Posts

नवीन कोरोनाचे रुग्ण आढळल्याने अधिक दक्षता घेण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

Image
नवीन कोरोनाचे रुग्ण आढळल्याने अधिक दक्षता घेण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश परदेशातून अन्य राज्यांमार्गे येणाऱ्या प्रवाशांच्या विलगीकरणाबाबत केंद्राला विनंती करणार मुंबई, दि. 4 : ब्रिटनमधील नव्या कोरोना विषाणूमुळे राज्यात अधिक दक्षता घेतली जात असली  तरी परदेशातून अन्य राज्यात उतरून तेथून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या प्रवाशांचा ओघ लक्षात घेता अशा प्रवाशांना ते उतरतील त्या विमानतळांवरच क्वारंटाईन करण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येणार आहे. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी यासंदर्भात मुख्य सचिवांना निर्देश दिले. ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील ८ प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यंत्रणांना दिले. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे व टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. कोरोना लसीकरणाचा ड्राय रन नुकताच झाला. आता केंद्र शासनाकडून लस मिळाल्यानंतर प्रत्यक्षात लसीकरणाला सुरूवात होईल. त्याबाबतच्या तयारीचा ...

स्थलांतर रोखण्यासाठी दुर्गम भागात रोजगार निर्मितीवर भर देण्याचे आदिवासी विकासमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांचे निर्देश

Image
  स्थलांतर रोखण्यासाठी दुर्गम भागात रोजगार निर्मितीवर भर देण्याचे आदिवासी विकासमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांचे निर्देश नंदुरबार ( युगनायक न्युज नेटवर्क ) दि. 4 :    दुर्गम भागातून होणारे नागरिकांचे स्थलांतर रोखण्यासाठी कुक्कुट पालन, मत्स्यपालन, शेळीपालन अशा व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार निर्माण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी  यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात ॲड. पाडवी यांनी मानव विकास मिशनच्या विकास कामाचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविश्यांत पांडा, मानव विकास मिशनचे नियोजन अधिकारी विजय शिंदे आदी उपस्थित होते. ॲड.पाडवी म्हणाले, दुर्गम भागात अशा व्यवसायांना चालना देण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करावा. मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी मार्केटींगची सुविधा निर्माण करावी लागेल. त्यादृष्टीने शहराच्या ठिकाणी शीतगृह उभारणीसाठी नियोजन करावे. स्थानिकासोबत बाहेरील र...

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू

Image
प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा –  पालकमंत्री बच्चू कडू पालकमंत्र्यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा अकोला,दि. 4 (युगनायक न्युज नेटवर्क)-   जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्राप्त निधी व खर्चाचा सर्व विभागाचा आढावा आज घेण्यात आला. प्राप्त निधीचा प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे तातडीने मार्गी लावावे, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास,शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी यंत्रणांना दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित आढावा बैठकीत ना. कडू बोलत होते. यावेळी आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा नियोजन अधिकारी शास्त्री, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. कुस...

महिला व बालविकास विभागातील कंत्राटी पदांवर अनाथांना विशेष प्राधान्य

Image
म हिला व बालविकास विभागातील कंत्राटी पदांवर अनाथांना विशेष प्राधान्य महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या संवेदनशीलतेमुळे अनाथांना दिलासा मुंबई, दि. ५ :   अनाथ उमेदवारांना राज्य शासनाने मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास विभागाने काल जारी केलेल्या शासन निर्णयानुसार विभागात बाह्ययंत्रणेद्वारे भरण्यात येणाऱ्या पदांसाठी अनाथ उमेदवारांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यासंदर्भात प्रशासनाला गतिमान कार्यवाहीचे निर्देश दिले होते. अनाथ उमेदवारांना शिक्षण तसेच राज्य शासकीय, निम शासकीय पदांवर नोकरीमध्ये एक टक्के समांतर आरक्षण आहे. तथापि, महिला व बालविकास विभागाअंतर्गत अनेक प्रकल्प, उपक्रमांसाठी बाह्ययंत्रणेद्वारे कंत्राटी पद्धतीने पदभरती केली जाते. त्यामध्ये संरक्षण अधिकारी यांच्या कार्यालयातील सहाय्यक व बहुउद्देशीय कर्मचारी, बालकल्याण समिती व बाल न्याय मंडळावरील डाटा एन्ट्री ऑपरेटर, वन स्टॉप सेंटर येथील विविध पदे आदी पदे कंत्राटी पद्धत...

आश्रमशाळा आणि वसतिगृहे यांच्या जमिनी आदिवासी विकास विभागाच्या नावावर होणार

Image
आश्रमशाळा आणि वसतिगृहे यांच्या जमिनी आदिवासी विकास विभागाच्या नावावर होणार विद्यार्थी गुणवत्तेसाठी भाडेदेयक निधीचा उपयोग होणार नाशिक, दि. 4 : प्रशस्त इमारत आणि अद्ययावत शिक्षणाच्या सोयी या बाबी शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. या सर्व सोयी पुरविण्यासाठी आदिवासी विकास मंत्री अॅड. के.सी. पाडवी, आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि आदिवासी विकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी आयुक्तालयाचे प्रयत्न सुरु असून लवकरच आश्रमशाळा आणि वसतिगृहे यांच्या जमिनी आदिवासी विकास विभागाच्या नावावर होणार असून भाडेदेयक निधीचा वापर विद्यार्थी गुणवत्तेसाठी आणि पायाभूत सुविधांसाठी होणार असल्याचे आदिवासी विकास विभाग आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.   राज्यात आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळा आणि वसतिगृहे असलेल्या जमिनी काही प्रमाणात भाडेपट्ट्यावर आहेत; या जमिनी आदिवासी विकास विभागाच्या नावावर करण्यासाठी मागील दोन महिन्यापासून प्रयत्न सुरू आहेत.   शासकीय प्रसिद्धीपत्रकात नमूद क...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

Image
  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन वाशिम ,   दि. ०३ (युगनायक न्युज नेटवर्क) :  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सहाय्यक अधीक्षक सुधीर नागपूरकर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

विधानभवन, नागपूर आता वर्षभर गजबजणार…

Image
  विधानभवन, नागपूर आता वर्षभर गजबजणार… नववर्षारंभी कायमस्वरूपी कक्ष कार्यान्वीत   विधानभवन, नागपूर येथे विधानमंडळ सचिवालयाचा कायमस्वरुपी कक्ष सोमवार दिनांक ४ जानेवारी, २०२१ रोजी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यान्वीत होत आहे. देशाच्या नकाशावर भौगोलिकदृष्ट्या नागपूरचे स्थान केंद्रस्थानी आहे. वर्षातील ३ अधिवेशनांपैकी १ अधिवेशन उप राजधानी नागपूरमध्ये घेण्याची महाराष्ट्राची, नागपूर करारानुसार सुरू झालेली परंपरा, संसदीय लोकशाहीत वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे. या कार्यक्रमानिमित्त हा माहितीपर लेख... भारतातील संसदीय लोकशाहीच्या वाटचालीत महाराष्ट्राचे स्थान आणि योगदान नेहमीच महत्त्वपूर्ण ठरले आहे.  महाराष्ट्र विधानमंडळाने संमत केलेले आणि समाजजीवनावर प्रगतीच्यादृष्टीने दूरगामी परिणाम करणारे कायदे, राष्ट्रीय पातळीवर संसदेने देशासाठी स्वीकारले आहेत. रोजगार हमी योजनेचा कायदा, माहितीच्या अधिकाराचा कायदा यासारखी उदाहरणे यासंदर्भात महत्त्वाची आहेत. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या प्रसंगी मध्यप्रांतातील मराठी भाषिक विदर्भ प्रदेश महाराष्ट्रात सामील झाला. नागपूरला असलेला तेव्हाच्या राजधानीचा...

पोलीस बांधवांच्या मानवतावादी कामगिरीचा सदैव अभिमान – गृहमंत्री अनिल देशमुख

Image
पोलीस बांधवांच्या मानवतावादी कामगिरीचा सदैव अभिमान – गृहमंत्री अनिल देशमुख मुंबई, दि. ३  :-  'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रीद वाक्याला अनुसरून पोलीस बांधव आपले कर्तव्य करत असतात. त्यातून जेव्हा एखादे मानवतावादी कामगिरी त्यांच्या हातून घडते त्यावेळेस पोलिसांचा, त्यांच्या कामगिरीचा मला प्रचंड अभिमान वाटतो, असे भावोद्गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज काढले. रेल्वे पोलिस दलातील पोलीस कॉन्स्टेबल सुजीतकुमार निकम यांनी स्वतःचे प्राण धोक्यात टाकून दहिसर रेल्वे स्थानकावर एका ६० वर्षीय व्यक्तीचे प्राण वाचवले. त्याबद्दल त्यांचा सत्कार आज ज्ञानेश्वरी बंगला येथे करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. दहिसरची घटना १ जानेवारी रोजी गणपत सोलंकी हे साठ वर्षाचे गृहस्थ दहिसर येथून खारला जाण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उभे होते. त्यावेळी दोन नंबर प्लॅटफॉर्मवरून स्लो लोकल जाणार होती, ती पकडण्यासाठी फ्लाय ओव्हर ब्रिजचा वापर न करता रुळावर उडी मारून धावत दुसऱ्या बाजूस असलेली लोकल पकडण्याचा त्यांचा विचार होता. त्यानुसार त्यांनी रूळावर उडी मारली. परंतु विरुद्ध दिशेने येणारी फास्ट लोकल पाहता ते गांगरून गे...

राजधानीत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

Image
राजधानीत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी नवी दिल्ली , दि.   03     :  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची   १९०  वी जयंती आज महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली. कोपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त निधी पांडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट

Image
वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट (दि. ०३ जानेवारी २०२१, सायं. ५.०० वा.) वाशिम जिल्ह्यात आणखी १३ कोरोना बाधित काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील अकोला रोड परिसरातील १, शिव चौक येथील १, पाटणी चौक १, अनसिंग येथील १, रिसोड तालुक्यातील येवता येथील १, वरुड तोफा येथील १, मंगरुळपीर शहरातील सुपर कॉलनी परिसरातील १, अशोक नगर येथील १, पोलीस स्टेशन परिसरातील १, कोठारी येथील १, कारंजा शहरातील सिंधी कॅम्प येथील १, पिंप्री मोडक येथील १, चांदई येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. ०८ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच गेल्या काही दिवसात आणखी २ मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोना बाधितांची सद्यस्थिती एकूण पॉझिटिव्ह – ६७०२ ऍक्टिव्ह – १३४ डिस्चार्ज – ६४१७ मृत्यू – १५० (टीप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

महाराष्ट्र पोलीस दलाचे खास अभिनंदन – गृहमंत्री अनिल देशमुख

Image
महाराष्ट्र पोलीस दलाचे खास अभिनंदन – गृहमंत्री अनिल देशमुख मुंबई दि.२ :-   कोविडच्‍या काळात नवीन वर्षानिमित्त होणारी गर्दी रोखण्याची मोठी जबाबदारी महाराष्ट्र पोलिसांवर होती. एकीकडे सर्व नागरिक आपल्या कुटूंबासोबत नवीन वर्ष साजरे करीत होते, तर दुसरीकडे महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे डोळ्यात तेल घालून रस्त्यावर पहारा देत होते. यामुळेच नवीन वर्षाच्या कार्यक्रमांस महाराष्ट्रात कोठेही गालबोट लागले नाही. महाराष्ट्र पोलीस दलाच्या या कार्याचे कुटुंब प्रमुख म्हणून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अभिनंदन केले आहे. कोणताही सणवार असो महाराष्ट्र पोलीस नेहमीच सतर्क राहून जनतेला पारंपरिकरित्या ते साजरे करता यावेत, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतात. त्याचप्रमाणे नवीन वर्षसुध्दा नागरिकांना त्यांच्या कुटुंबासोबत साजरे करता यावे, यासाठी महाराष्ट्र पोलीस सज्ज होते. मग ते मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद,  नागपूर असो वा शेवटच्या टोकाच्या गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस दल असो. एकूणच काय तर चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्र पोलिसांनी अत्यंत शिस...

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट

Image
वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट (दि. ०२ जानेवारी २०२१, सायं. ५.०० वा.) वाशिम जिल्ह्यात आणखी १७ कोरोना बाधित काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील नालंदा नगर येथील १, ईश्वरी कॉलनी येथील १, आययुडीपी कॉलनी येथील १, रिद्धी-सिद्धी कॉलनी परिसरातील ४, काटा येथील २, सावळी येथील १, मंगरुळपीर शहरातील ४, पार्डी ताड येथील १, पोटी येथील १, कारंजा तालुक्यातील पिंप्री मोडक येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. तसेच २१ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना बाधितांची सद्यस्थिती एकूण पॉझिटिव्ह – ६६८९ ऍक्टिव्ह – १३१ डिस्चार्ज – ६४०९ मृत्यू – १४८ (टीप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा व परिसर सॅनिटाइज करून घेण्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

Image
 शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा व परिसर सॅनिटाइज करून घेण्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश पुणे, दि. २८ :  शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा व परिसर सॅनिटाइज करून घ्याव्यात.  पालक व शिक्षण संस्थांनी शाळा सुरू करण्यासाठी सकारात्मक रहावे व ऑनलाईन शिक्षणाचा फायदा घ्यावा. ज्यांना पुढील शिक्षण घेण्याची इच्छा आहे त्यांनी फॉर्म नंबर १७ भरून परीक्षा द्यावी, असे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले. राज्याच्या बोर्ड परीक्षेला जसे फॉर्म नंबर १७ चालतो तसा तो सीबीएसई, आईसीएससी शाळांबाबत चालेल का याबाबत शिक्षण विभागाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी सूचना देखील डॉ.गोऱ्हे यांनी शिक्षण विभागास केली. ग्रामीण व शहरी भागातील शाळा सुरू करण्यासंदर्भात डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पालक आणि संस्थाचालक यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक सोडियम हायपो क्लोराईड खरेदी करावे व त्याचे मिश्र...

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट

  वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट (दि. २८ डिसेंबर २०२०, सायं. ५.०० वा.)   वाशिम जिल्ह्यात आणखी ०३ कोरोना बाधित   काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील लाखाळा येथील १, काटा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेर १ कोरोना बाधिताची नोंद झाली असून ०७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.   कोरोना बाधितांची सद्यस्थिती   एकूण पॉझिटिव्ह  –  ६६२५ ऍक्टिव्ह  –  २६२ डिस्चार्ज  –  ६२१४ मृत्यू  –  १४८   (टीप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट

Image
वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट (दि. २७ डिसेंबर २०२०, सायं. ६.०० वा.) वाशिम जिल्ह्यात आणखी १४ कोरोना बाधित काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील तिरुपती सिटी परिसरातील १, व्यंकटेश कॉलनी परिसरातील १, रिसोड शहरातील गजानन नगर येथील १, जिजाऊ नगर येथील २, अनंत कॉलनी परिसरातील १, गुजरी चौक येथील १, मांगुळझनक येथील १, मोहजाबंदी येथील १, मंगरुळपीर तालुक्यातील येडशी येथील १, पेडगाव येथील १, पिंपळगाव येथील १, कारंजा लाड शहरातील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. तसेच १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला  कोरोना बाधितांची सद्यस्थिती एकूण पॉझिटिव्ह – ६६२२ ऍक्टिव्ह – २६६ डिस्चार्ज – ६२०७ मृत्यू – १४८ (टीप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

कोविड योद्ध्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून सानुग्रह सहाय्य

Image
कोविड योद्ध्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून सानुग्रह सहाय्य पालकमंत्री, क्रीडामंत्र्यांकडून कुटुंबाचे सांत्वन नागपूर, दि.27 : कोरोना साथीच्या काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या दोन दिवंगत योद्ध्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून आज प्रत्येकी 50 लाखांचा सानुग्रह सहायता निधी (विमा कवच) देण्यात आला. राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पदुम व क्रीडामंत्री सुनील केदार, नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सानुग्रह धनादेश कुटुंबियांना देण्यात आला. कोरोना साथीच्या पहिल्या टप्प्यात लॉकडाऊनसह विविध निर्बंध असताना शासकीय कर्मचारी आपले कर्तव्य बजावत होते. वैद्यकीय यंत्रणा, पोलीस विभागाचे कर्मचारी यांच्यासोबतच जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेचे कर्मचारी गावागावांमध्ये झटत होते. यापैकीच नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत पंचायत समिती नागपूर येथील विस्तार अधिकारी दिलीप कुहीटे, तसेच हिंगणा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत डिगडोह ग्रामपंचायतीचे कर्मचारी मज्जिद शेख यांचे कोरोनामुळे निध...

मत्स्यव्यवसायाची उत्पादकता वाढविणे गरजेचे – पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार

Image
मत्स्यव्यवसायाची उत्पादकता वाढविणे गरजेचे – पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार नागपूर ,  दि .  26 :  मत्स्यव्यवसायाचे अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान आहे. मत्स्यव्यवसायाच्या उद्योगाला अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून बघत गरीब लोकांच्या रोजगाराच्या या विषयाला न्याय देणे आवश्यक आहे. यासाठी भविष्यात मत्स्यव्यवसायाची उत्पादकता वाढविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी आज केले. नागपूर जिल्हा परिषद (लघु पाटबंधारे) विभागामार्फत कै.आबासाहेब खेडकर सभागृहामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती रश्मी बर्वे, उपाध्यक्ष मनोहरराव कुंभारे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, जिल्हा जलसंधारण अधिकारी रमेशजी गुप्ता, शिक्षण सभापती भारती पाटील, जिल्हा परिषद सदस्य दुधराम सव्वालाखे, राजकुमार कुसुंबे तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत लघु पाटबंधारे विभागात 124 लघुसिंचन तलाव, 57 पाझर तलाव, 39 गाव तलाव...

साहित्य वर्तुळातील नामवंतांचा पुरस्कार नागपूरसाठी भूषणावह – पालकमंत्री डॉ.नितीन राऊत

Image
साहित्य वर्तुळातील नामवंतांचा पुरस्कार नागपूरसाठी भूषणावह – पालकमंत्री डॉ.नितीन राऊत नागपूर ,  दि .  २६ :  साहित्य, कला,सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय चळवळीचे केंद्र असणाऱ्या नागपूर शहरातील तीन नामवंतांना साहित्य व सामाजिक क्षेत्रातील मिळालेले पुरस्कार विदर्भासाठी भूषणावह आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज येथे केले.   अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी बांधवांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाऊंडेशनचे तीन मानाचे पुरस्कार यावर्षी प्रसिद्ध नाटककार, साहित्यिक महेश एलकुंचवार, ज्येष्ठ पत्रकार, लेखक श्याम पेठकर, सामाजिक कार्यकर्ता, प्रकाशक अरुणा सबाने या नागपुरातील तीन नामवंतांना मिळाले आहेत. या तीनही ज्येष्ठांपर्यंत पोहोचून आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार केला. या सत्काराच्या वेळी भावना व्यक्त करताना ते म्हणाले, समाजकार्य, सांस्कृतिक महोत्सव, साहित्यनिर्मिती, कला, क्रीडा क्षेत्रात नागपूरचे नाव पर्यायाने विदर्भाचे नाव कायम अग्रेसर असणे एक नागपूरकर या नात्याने अभिमानास्पद आहे. महाराष्ट्र फाऊंडेशनने कोणताही अर्ज न घेता हे पुरस्कार प...

पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा वाशिम जिल्हा दौरा

Image
  पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा वाशिम जिल्हा दौरा वाशिम, दि. २७ ( युगनायक न्युज नेटवर्क ) : पालकमंत्री शंभूराज देसाई हे २८ व २९ डिसेंबर रोजी वाशिम जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. पालकमंत्री श्री. देसाई हे सोमवार, २८ डिसेंबर रोजी नागपूर येथून मोटारीने दुपारी ३ वाजता  तळेगाव, कामरगाव, कारंजामार्गे वाशिमकडे प्रयाण करतील. रात्री ८.३० वाजता वाशिम  शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम. मंगळवार, २९ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते सकाळी ११.३० वाजता दरम्यान पालकमंत्री श्री. देसाई हे जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा बैठक घेतील. सकाळी ११.३० ते दुपारी १.३० वाजतापर्यंत राखीव. दुपारी १.३० वाजता वाशिम येथून मोटारीने नागपूरकडे प्रयाण करतील.

राज्याची क्रीडाविषयक कामगिरी आणखी उंचावण्यासाठी पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ – क्रीडामंत्री सुनील केदार

Image
राज्याची क्रीडाविषयक कामगिरी आणखी उंचावण्यासाठी पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ – क्रीडामंत्री सुनील केदार पुणे, दि. 25:- राज्याची क्रीडाविषयक कामगिरी आणखी उंचावण्यासाठी भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडामंत्री सुनील केदार यांनी दिली. क्रीडामंत्री सुनील केदार म्हणाले, राज्याची क्रीडा विषयक कामगिरी आणखी उंचावणे, क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेली विविध क्षेत्रे विचारात घेऊन क्रीडा क्षेत्रात नोकरीच्या, प्रशिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात व तरुण वर्गास क्रीडा क्षेत्रात येण्यास प्रोत्साहन मिळावे, या अनुषंगाने राज्यात जास्तीत जास्त दर्जेदार कोच/प्रशिक्षक तसेच, खेळाडू निर्माण व्हावेत, हा आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापनेचा उद्देश आहे. क्रीडा हा शिक्षणाचा अविभाज्य भाग असून क्रीडा व शैक्षणिक गुणवत्ता महत्त्वाची असल्याने क्रीडा क्षेत्राला गतिमानतेने पुढे नेण्यासाठी क्रीडा वैद्यकशास्त्र व पूरक बाबींमध्ये आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. क्...