवलतीच्या दराने  गहू रुपये ८/- प्रति किलो व तांदूळ रुपये १२ प्रति किलो प्रतिमाह प्रतिव्यक्ती  ३ किलो गहू व दोन किलो तांदूळ याप्रमाणे ५ किलो अन्नधान्याचा सवलतीच्या दराने लाभ देण्यात आला आहे. या  योजनेतील अधिकृत शिधावाटप दुकानामध्ये शिल्लक असलेल्या अन्नधान्याचे वाटप एपीएल  ...

पावसाळ्यात संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने डॉक्टर्सनी वेळीच कोविड लक्षणे ओळखून उपचार सुरु करावेत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Image
  पावसाळ्यात संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने डॉक्टर्सनी वेळीच कोविड लक्षणे ओळखून उपचार सुरु करावेत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या दोन दिवसीय कोविड कार्यशाळेस प्रारंभ मुंबई  ( युगनायक न्युज नेटवर्क )दि. २९: पावसाळ्यात काही रोग व साथी उद्भवतात, त्यांची काही लक्षणे आणि कोविडची लक्षणे एकसारखी असतात त्यामुळे डॉक्टर्सनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांमधील कोविडची लक्षणे वेळीच ओळखावीत तसेच गृह विलगीकरणातील रुग्णांवर व्यवस्थित उपचार होत आहेत किंवा नाही ते बारकाईने पाहावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या.   मुख्यमंत्री श्री. ठाकरे आज महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल) आयोजित केलेल्या कोरोना संदर्भातील दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन करताना बोलत होते. कोविडच्या लढाईत आता डॉक्टर्सदेखील मोठ्या प्रमाणावर मैदानात उतरले आहेत त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रथम त्यांचे  आभारही मानले. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनीही आपले विचार मांडले.   प्रास्ताविक महाराष्ट्र वैद्यक परिषदेचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी...