रिसोड येथे लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाची सभा संपन्न.
रिसोड येथे लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाची सभा संपन्न.
(लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाचे सभासद)
रिसोड (युगनायक न्युज नेटवर्क)दि.२९ऑगष्ट रोजी पुष्पादेवी खडसे पाटील महाविद्यालय रिसोड येथे लहुजी साळवे कर्मचारी महासंघाच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते .सभेच्या अध्यक्षस्थानी प्रा.के.एन.साबळे (माजी.नगराध्यक्ष) तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.माधवराव रनबावळे, आनंदराव ताकतोडे,श्री.रविभाऊ आढाव
(प.स.सदस्य) ,श्री.ज्ञानेश्वर बाजड (प.स.सदस्य),श्री.महीपती इंगळे, (अध्यक्ष शहर)मानवहीत लोकशाही पक्ष ,बाला रत्नपारखी,कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री वसंतराव जोगदंड उपस्थित होते.सर्वप्रथम लहुजी वस्ताद साळवे,साहीत्य रत्न आन्नाभाऊ साठे, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री वसंतराव जोगदंड सर ह्यांनी केले . प्रास्ताविकातून लहुजी साळवे कर्मचारी महासंघाचे धेय, धोरण, भविष्यकाळात करावयाचा कृती कार्यक्रम निश्चीत करुन समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत विकासाची निश्चित दिशा आदी बाबतीत सविस्तर प्रस्ताविकात माहीती विषद केली.कार्यक्रमामध्ये श्री.बबनराव इंगळे, डॉ.भिमराव साठे, श्री एम.टी.काबळे, श्री.माधवराव रनबावळे,श्री.एस.जी.काबळे ,पुंडलिक गवळी यांनी कर्मचारी महासंघाचे वतीने येणाऱ्या भविष्यकाळात अन्नाभाऊ साठे यांचे स्मारक उभे राहिले पाहिजे, याकरिता आपण सर्व समाज बांधवानी तन, मन धनाने एकत्र येऊन समाज विकासासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंत्राची व विचाराची गरज असल्याचे मत वक्त्यांनी व्यक्त केले, अनुसूचित जातीचे लोकसंख्येच्या प्रमाणात अ,ब,क,ड वर्गीकरण झाले पाहिजे, लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या सिफारशी लागु झाल्या पाहिजेत,,आदि विषयांवर चर्चा करण्यात आली, त्याअनुषंगाने कृती कार्यक्रम राबविण्याचे ठरवले.कार्यक्रमासाठी प्रकाश थोरात, मारोती पारवे, प्रताप साबळे,धिरज साबळे,एस.पी.काबळे,बी.एन.खदारे, दशरथ कांबळे, सुखदेव कांबळे, बबनराव इंगळे, सुनिल दाभाडे, मनोज थोरात, आनंदराव ताकतोडे,के.एच.मानवतकर, रमेश कांबळे ,माधवराव रनबावळे, भानुदास डोंगरे,दत्तात्रय दुतोडे, पुंडलिक गवळी.सिताराम वानखेडे, विनोद बाऺगर, संतोष लोखंडे ( न.प.)राजु थोरात आदी बहुसंख्य कर्मचारी बांधव उपस्थित होते.कार्यक्रमामध्ये रिसोड तालुका अध्यक्ष म्हणून श्री.आत्माराम कांबळे यांची तर उपाध्यक्षपदी श्री.माधवराव रनबावळे,श्री.एम.टी.काबळे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री दत्तात्रेय दुतोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री सुनील दाभाडे यांनी केले कार्यक्रम कोरोनाचे नियम पाळुन कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME