हरितगृह, शेडनेटगृह उभारणी करणाऱ्या सेवा पुरवठादारांनी राज्यस्तरीय नोंदणी करावी

 हरितगृह, शेडनेटगृह उभारणी करणाऱ्या

सेवा पुरवठादारांनी राज्यस्तरीय नोंदणी करावी



·        नोंदणीसाठी एक महिन्याची मुदतवाढ




वाशिम, दि. ३०  : सन २०२१-२२ करिता एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान-संरक्षित शेती घटकांतर्गत हरितगृह, शेडनेटगृह, केबल अॅण्ड पोस्ट प्रकारचे शेडनेटगृह उभारणी करणाऱ्या कंपनी, सेवा पुरवठादरांची नोंदणी प्रक्रिया राज्यस्तरावर राबविण्यात येत आहे. कंपनी, सेवा पुरवठादरांनी नोंदणी प्रस्ताव सादर करण्यासाठी यापूर्वी १० ऑगस्ट २०२१ पर्यंत अंतिम मुदत होती. या नोंदणीसाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी इच्छुक सेवा पुरवठादार यांनी विहित अटी व शर्तीच्या अनुषंगाने आवश्यक कागदपत्रांसह नोंदणीचे प्रस्ताव संचालक, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, साखर संकुल, पुणे-५ या कार्यालयास एका महिन्याच्या आत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाने केले आहे.

हरितगृह, शेडनेटगृह, केबल अॅण्ड पोस्ट प्रकारचे शेडनेटगृह उभारणी करणाऱ्या कंपनी, सेवा पुरवठादरांच्या राज्यस्तरीय नोंदणीची कार्यपद्धती, अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रे याबाबतचा सविस्तर तपशील www.mahanhm.in आणि http://krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तसेच बँक गॅरंटी राष्ट्रीयकृत बँकेबरोबरच शेड्युल्ड बँकेत जमा करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोरोना सदृश्य परिस्थिती व लॉकडाऊनमुळे ज्या सेवा पुरवठादारांची आर्थिक उलाढाल सन २०२०-२१ मध्ये कमी आहे. त्यांच्याकरिता सन २०१७-१८ पासूनचा सलग तीन वर्षाच्या आर्थिक उलाढालीचा सनदी लेखापालाचा अहवाल ग्राह्य धरण्यात येईल, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.


Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू