जिल्ह्यात ५५ ऑक्सिजन जनरेशन प्लांटच्या माध्यमातून ५० मेट्रिक टन ऑक्सिजनची होणार निर्मिती : पालकमंत्री छगन भुजबळ

 

जिल्ह्यात ५५ ऑक्सिजन जनरेशन प्लांटच्या माध्यमातून ५० मेट्रिक टन ऑक्सिजनची होणार निर्मिती : पालकमंत्री छगन भुजबळ







नाशिक, दि. ३० (युगनायक न्युज नेटवर्क) : जिल्ह्यात सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये एकूण ५५ ठिकाणी ऑक्सिजन जनरेशन प्लांटच्या माध्यमातून ५० मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होणार असून जिल्हा ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्ण होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज येवला येथील ऑक्सिजन जनरेशन प्लांट व रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी येवला नगरपालिकेचे नगराध्यक्ष बंडू क्षीरसागरजिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणेपंचायत समिती सदस्य मोहन शेलारनगरपालिका गटनेते प्रवीण बनकरप्रांताधिकारी सोपान कासारतहसीलदार प्रमोद हिलेजिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरातनिवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत खैरेवैद्यकीय अधिकारी डॉ.शैलजा कृपास्वामीतालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारीयेवला शहर पोलीस निरीक्षक कोळीअंदरसुल बाजार समितीचे सभापती मकरंद सोनवणेमाजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गुंड यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

५५ ठिकाणी होणार ऑक्सिजन प्लांट

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ  जिल्ह्यात ५५ ठिकाणी होणाऱ्या ऑक्सिजन जनरेशन प्लांट बद्दल बोलताना म्हणाले कीनाशिक महानगरपालिका क्षेत्रात ६मालेगाव महानगरपालिका  क्षेत्रात २जिल्ह्यातील विविध नगरपालिका क्षेत्रात ९जिल्हा सामान्य रुग्णालयउपजिल्हा रुग्णालय येवलामनमाडकळवणचांदवडग्रामीण रुग्णालय पिंपळगांव बसवंतइगतपुरीसिन्नरअभोणावणीदिंडोरीबाऱ्हेघोटीगिरणारेहरसूलनिफाडनगरसूललासलगांवदेवळाउमराणेसटाणानामपूरमालेगांव सामान्य रुग्णालय आणि महिला रुग्णालय या २४ ठिकाणी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून ऑक्सिजन जनरेशन प्लांट निर्माण होणार आहेत. तसेच केंद्र सरकारच्या निधीतून नांदगावदाभाडीपेठ सुरगाणा या ४ ठिकाणी तर सिक्युरीटी प्रेसच्या सीएसआर फंडातून दोडी व त्र्यंबकेश्वरगिरणारेडांगसौंदाणे तसेच नाशिक ग्रामीणसाठी ५ असे एकूण ५५ ऑक्सिजन जनरेशन प्लांट निर्माण होणार आहेत.

यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी येवला उपजिल्हा रुग्णालयाची व कोविड सेंटरची पाहणी केली.

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू