व्यवसाय प्रशिक्षण संस्था म्हणून सहभागासाठी मुंबईतील रुग्णालये, प्रशिक्षण संस्थांना संपर्क साधण्याचे आवाहन
व्यवसाय प्रशिक्षण संस्था म्हणून सहभागासाठी मुंबईतील रुग्णालये, प्रशिक्षण संस्थांना संपर्क साधण्याचे आवाहन
मुंबई, (युगनायक न्युज नेटवर्क)दि. ३० : साथीच्या रोगाशी संबंधित उद्भवलेल्या परिस्थितीत आरोग्य व वैद्यकीय क्षेत्राला कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी राज्यातील आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छूक असलेल्या युवक-युवतींना हेल्थकेअर, मेडीकल, नर्सिंग व डोमेस्टीक हेल्थकेअर वर्कर क्षेत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये व्यवसाय प्रशिक्षण संस्था म्हणून सहभागी होण्यासाठी मुंबई उपगनर व मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छूक शासकीय व खाजगी रूग्णालये, शासकीय वैद्यकीय प्रशिक्षण संस्था यांनी तसेच या योजनेतून प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनीही संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
पॅरामेडिकल विषयक कुशल मनुष्यबळ निर्मिती
सध्याच्या कोरोना संसर्गाच्या स्थितीत आरोग्य क्षेत्र अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहे. तथापि या क्षेत्रात विशेषत: पॅरामेडिकल विषयक कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत असल्याचे दिसून येते. भविष्यात अशा प्रकारची कोणतीही कमतरता नसावी, या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाअंतर्गत ‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम’ योजना सुरु केली आहे. याअन्वये सर्व शासकीय रूग्णालये, शासकीय वैद्यकीय प्रशिक्षण संस्था व 20 खाटांपेक्षा जास्त क्षमतेच्या खाजगी रूग्णालयांना आरोग्य क्षेत्रातील निवडक 36 अभ्यासक्रमांमध्ये प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याकरीता व्यवसाय प्रशिक्षण संस्था म्हणून घोषित केले आहे. याअंतर्गत प्रशिक्षणाचा भर हा प्रत्यक्ष कामकाजाअन्वये प्रशिक्षणावर (On Job Training) असणार आहे.
तसेच केंद्र शासनाने पंतप्रधान कौशल्य विकास योजना ३ अंतर्गत विशेष प्रकल्वान्वये Emergency Medical Technician– Basic, General Duty Assistant (GDA), GDA – Advanced (Critical Care, Home Health Aide, Medical Equipment Technology Assistant व Phlebotomist अशा संबंधित सहा जॉब रोल्सकरीता मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थाद्वारे अल्पमुदतीचे व प्रत्यक्ष कामकाजान्वये प्रशिक्षणावर (On Job Training) भर देणारे प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू केले आहेत.
या योजनांमध्ये व्यवसाय प्रशिक्षण संस्था म्हणून सहभागी होण्यासाठी मुंबईतील इच्छूक शासकीय, खाजगी रूग्णालये, शासकीय वैद्यकीय प्रशिक्षण संस्था यांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या उमेदवारांना हे प्रशिक्षण विनाशुल्क असेल.
मुंबई उपगनर व मुंबई शहर जिल्ह्यातील रुग्णालये तसेच इच्छूक उमेदवारांनी दूरध्वनी क्रमांक ०२२-२२६२६४४० व ०२२-२२६२६३०३ यावर किंवा mumbaisuburbanrojgar@gmail.com अथवा mumbaicity.employment@gmail.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME