साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

वाशिम, दि. ३१ (युगनायक न्युज नेटवर्क) : जिल्ह्यातील मातंग सामातील युवकांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी व समाजातील लोकांचे जीवनमान उंचावण्याकरिता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्यावतीने बीजभांडवल योजना व अनुदान योजनेतून कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावाअसे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक जे. एम. गाभणे यांनी कळविले आहे.
बीज भांडवल योजनेतून ५० हजार रुपये ते ५ लाख रुपयेपर्यंतच्या १० कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. यामध्ये महामंडळाचा सहभाग २० टक्केबँकेचे कर्ज ७५ टक्के व ५ टक्के लाभार्थी सहभाग असणार आहे. महामंडळाच्या बीज भांडवल रक्कमेवर ४ टक्के व्याजदर व बँकेच्या कर्ज रक्कमेवर बँकेचा व्याजदर राहील. अनुदान योजनेंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज प्रस्ताव बँकेला पाठविले जातात. त्यामध्ये महामंडळाचे १० हजार रुपये अनुदान व ४० हजार रुपये बँक कर्जाचा समावेश आहे. अनुदान योजने अंतर्गत ४० कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट जिल्ह्याला प्राप्त झाले आहे.
दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा मातंग समाज व त्यातील १२ पोटजातीपैकी असावा. वयोमर्यादा १८ ते ५० वर्षे आहे. कर्ज प्रकरणासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, घर टॅक्स पावती, कोटेशन, ज्या ठिकाणी व्यवसाय करावयचा आहे, त्या जागेचा पुरावा, प्रकल्प अहवाल इत्यादी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, वाशिम येथे कार्यालयीन वेळेत येवून कर्ज प्रस्ताव सादर करावेत, असे आवाह श्री. गाभणे यांनी केले आहे.



Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू