जिल्हा युवा पुरस्कारासाठी १५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव मागविले

जिल्हा युवा पुरस्कारासाठी १५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव मागविले


वाशिम, दि. ३१ (युगनायक न्युज नेटवर्क) :  जिल्ह्यात युवक-युवतींनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा आणि युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी युवा धोरणानुसार जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतो. सन २०१९-२० आणि सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील पुरस्कारासाठी युवा क्षेत्रात कार्य करणाऱ्या युवक-युवतींकडून आणि संस्थाकडून ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले होते. आता प्रस्ताव सादर करण्यास १५ सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
पुरस्कारासाठीचे प्रस्ताव संपुर्ण कागदपत्रासह १५ सप्टेंबर २०२१ पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे सादर करावे. पुरस्काराचे वितरण २६ जानेवारी २०२२ रोजी प्रजासत्ताक दिनी करण्यात येणार आहे. वैयक्तिक युवक व युवती पुरस्कार प्रत्येकी रोख १० हजार रुपयेमानचिन्ह व प्रमाणपत्र आणि संस्थेस ५० हजार रुपये रोखमानचिन्ह व प्रमाणपत्र असे दोन्ही पुरस्काराचे स्वरुप आहे. अधिक माहितीसाठी क्रीडा व युवक संचालनालयाच्या www.sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट दयावी. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथील स्काऊटचे जिल्हा संघटक राजेश गावंडे (भ्रमणध्वनी क्र. ९९२२३६५५८७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार यांनी केले आहे.



Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू