भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था, नांदेड द्वारा उद्योजकता विकास कार्यक्रमाचे सहा दिवशीय प्रशिक्षणाचे आयोजन

 भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था, नांदेड द्वारा उद्योजकता  विकास कार्यक्रमाचे सहा दिवशीय प्रशिक्षणाचे आयोजन




नांदेड दि ३० भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था, नांदेड द्वारा ग्रामीण भागातील बेरोजगार व्यक्तींकरिता स्वयं रोजगार आणि कौशल्य विकास अंतर्गत दिनांक 23 ऑगस्ट पासून आयोजित सहा दिवसीय उद्योजकता विकास कार्यक्रम प्रशिक्षणाचे नायगाव तालुक्यातील ग्राम वजीरगाव येथे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये उद्योजकता विकास, स्वयंरोजगाराचे महत्व व काळाची गरज, कार्यप्रेरणा, प्रभावी संभाषण कौशल्य, रिस्क मॅनेजमेंट, आत्मविश्वास बांधणी, गुणवत्तापूर्ण उत्पादन, मार्केटिंग मॅनेजमेंट, व्यवसायिक संधी, बाजार सर्वेक्षण विश्लेषण, बँकिंग, प्रकल्प अहवाल, आर्थिक साक्षरता, सॉफ्ट स्किल्स इत्यादी विषयांचे प्रशिक्षण देण्यात येते. विविध कार्यक्रम, खेळ आणि क्षेत्र भेटी द्वारा त्यांच्या मध्ये प्रेरणा निर्माण करणे हा मुख्य उद्देश या प्रशिक्षणाचा असून प्रशिक्षण कार्यक्रम भारतीय स्टेट बँक आरसेटी मार्फत पूर्णपणे मोफत आयोजित केला जातो, प्रशिक्षण कालावधी मध्ये प्रशिक्षणार्थ्यांची जेवणाची सुद्धा व्यवस्था विनामूल्य करण्यात आली. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपीय कार्यक्रमाकरोता प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान (उमेद) नांदेड चे जिल्हा व्यवस्थापक (आर्थिक साक्षरता) माधव भिसे, वजीरगाव सरपंच माने, आरसेटी प्रशिक्षण समन्वयक तथा प्रशिक्षक आशिष राऊत, समूह संसाधन व्यक्ती श्रीमती ढगे हे उपस्थित होते. समारोपीय मार्गदर्शन करतांना माधव भिसे यांनी आरसेटी प्रशिक्षणामुळे प्रशिक्षणार्थ्यांमध्ये होणारे सकारात्मक बदल तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढीवर विशेष प्रकाश टाकला आणि महिला बचत गटांच्या पुस्तपालना विषयी सविस्तर माहिती सांगून प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तदनंतर मान्यवरांच्या हस्ते सर्व प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. भारतीय स्टेट बँक आरसेटी नांदेड द्वारा अशा अनेक स्वयंरोजगाराभिमुख कौशल विकास अंतर्गत विविध निवासी आणि अनिवासी प्रशिक्षणाचे मोफत आयोजन करण्यात येत असते ज्यामध्ये शिवणकाम, ब्युटी पार्लर, पापड मसाला बनविणे, कागदी आणि कापडी बॅग बनविणे, शेळी संगोपन, कुकुटपालन, मोबाईल दुरुस्ती,दुचाकी वाहन दुरुस्ती, घरगुती उपकरन दुरुस्ती इत्यादी प्रशिक्षण मोफत आयोजित केले जातात. प्रशिक्षण कालावधी मध्ये प्रशिक्षणार्थ्यांची जेवणाची व राहण्याची व्यवस्था सुद्धा मोफत केली जाते. या सर्व प्रशिक्षणाचा ग्रामीण भागातील अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील बेरोजगार युवक युवतींनी लाभ घेण्याचे आव्हाहन संचालक प्रदीप पाटील यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू