गुरु व शिष्य कसा ओळखावा ? - अॅड . आर . एन . कांबळे
गुरु व शिष्य कसा ओळखावा ? - अॅड . आर . एन . कांबळे
जिल्हा व सत्र न्यायालय , नाशिक
मो . नं . - 8208965759
मित्रांनो २३ जुलै हा गुरुपौर्णिमा हा दिवस होता व गुरुचे महत्व गुरुपौर्णिमेनिमित्त ते कधीही प्रस्तुत करता येतात . वस्तुतः आपल्या जिवनामध्ये वेळोवेळी कधी न कधी आपल्या पेक्षाही लहान व्यक्ती मोठा व्यक्ती , छोटा व्यक्ती , जाडा व्यक्ती इ . त्यांचे ज्ञान अफाट असलेला व्यक्ती भेटतो , तेव्हा जर आपल्यापेक्षा लहान असेल तर मी पणा नेहमी येतो . परंतु मित्रांनो मी पणा न आणता आपण गुरुला व शिष्यालाही ओळखू शकतो . त्या मुळे मला असे वाटते की , आपण गुरु व शिष्याला कोणत्या सद्गुणांनी ओळखू शकतो त्या सद्गुणांची ओळख आपल्या सर्वांना व्हावी या उद्येशाने हा लेख लिहित आहे . मित्रांनो चोख वर्तन ठेवणा - या शिष्याचा गुरु २५ सद्गुणांनी असावयास पाहिजे .
गुरुच्या अंगी २५ सद्गुण हे खालीप्रमाणे :
१ ) आपल्या शिष्यावार गुरुने सदैव देखरेख ठेवली पाहिजे ,
२ ) कोणते नियम पाळावे व कोणते कर्तव्य ताज्य मानाने या संबंधी सदैव उपदेश करीत राहिले पाहिजे .
३ ) कोणत्या गोष्टीत दक्षात बाळगावी व कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावे या संबंधी उपदेश देत राहिले पाहिजे ,
४ ) त्यांचे खानपान व झोपणे इ . बाबीकडे लक्ष ठेवले
पाहिजे .
५ ) आजारात लक्ष घातले पाहिजे ,
६ ) आतापर्यंत त्याने काय मिळविले आणि काय नाही , या बाबीकडे लक्ष ठेवले पाहिजे ,
७ ) त्याच्या चारित्र्याकडे लक्ष ठेवले पाहिजे ,
८ ) भिक्षापत्रात जे काही मिळाले असेल ते वाटून खाल्ले पाहिजे ,
९ ) घाबरु नकोस , हे ही तुला समजेल असे म्हणून त्यास प्रोत्साहित केले पाहिजे ,
१० ) त्यांनी कोणाशी संगत करावी या विषयी वारंवार सांगत राहिले पाहिजे ,
११ ) शिष्याने कोणत्या गावी जावे हे सांगितले पाहिजे ,
१२ ) त्यांनी कोणत्या विहारात जावे हेही सांगितले पाहिजे , १३ ) त्यांच्याशी गप्पा ठोकत व्यर्थ वेळ घालु नये ,
१४ ) त्यांचे दोष दिसून आल्यास सहजा त्याला गुरुने क्षमा केली पाहिजे ,
१५ ) ज्याला मन लावून दिले पाहिजे ,
१६ ) अनाठायी सुट्टी न देता त्याला शिकविले पाहिजे ,
१७ ) शिष्यापासून ज्ञान लपवून ठेवू नये ,
१८ ) आपल्या जवळील सर्व ज्ञान उत्साहपुर्वक शिष्यास शिकविले पाहिजे ,
१ ९ ) शिष्यास आपला ज्ञान - पुत्र समजून गुरुने त्यावर पुत्रवत प्रेम ठेवले पाहिजे ,
२० ) तो आपल्या उद्येष्टापासून वळणार नाही याची खबदारी गुरुने सतत आपल्या मनात ठेवली पाहिजे ,
२१ ) सर्व प्रकारची विद्या शिकवून मी त्याला पारंगत करीत आहे . याचे भान असायला पाहिजे . ,
२२ ) गुरुने शिष्यप्रती मैत्री भावनेने प्रेमळ वर्तन केले पाहिजे . , २३ ) त्यावर आपली आपत्ती आली असता त्याला सोडून न देता त्याचे रक्षण केले पाहिजे . ,
२४ ) त्याला शिक्षविण्यासारख्या गोष्टीकडे दुर्लक्ष करु नये ,
२५ ) धर्मापासून शिष्य ढळत असल्यास त्याला सावरुन धरले पाहिजे .
शिष्याचे १० गुण : मित्रांनो शिष्याचे १० गुण हे त्यांच्या वर्तणुकीवरुन आपण ओळखले पाहिजेल , ते येणेप्रमाणे :
१ ) शिष्याने आपल्या गुरुविषयी पूर्णपणे सहानुभूती बागळली पाहिजे ,
२ ) शिष्याने धर्माला सर्वश्रेष्ठ मानावे ,
३ ) भिक्षुस यथाशक्ती दान देण्यास चुकु नये ,
४ ) धर्माचा लोप पावत आहे , असे दिसून आल्यास धर्माच्या पुनरुज्जी करण्यासाठी पराकाष्ठाचे प्रयत्न केले पाहिजे ,
५ ) तो त्रिरत्नापैकी योग्य विचारसरणी ठेवीत असतो ,
६ ) असा शिष्य केवळ जिज्ञासे पायी सर्वत्र प्रसिध्दी मिळेल म्हणून इतराच्या मनात न जाता धर्माप्रती , गुरुप्रती एकनिष्ठ राहतो ,
७ ) असा शिष्य सतत आपल्या विचारावर व कृतीवर लक्ष ठेवतो ,
८ ) तो शांतताप्रिय असतो . ,
९ ) एकतेचा प्रशासक असतो आणि
१० ) असा शिष्य केवळ धर्माचे दिखावू अवडंबर माजवित नाही .
तर तो यर्थाथाने बुध्दीप्रमाणे , सुमार्गाप्रमाणे , सुगताप्रमाणे संघाच्या ठायी त्याची नितांत आवश्यकता आहे . मित्रांनो सांगण्याचे तात्पर्य असे आहे की , आज आपल्या समाजामध्ये आपण कोणाला न कोणाला गुरु व शिष्य मानतो . परंतु वस्तुत : गुरु व शिष्य या मधील २५ सद्गुण गुरुचे आणि १० सद्गुण शिष्याचे असतील तर तेच गुरु - शिष्य म्हणावे , अन्यथा गुरु - शिष्य म्हणण्यास काही अर्थ नाही . त्यामुळे सदरचा लेख हा सर्व बांधवास , भगिनीस , मातेस अर्पण आहे . आपणही त्यामध्ये गुरु - शिष्याचा भाग बनवा . शिष्य संकटात असेल तर गुरुने मदत करावी आणि वस्तुत : या गुरु - शिष्याचा भाग म्हणून प्रथमतः आपण पुस्तकांनाच प्रथम गुरु संबोधले जाते . परंतु ही पृथ्वी बस आहे व आपण सर्व या पृथ्वीवरील प्रवासी आहोत आणि मनुष्य देखील आहोत . त्यामुळे मनुष्याने मनुष्याप्रमाणे वागावे , त्या प्रमाणे गुरु -शिष्याने आणि शिष्य - गुरुने वागावे यातच जगाचे कल्याण आहे . वस्तुतः शेवटी मी आपणांस या लेखाद्वारे त्या गुरु - शिष्यांना सांगण्यास माझे प्रथम प्राधान्य राहिल ज्यांनी या २५ सद्गुणांनी गुरु म्हणून कार्य केले . तसेच १० सद्गुणांनी शिष्य म्हणून कार्य केले त्यांनाच माझा कोटीकोटी प्रमाण . शेवटी भारतीय या नात्याने आपण सर्व या २५ व १० सद्गुणाचे ठायी व्हाल एवढीच अपेक्षा करतो .
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME