Posts

Showing posts from August, 2021

खावटी अनुदान योजनेच्या माध्यमातून १२ लाख आदिवासी कुटुंबांना लाभ – आदिवासी विकासमंत्री ॲड के. सी. पाडवी

Image
  खावटी अनुदान योजनेच्या माध्यमातून १२ लाख आदिवासी कुटुंबांना लाभ – आदिवासी विकासमंत्री ॲड के. सी. पाडवी नवी दिल्ली , (युगनायक न्युज नेटवर्क)   31 :   राज्य शासनाच्या आदिवासी  विकास विभागाच्या वतीने नव्याने सुरु करण्यात आलेल्या खावटी अनुदान योजनेच्या माध्यमातून एका वर्षात १२ लाख कुटुंबातील ६० लाख सदस्यांना लाभ देण्यात आल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री ॲड के.सी. पाडवी यांनी आज दिली. ॲड. पाडवी हे दिल्ली दौऱ्यावर असून महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) यांनी महाराष्ट्र सदन येथे त्यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी झालेल्या अनौपचारिक चर्चेदरम्यान ॲड. पाडवी यांनी ही माहिती दिली. १९७८ ते २०१५ या कालावधी दरम्यान राज्यात आदिवासी बांधवांसाठी आदिवासी विकास महामंडळाच्या  माध्यमातून आदिवासी खावटी कर्ज योजनेद्वारे लाभ देण्यात येत होता. मात्र, २०१५ नंतर  ही योजना बंद करण्यात आली. या पार्श्वभूमीवर, कोविड-१९ महामारीच्या काळात राज्यातील आदिवासींचे कोकणासह कर्नाटक, गुजरात,आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यात मजुरीसाठी होणारे स्थलांतर टाळण्यासाठी आदिव...

१९७१ च्या युद्धातील विजयोत्सवानिमित्त स्वर्णिम विजय मशालीचे मुख्यमंत्री करणार स्वागत

Image
१९७१ च्या युद्धातील विजयोत्सवानिमित्त स्वर्णिम विजय मशालीचे मुख्यमंत्री करणार स्वागत गेट-वे-ऑफ इंडिया येथे उद्या कार्यक्रम   मुंबई , (युगनायक न्युज नेटवर्क) दि. ३१ : - भारताने १९७१ मधील पाकिस्तान विरोधातील युद्धात मिळविलेल्या विजयानिमित्त काढण्यात आलेल्या स्वर्णिम मशालीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वागत करणार आहेत. स्वर्णिम विजय वर्षानिमित्त आयोजित परिक्रमेतील या मशालीचे उद्या बुधवार १ सप्टेंबर रोजी  सायंकाळी ५ वाजता गेट-वे-ऑफ इंडिया येथे मुख्यमंत्री समारंभपूर्वक स्वागत करतील.   भारताने पाकिस्तानला १९७१च्या युद्धात नमवले होते. या युद्धाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त देशभर ‘स्वर्णिम विजय वर्ष’ साजरे करण्यात येत आहे. त्यानिमित्त स्वर्णिम विजय मशालीची देशभर परिक्रमा सुरु आहे. या स्वर्णिम विजय वर्ष मशालीचे  १ सप्टेंबर रोजी मुंबईत आगमन होणार आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विजय मशालीचे गेट वे ऑफ इंडिया येथे आगमन होईल. ही मशाल मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केली जाईल. त्यानंतर राष्ट्रगीत होईल व चक्र पुरस्कारार्थींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात येईल. यावेळी भारतीय लष्कराचा ...

अंगणामधील रोपे निर्मितीतून गवसला आधुनिक रोपवाटिका उभारणीचा मार्ग

Image
  अंगणामधील रोपे निर्मितीतून  गवसला आधुनिक रोपवाटिका उभारणीचा मार्ग ·          जांब येथील महिला शेतकरी सरला मोहिते यांची यशोगाथा वाशिम   (युगनायक न्युज नेटवर्क) जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. जिल्ह्यातील शेतकरी बांधव बहुतांश पावसाच्या पाण्यावर अवलंबून शेती करतात. कोरडवाहू पध्दतीची ही शेती वरुण राजाच्या कृपादृष्टीवर अवलंबून आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेती ही संरक्षित सिंचनाखाली यावी यासाठी शासन ,  प्रशासन प्रयत्नशील आहे. विविध योजनांची सांगड घालून सिंचनाखालील क्षेत्र वाढविण्यात येत आहे. एकीकडे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी सोयाबीन व तुरीचे पिक घेत असतांना मंगरुळपीरनजीक असलेल्या जांब शिवारात शेडनेट व पॉली हाऊसच्या माध्यमातून सरला मोहिते हया सुशिक्षीत शेतकरी महिलेने नाविन्यपुर्ण साई रोपवाटिकेच्या माध्यमातून भाजीपालावर्गीय व पपई रोपांची निर्मिती करुन जिल्हयातीलच नव्हे तर शेजारच्या जिल्हयातील शेतकऱ्यांना नगदी पिकाचा मार्ग दाखविला आहे. कृषी क्षेत्रातील त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेवून राज्य शासनाने सरला रमेश मो...

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Image
  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या  कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन वाशिम ,   दि. ३१ (युगनायक न्युज नेटवर्क) :   जिल्ह्यातील मातंग सामातील युवकांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी व समाजातील लोकांचे जीवनमान उंचावण्याकरिता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्यावतीने बीजभांडवल योजना व अनुदान योजनेतून कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा ,  असे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक जे. एम. गाभणे यांनी कळविले आहे. बीज भांडवल योजनेतून ५० हजार रुपये ते ५ लाख रुपयेपर्यंतच्या १० कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. यामध्ये महामंडळाचा सहभाग २० टक्के ,  बँकेचे कर्ज ७५ टक्के व ५ टक्के लाभार्थी सहभाग असणार आहे. महामंडळाच्या बीज भांडवल रक्कमेवर ४ टक्के व्याजदर व बँकेच्या कर्ज रक्कमेवर बँकेचा व्याजदर राहील. अनुदान योजनेंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज प्रस्ताव बँकेला पाठविले जातात. त्यामध्ये महामंडळाचे १० हजार रुपये अनुदान व ४० हजार रुपये बँक कर्जाचा समावेश आहे. अनुदान...

हक्काच्या ‘महाआवास’ साठी ग्रामीण भागात प्रोत्साहित करावे : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

Image
  हक्काच्या ‘महाआवास’ साठी ग्रामीण भागात प्रोत्साहित करावे : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे नाशिक , (युगनायक न्युज नेटवर्क) दि .31 -  केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच गुणात्मक प्रगती होण्याच्या दृष्टीने राज्यात शंभर दिवसांचे ‘महाआवास अभियान-ग्रामीण' सुरु करण्यात आले होते. या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागात पुरस्कार प्राप्त व्यक्ती व संस्थांनी ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काच्या घरकुलासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नियोजन सभागृहात ‘महाआवास अभियान’ ग्रामीण मधील उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था,व्यक्तींना ‘महाआवास अभियान’ ग्रामीण पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे बोलत होते. यावेळी उपायुक्त (विकास) अरविंद मोरे, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर कामगार उपायुक्त विकास माळी, नाशिक प्रकल्प संचालक उज्वला बावके, धुळे प्रकल्प संचालक डी.एम.मोहन, तहसिलदार निफाड शरद ...

जिल्हा युवा पुरस्कारासाठी १५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव मागविले

Image
जिल्हा युवा पुरस्कारासाठी  १५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव मागविले वाशिम ,   दि. ३१ (युगनायक न्युज नेटवर्क) :    जिल्ह्यात युवक-युवतींनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा आणि युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी युवा धोरणानुसार जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतो. सन २०१९-२० आणि सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील पुरस्कारासाठी युवा क्षेत्रात कार्य करणाऱ्या युवक-युवतींकडून आणि संस्थाकडून ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले होते. आता प्रस्ताव सादर करण्यास १५ सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पुरस्कारासाठीचे प्रस्ताव संपुर्ण कागदपत्रासह १५ सप्टेंबर २०२१ पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे सादर करावे. पुरस्काराचे वितरण २६ जानेवारी २०२२ रोजी प्रजासत्ताक दिनी करण्यात येणार आहे. वैयक्तिक युवक व युवती पुरस्कार प्रत्येकी रोख १० हजार रुपये ,  मानचिन्ह व प्रमाणपत्र आणि संस्थेस ५० हजार रुपये रोख ,  मानचिन्ह व प्रमाणपत्र असे दोन्ही पुरस्काराचे स्वरुप आहे. अधिक माहितीसाठी क्रीडा व युवक सं...

लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाच्या रिसोड तालुका अध्यक्षपदी श्री.आत्माराम कांबळे यांची निवड.

Image
  लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाच्या रिसोड तालुका अध्यक्षपदी श्री.आत्माराम कांबळे यांची निवड.   रिसोड   (युगनायक न्युज नेटवर्क) दि.२९ऑगष्ट  पुष्पादेवी खडसे पाटील महाविद्यालय रिसोड येथे लहुजी साळवे कर्मचारी महासंघाची सभा संपन्न झाली.सभेच्या अध्यक्षस्थानी प्रा.के.एन.साबळे माजी.नगराध्यक्ष , प्रमुख पाहुणे  श्री.माधवराव रनबावळे, आनंदराव ताकतोडे,श्री.रविभाऊ आढाव (प.स.सदस्य) ,श्री.ज्ञानेश्वर बाजड,(प.स.सदस्य), सामाजिक कार्यकर्ते तथा मानहित लोकशाही पक्षाचे शहरअध्यक्ष श्री.महीपती इंगळे, बाला रत्नपारखी,सभेचे आयोजक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री वसंतराव जोगदंड सर उपस्थित होते.सर्वप्रथम लहुजी वस्ताद साळवे,साहीत्य रत्न आन्नाभाऊ साठे, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक लहुजी साळवे कर्मचारी महासंघाचे वाशिम जिल्ह्याचे उपाध्यक्ष श्री वसंतराव जोगदंड सर ह्यांनी केले . प्रास्ताविकातून लहुजी साळवे कर्मचारी महासंघाचे धेय, धोरण, भविष्यकाळात करावयाचा कृती कार्यक्रम निश्चीत करुन समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत विकासाची निश्चित ...

रिसोड येथे लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाची सभा संपन्न.

Image
  रिसोड येथे लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाची सभा  संपन्न. (लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाचे सभासद) रिसोड   (युगनायक न्युज नेटवर्क) दि.२९ऑगष्ट रोजी पुष्पादेवी खडसे पाटील महाविद्यालय रिसोड येथे लहुजी साळवे कर्मचारी महासंघाच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते .सभेच्या अध्यक्षस्थानी प्रा.के.एन.साबळे (माजी.नगराध्यक्ष) तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.माधवराव रनबावळे, आनंदराव ताकतोडे,श्री.रविभाऊ आढाव  (प.स.सदस्य) ,श्री.ज्ञानेश्वर बाजड (प.स.सदस्य),श्री.महीपती इंगळे, (अध्यक्ष शहर)मानवहीत लोकशाही पक्ष ,बाला रत्नपारखी,कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री वसंतराव जोगदंड उपस्थित होते.सर्वप्रथम लहुजी वस्ताद साळवे,साहीत्य रत्न आन्नाभाऊ साठे, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री वसंतराव जोगदंड सर ह्यांनी केले . प्रास्ताविकातून लहुजी साळवे कर्मचारी महासंघाचे धेय, धोरण, भविष्यकाळात करावयाचा कृती कार्यक्रम निश्चीत करुन समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत विकासाची निश्चित दिशा आदी बाबतीत सविस्तर प्रस्ताविका...

भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था, नांदेड द्वारा उद्योजकता विकास कार्यक्रमाचे सहा दिवशीय प्रशिक्षणाचे आयोजन

Image
  भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था, नांदेड द्वारा उद्योजकता  विकास कार्यक्रमाचे सहा दिवशीय प्रशिक्षणाचे आयोजन नांदेड दि ३० भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था, नांदेड द्वारा ग्रामीण भागातील बेरोजगार व्यक्तींकरिता स्वयं रोजगार आणि कौशल्य विकास अंतर्गत दिनांक 23 ऑगस्ट पासून आयोजित सहा दिवसीय उद्योजकता विकास कार्यक्रम प्रशिक्षणाचे नायगाव तालुक्यातील ग्राम वजीरगाव येथे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये उद्योजकता विकास, स्वयंरोजगाराचे महत्व व काळाची गरज, कार्यप्रेरणा, प्रभावी संभाषण कौशल्य, रिस्क मॅनेजमेंट, आत्मविश्वास बांधणी, गुणवत्तापूर्ण उत्पादन, मार्केटिंग मॅनेजमेंट, व्यवसायिक संधी, बाजार सर्वेक्षण विश्लेषण, बँकिंग, प्रकल्प अहवाल, आर्थिक साक्षरता, सॉफ्ट स्किल्स इत्यादी विषयांचे प्रशिक्षण देण्यात येते. विविध कार्यक्रम, खेळ आणि क्षेत्र भेटी द्वारा त्यांच्या मध्ये प्रेरणा निर्माण करणे हा मुख्य उद्देश या प्रशिक्षणाचा असून प्रशिक्षण कार्यक्रम भारतीय स्टेट बँक आरसेटी मार्फत पूर्णपणे मोफत आयोजित केला जातो, प्रशिक्षण कालावधी मध्ये प्रशिक्षण...

क्रीडापीठाच्या माध्यमातून खेळाडूंना घडवणार – क्रीडामंत्री सुनिल केदार

Image
क्रीडापीठाच्या माध्यमातून खेळाडूंना घडवणार – क्रीडामंत्री सुनिल केदार राष्ट्रीय क्रीडादिनी खेळाडूंचा गौरव   नागपूर दि. 30 : नुकत्याच झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये देशातील क्रीडापटूंनी उत्तम कामगिरी केली. राज्यातील खेळाडू व मार्गदर्शक घडविण्यासाठी पुणे येथील क्रीडापीठ येत्या ऑक्टोबर महिन्यापासून कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले. राष्ट्रीय क्रीडादिनी विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विमला आर., शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त गणेश कोहळे, उपसंचालक क्रीडा व युवक कल्याण शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, तालुका क्रीडा अधिकारी पवन मेश्राम यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय खेळाडू गुरुदास राऊत, दिव्यांग खेळाडू क्रिकेट क्रीडा प्रकारातील मृणाली पांडे, दिव्यांग बुध्दिबळ खेळाडू मालविका बनसोड, बॅडमिंटन खेळाडू दिपिका ठक्कर, अल्फीया पठाण, रौनक साधवाणी, जलतरण पटू जयंत दुबळे, बुध्दिबळपटू संकल्प गुप्ता, जिम्नॅस्टिक मृणयी वालदे, आयुषी घोडेस्...

हरितगृह, शेडनेटगृह उभारणी करणाऱ्या सेवा पुरवठादारांनी राज्यस्तरीय नोंदणी करावी

Image
  हरितगृह, शेडनेटगृह उभारणी करणाऱ्या सेवा पुरवठादारांनी राज्यस्तरीय नोंदणी करावी ·          नोंदणीसाठी एक महिन्याची मुदतवाढ वाशिम ,   दि. ३०  :   सन २०२१-२२ करिता एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान-संरक्षित शेती घटकांतर्गत हरितगृह, शेडनेटगृह, केबल अॅण्ड पोस्ट प्रकारचे शेडनेटगृह उभारणी करणाऱ्या कंपनी, सेवा पुरवठादरांची नोंदणी प्रक्रिया राज्यस्तरावर राबविण्यात येत आहे. कंपनी, सेवा पुरवठादरांनी नोंदणी प्रस्ताव सादर करण्यासाठी यापूर्वी १० ऑगस्ट २०२१ पर्यंत अंतिम मुदत होती. या नोंदणीसाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी इच्छुक सेवा पुरवठादार यांनी विहित अटी व शर्तीच्या अनुषंगाने आवश्यक कागदपत्रांसह नोंदणीचे प्रस्ताव संचालक, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, साखर संकुल, पुणे-५ या कार्यालयास एका महिन्याच्या आत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाने केले आहे. हरितगृह, शेडनेटगृह, केबल अॅण्ड पोस्ट प्रकारचे शेडनेटगृह उभारणी करणाऱ्या कंपनी, सेवा पुरवठादरांच्या राज्यस्तरीय नोंदणीची कार्यपद्धती, ...

सुशिक्षित बेरोजगार संस्थांना होणार काम वाटप; ६ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Image
  सुशिक्षित बेरोजगार संस्थांना होणार काम वाटप ;  ६ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन वाशिम ,   दि. ३०  :     राज्य शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या धोरणानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय काम वाटप समितीमार्फत जिल्ह्यातील सुशिक्षित बरोजगारांच्या सेवा सोसायटींना कंत्राटी तत्त्वावर काम वाटप करण्यात येते. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राकडे मालेगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सफाई कामगाराचे १ पद, मानोरा येथील दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) न्याय दंडाधिकारी यांचे कार्यालयातील सफाई कामगारचे १ पद, मंगरूळपीर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सफाई कामगाराचे १ पद, वाशिम येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सफाई कामगाराचे १ पद, कारंजा येथील शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र येथील सफाई कामगाराचे १ पद अशा विविध कंत्राटी प्रकारची पदे भरण्यासाठी मागणी प्राप्त झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राकडे नोंदणीकृत जिल्ह्यातील इच्छुक व पात्र सुशिक्षित बेरोजगार...

खावटी अनुदान योजनेतून आदिवासी बांधवांना मिळतोय दिलासा – कृषी मंत्री दादाजी भुसे

Image
खावटी अनुदान योजनेतून आदिवासी बांधवांना मिळतोय दिलासा – कृषी मंत्री दादाजी भुसे   मालेगाव , दि. 29:   कोरोना संकटाच्या काळात अनुसूचित जमातीच्या नागरिकांसमोर रोजगाराचा प्रश्न उभा राहिल्याने त्यांना दिलासा देण्यासाठी खावटी अनुदान योजना सुरु करण्यात आली आहे. यामाध्यमातून संपूर्ण राज्यातील आदिवासी बांधवांना दिलासा देण्याचे चांगले काम उभे राहीले आहे. असे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण तर्फे येथील कृष्णा लॉन्स, मोतीबाग नाका, संगमेश्वर मालेगाव येथे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना खावटी कीटचे वाटप करण्यात आले. यावेळी मंत्री श्री.भुसे बोलत होते. यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवणचे उपजिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, विकास मीना, बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, संजय दुसाने, प्रमोद शुक्ला, उपप्रादेशिक अधिकारी नाशिक तुषार मोरे, सहायक प्रकल्प अधिकारी जे.एस.चौधरी, गृहपाल एन.सी.खैरनार, वरिष्ठ निरीक्षक एम.आर.देवरे, दीपक तलवारे, धोंडू अहिरे, रामदास सोनवणे, वाय.के.खैरनार, प्...

वीज बिलासाठी ग्रामपंचायतीना ५० टक्के निधी देणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्हा नियोजन समितीतून तरतूद करण्याच्या सुचना

Image
वीज बिलासाठी ग्रामपंचायतीना ५० टक्के निधी देणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्हा नियोजन समितीतून तरतूद करण्याच्या सुचना   चंद्रपूर दि. 29 ऑगस्ट :   ग्रामपंचायतीअंतर्गत येणा-या सार्वजनिक पथदिव्यांचे कनेक्शन कापण्यासंदर्भात जिल्हाभरातून अनेक तक्रारी येत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे विंचू – काटे, तसेच अंधाराचा फायदा घेत वन्यप्राण्याच्या हल्ल्याची भीती नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे जीवितहाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभुमीवर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी तात्काळ बैठक बोलावली असून ग्रामपंचायतींना थकीत वीज बिल भरणा करण्यासाठी यापुढे जिल्हा नियोजन समितीतून 50 टक्के निधी देण्यात येईल, असे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला  जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, मनपा आयुक्त राजेश मोहिते, महावितरणच्या अधीक्षक अभियंता संध्या चिंवडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी( पंचायत) कपिल कलोडे  प्रामुख्याने उपस्थित होते. ग्रामपंचायत स्तरावर गावांमध्ये विजेसाठी ...