थायलंडच्या उपासकांतर्फे ५० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाच्या स्वाधीन
थायलंडच्या उपासकांतर्फे ५० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाच्या स्वाधीन
नागपूर, (युगनायक न्युज नेटवर्क)दि.29 : थायलंड येथील बौद्ध उपासक व उपासिकांतर्फे मिळालेले ५० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विभागीय आयुक्तांना सुपूर्द केले.
उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे व त्यांच्या सुविद्य पत्नी रोजाना कांबळे यांच्या सहकार्याने हे ५ लिटर क्षमतेचे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर नागपूरसाठी मिळाले.
यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले, कोरोना रुग्णांसाठी थायलंडमधील बौद्ध उपासक व उपासिकांनी दिलेली ही देणगी मानवतेची सेवा करणारी आहे. यासाठी राज्य सरकारच्या उद्योग खात्याचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे व त्यांच्या पत्नी रोजाना कांबळे यांनी केलेले सहकार्य खूप मोलाचे आहे. थायलंडच्या बौद्ध उपासक व उपासिकांचे राज्य सरकार आभारी असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन अमन कांबळे यांनी केले.
यावेळी आमदार अभिजित वंजारी,विभागीय आयुक्त डॉ.संजीवकुमार, भंते विजय रक्षिता, प्रीतम बुलकुंडे, प्रफुल्ल भालेराव, रवि वेखंडे, धर्मेश फुसाटे नागेश बुरबुरे प्रामुख्याने उपस्थित होते.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME