राजधानीत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
राजधानीत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
नवी दिल्ली, दि. 03 : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९० वी जयंती आज महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली.
कोपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त निधी पांडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME