अॅड . आर . एन . कांबळे यांच्या प्रयत्नांमुळेच एका पक्ष्याचा वाचला जीव ......
अॅड . आर . एन . कांबळे यांच्या प्रयत्नांमुळेच एका पक्ष्याचा वाचला जीव ......
पक्ष्याचा जीव वाचविल्यानंतर ऍड रवि कांबळे व सहकारी
नाशिक (जिल्हा प्रतिनिधी)दि. - 22 आकाशातील पक्षी हा गंगापूर रोड , एसटी कॉलनी जवळील एका झाडावर अचानक एक पक्षी कावळा हा उडत असतांना पतंगाच्या मांज्याला अडकल्यामुळे सदर पक्ष्याचा जीव वाचविण्यासाठी सर्व तेथील जनता आरडाओरड करीत असतांना तेथेच उभे असलेले अॅड . आर . एन . कांबळे यांनी नाशिक येथील फायर ब्रिगेड यांना फोन लावून त्यांना सदर पक्ष्याचा जीव वाचविण्याची प्रार्थना करुन लवकरात लवकर येण्याची विनंती केल्यानंतर तसेच त्यांचे बरोबर इक्बाल मणियार ( महानगरपालिका कर्मचारी ) यांनी सुध्दा सदर फायर ब्रिगेड यांना विनंती केल्यानंतर अवघ्या 10 ते 15 मिनिटांच्या आत येवून अथक प्रयत्नानंतर सदर पक्षी कावळयाचा जीव वाचविण्यात यश आले . सदरची घटना ही सकाळी 11 ते दुपारी 12 च्या दरम्यानची घडली असून सदर पक्ष्याचा जीव वाचविण्यासाठी सनी जाधव , सुरज पगारे , धनराज जाधव , सुहास नाठे , अशोक अहिरे तसेच सुनिल भाऊ मॅकेनिक यांनी व फायरब्रिगेड , महानगरपालिका यांनी मदत केल्यामुळेच आज रोजी त्यांच्या कृत्याची वाहवाह त्या परिसरामध्ये होत आहे व त्यामुळे आपण सर्वांनी मुक्या प्राण्याची कोणत्या न कोणत्या प्रमाणे त्यांचे रक्षण करावे , यातच सर्वांचे पर्यावरण विषयक हित आहे .
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME