परिचारिका यांच्या बेमुदत आंदोलनास ऑल इंडिया ब्लू टायगर सेनेचा जाहीर पाठिंबा
परिचारिका यांच्या बेमुदत आंदोलनास ऑल इंडिया ब्लू टायगर सेनेचा जाहीर पाठिंबा
परिचारिका यांच्या समस्या एकुण घेत असताना जगदीश मानवतकार अध्यक्ष ऑल इंडिया ब्लु टायगर सेना वाशिम आणि पदाधिकारी
स्थानिक वाशिम येथील जिल्हा अधिकारी कार्यालयावर परिचारिकांच्या होत असलेल्या बेमुदत आंदोलनास ऑल इंडिया ब्लु टायगर सेना वाशिम जिल्हा तर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला.सविस्तर बातमी अशी की ,परचारिकाना कोणत्याही प्रकारचा कोरोणा भत्ता भेटत नाही,त्यांना केवळ ३००० रू.मासिक वेतन देण्यात येते,कोरीना किट नाही,आरोग्य विमा नाही तसेच ज्यादा ड्यूटी केल्यास त्यांना कोणतेही मानधन देण्यात आले नाही. अश्या विविध प्रकारच्या मागण्यासाठी ह्या परीचारिका पावसात बेमुदत आंदोलन करीत आहेत.त्यांच्या मागण्या ज्यामध्ये त्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याचा विचार राज्यशासनाने करावा,त्यांना पेन्शन सुविधा द्यावी,त्यांच्या मुला बाळाना शैक्षणिक सुविधा द्याव्यात,त्यांना दिवाळी दसऱ्यात बोनस द्यावा,अपघाती विमा द्यावा ,कामाचे तास कमी करावे,शनिवार रविवार ला शासकीय सुट्टी द्यावी अश्या प्रकारची विनंती त्यांनी आंदोलना द्वारे केली आहे.ह्या मागण्या आघाडी सरकारने त्वरित पूर्ण करावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असे आवाहन जगदिश भाई मानवतकर यांनी केले आहे. यावेळी रामदास कदम,रवी ठोके, गजानन वाढवे,मुकेश ताजने,बादल वानखेडे,वैभव इंगोले,आनंद इंगोले,पवन वाढवे यांची उपस्थिती होती.भारतीय संविधान जिंदाबाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद, अण्णाभाऊ साठे जिंदाबाद,महात्मा फुले जिंदाबाद ,सावित्रीबाई फुले जिंदाबाद अश्या घोषणा देण्यात आल्या.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME