निकृष्टतेच्या थराला पोहचलेला राजकारणातील आतंकवाद अॅड . आर . एन . कांबळे
निकृष्टतेच्या थराला पोहचलेला राजकारणातील आतंकवाद अॅड . आर . एन . कांबळे
अॅड . आर . एन . कांबळे
जिल्हा व सत्र न्यायालय , नाशिक मो . नं . 8208965759
यांचा विशेष लेख
मित्रांनो मी आज तुमच्या समोर विषय आतंकवाद तो ही राजकारणातला तुमच्यासमोर मांडणार आहे . तुम्ही प्रथमतः विचार करत असाल की आतंकवाद असतो . परंतु राजकारणातील आतंकदवाद हा नवीन विषय आहे . या विषयाकड आज रोजी दुर्लक्ष केल्यास तुम्हाला हा राजकारणातील आतंकवाद जिवंत मारण्यासाठी पोषक ठरु शकतो . आज भारत देशामध्ये लोकशाही असतांना सुध्दा तुम्हाला देखाव्यासारखी लोकशाही असल्याचे मला तरी वाटते कारण सुशिक्षत वर्गाने तसेच इतर गरीब व्यक्तीने , गरीब व्यक्तीने , मध्यमवर्गीय व्यक्तीने या राजकारणातील आतंकवाद या विषयावर बोलणेच टाळाले आहे . त्यामुळे ख - या आतंकवादापेक्षाही कितीतरी हजार पटीने जबरदस्तीने लादलेली महागाईचा भस्मासुर व इतर हाहाकार हाच तर तुमचा खरा आतंकवाद होय . राजकारणातील आतंकवाद हा प्रत्यक्षदशी तुम्हाला गोळया झाडणार नाही . परंतु करोना महामारीमध्ये संपूर्ण भारतीयांवर लादलेला प्राणघातक महागाईचा आंतकवाद आपल्या सर्वांना घेवून मारणारा सुध्दा आहे . या मध्ये मरणारा प्रत्येक भारतीय या आतंकवादामध्ये निश्चितच मरणार आहे . परंतु केंद्र सरकार किंवा राज्य सरकार या सारख्या मरणा - या लोकांना राजकारणातील आतंकवादामुळे मेल्याचे कधीही सांगणार नाही . म्हणूनच मॉरटीन लुथर किंग ज्युनीअर एके ठिकाणी म्हणतो की , " Every Man must decide whether he will walk in the light of creative altruism or in the dark of destructing selfishness " . त्यामुळे तुम्हाला ठरवायचे आहे की , तुम्ही स्वतः प्रकाशमान होऊन इतरांना प्रकाश दया म्हणजे तुम्हाला अवगत झालेले ज्ञान देवून या तुम्ही दुस - यांना प्रकाशमान करावे अन्यथा तुम्ही दुस - यांना अंधारात ठेवून स्वतःचा स्वार्थ साधू शकतात " आणि असे केल्यास तुम्हाला अवगत झालेले ज्ञान ते तुमच्यापर्यंत सिमित ठेवल्यास ते नष्टच होणारच ! आम्ही राजकारणातील आतंकवादाचे स्पष्टीकरण न दिल्यास निश्चितच आपल्या सर्व भारतीयांना मारणार सुध्दा आहे , त्यामुळे वेळीच जागृत न झाल्यास तुमच्या येणा - या पिढीवर , नातवडांवर हा राजकारणातील आतंकवाद हा निकृष्टतेचा थराला पोहचून छाताडावर बसल्या शिवाय राहणार नाही . आणी आपली येणारी पिढी व नातवंड यांना भयावह झालेल्या राजकारणातील आतंकवादाला निश्चितच लढू शकणार नाही आणि तेव्हा तुमची येणारी पिढी व नातवंड तुम्हाला बोलल्याशिवाय राहणार नाही ते विचार करतील की , आमच्या बापजादयाने राजकारणातील आतंकवादाला निमुटपणे सहन केल्यामुळेच आम्हाला या भयावह राक्षासाविरुध्द लढता येवू शकत नाही . तेव्हा आपण सुज्ञ नागरिक व एक भारतीय नात्याने आज रोजी या भयावह राक्षसाविरुध्द आवाज उठविण गरजेचे झाले आहे व त्या विरुध्द वेळीच राजकारणातील आतंकवाद बंद न केल्यास तो तुम्हाला , तुमच्या नातलगांना व येणा - या पिढीला रसातळाला नेल्याशिवाय राहणार नाही . त्यामुळे असे न होवू दयावे असे वाटत असेल तर उठा !, जागे व्हा ! आणि संघर्ष करा ! " आज देशामध्ये व जगामध्ये सुध्दा करोना महामारीचा उपद्रव सुध्दा प्रत्येक वस्तुचे भाव गगनाला पोहचत असून त्यामध्ये सामान्य माणुस व मध्यवर्गीय समाज हा फार मोठया अडचणींना सामोरे जात आहे . या सर्व प्रकाराला प्रत्येक भारतीय व्यक्ती जबाबदार असल्याचे मला वाटते . कारण अन्याय दिवसेंदिवस वाढत असून आपण सर्व मुग मिळून डोळे शांत असल्यासारखे वागत असल्यामुळेच हा राजकारणातील आतंकवाद दिवसेंदिवस वाढत आहे . त्यामुळे अन्याय करणा - यापेक्षा अन्याय सहन करणारा महापापी " असेच म्हणावे लागेल . या करोना महामारीच्या संकट काळामध्ये तुम्हाला घरी राहण्याचे उपदेश हे आतकवादी सरकार करीत असून महागाईच्या भस्मासुराबद्दल जनता बोलतांना दिसत नाही , याचेच मला खेद वाटते . म्हणजे तुम्ही करोना ने मरणार नाही पण तुम्ही उपासमारीमुळे निश्चितच मरणार याची तजविज केल्याचे दिसते व त्यामुळे करोनाने मरणारा आकडा कमीच राहणार असल्यामुळे सरकारचा दावा आम्ही करोनावर मात केल्याचे निश्चितच सांगणार आहे . त्यामुळे सदरची बाब तुमच्या लक्षात आणावी लागणार नाही का ? अशी बाब तुमच्या लक्षात आणून न दिल्यास आपणास व येणा - या पिढीस त्रास वाढण्याची शक्यता नाकारता येत चालु असतांना नाही . त्यामुळे बकरी बनून जगायचे का वाघ बनुन जगायचे हे तुम्हीच ठरवू शकतात . त्यामुळे मला डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आठवतात ते येणेप्रमाणे " शंभर दिवस बकरी बनुन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनुन जगा " असा महान संदेश दिला असतांनाही आपण सर्व बकरी बनण्याचे सोंग का करीत आहे . निश्चितच मला असे वाटते की , " तुम्ही सर्व भारतीय झोपण्याचे सोंग करीत तर नाही ना ? त्यामुळे " थांबला तो संपाला , धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे ! भ्रात तुम्हा का पडे ! भ्रांत तुम्हा का पडे ! " हे लक्षात ठेवणे गरजेचे झाले आहे . शवटो मी तुम्हाला सांगणार आहे की , " तुम्हाला लाचाराच्या फौजा तयार करायच्या का विचाराच्या " लाचाराचा फौजा तयार केल्यास त्या अवनतीच्या चिखलात तर तुम्ही फसणार आहे . परंतु त्याच बरोबर तुमची येणा - या पिढीला सुध्दा चिखलात फसवणार तर नाही ना ? याची काळजी आपण सर्व भारतीयांनी घेतली पाहिजे . " शहाणपणा हा आपल्या सर्व भारतीयाचा उत्कृष्ट मार्गदर्शक असून विश्वास हा उत्तम जोडीदार आहे . त्यामुळे प्रत्येक भारतीयाने या निकृष्टतेच्या थराला पोहोचलेल्या राजकारणातील आतंकवादाच्या अज्ञानाच्या अंधकारातुन व दुःखातुन मुक्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे व या ज्ञान मार्गाचा प्रकाश आपण सर्व भारतीय या नात्याने पसरविला पाहिजे व एक मोठा लढा उभारला पाहिजे " एवढीच अपेक्षा !
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME