डॉ . साहित्यरत्न , साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त बहुजनाच्या महामानवाचे गद्दार कोण ?
डॉ . साहित्यरत्न , साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त बहुजनाच्या महामानवाचे गद्दार कोण ? -अॅड . आर . एन . कांबळे जिल्हा व सत्र न्यायालय , नाशिक , मो . नं . 8208965759 मित्रांनो दिनांक 01 ऑगस्ट 2021 हा डॉ . साहित्यरत्न , साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा जन्म दिव आहे . त्यांच्या यंती निमित्त हा लेख आपल्या समोर मांडण्याचा माझा मानस असल्यामुळे तो मी मांडत आहे . मित्रांनो वस्तुतः आपल्या भारत देशामध्ये बहुतेक बहुजन महामानव जन्मास आले त्या पैकी अण्णाभाऊ साठे हे आहेत . परंतु अण्णाभाऊ साठे व इतर बहुजन महामानवाचे मारेकरी ? गद्दार ? हे कोण आहेत ? याबद्दल आपणा सर्वाना माहिती मिळावी या उद्देशाने हा लेख लिहीत आहे . मित्रांनो सर्व बहुजन महामानवांनी जाती , धर्म , पंथ न पाळता त्यांनी त्यांचे काम केले , कर्म केले व ते सर्व प्राणीमात्रास उपयोगी पडणार या उद्येशाने केले होते . परंतु त्या संपूर्ण बहुजन महामानवाचे विचार फक्त त्यांच्याच जाती , धर्मा पुरते ठेवण्यात आले होते व आज रोजीही ठेवण्यात येत आहे व भविष्यात ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्यामुळे त...