ॲड.सुरेश आव्हाड व राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी ओ.बी.सी.सेल च्या दणक्याने पुरवठा यंञणा जागी झाली असुन विविध रेशण दुकानांची तपासणी सुरु झाली आहे.
ॲड.सुरेश आव्हाड व राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी ओ.बी.सी.सेल च्या दणक्याने पुरवठा यंञणा जागी झाली असुन विविध रेशण दुकानांची तपासणी सुरु झाली आहे.
नाशिक प्रतिनिधी ॲड रवि कांबळे
नांदगाव तालुक्यातील गरीब व पाञ कार्डधारकांना रेशणवरील धान्य मिळत नसल्याची तक्रार प्राप्त होताच नांदगाव येथील तहसीलदार उदय कुलकर्णी यांची ॲड.सुरेश आव्हाड यांनी भेट घेऊन निवेदन देण्यात आले.सदरील निवेदनामधे कार्डधारकांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळावे, धान्याचा काळाबाजार करणार्या रेशण दुकानांची चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असुन सदरील मागण्यांची वेळीच दखल न घेतल्यास मोठे जनांदोलन छेडण्याचा ईशारा ॲड.सुरेश आव्हाड यांनी यावेळी दिला.
सदरील निवेदणाची दखल घेऊन विविध दुकानांची पाहणी व चौकशी करण्याचे आदेश तहसीलदार साहेबांनी दिले असुन दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासण देखील यावेळी दिले आहे.
रेशन व्यवस्थे बाबत कुठल्याही प्रकारच्या तक्रारी असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन ॲड.सुरेश आव्हाडयांनी केले संपर्क क्र ९७६७९६२००७
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME