ही मदत नव्हे हे तर माणूसशकीचा कर्तव्य आहे
ही मदत नव्हे हे तर माणूसशकीचा कर्तव्य आहे
म्हाड. पोलादपूर. कोल्हापूर. चिपळूण. सातारा. सांगली. व इतर पुरग्रस्तांना. लोणार शहरातुन सर्व हिंदू मुस्लीम बांधवांकडुन एक हात मदतीचा म्हणून 50 हजार रुपयांची मदत पाठविण्यात आली.
लोणार. प्रा लुकमान कुरेशी
आज दिनांक 30-7-2021 रोजी मदत नव्हे हे कर्तव्य म्हणून मदत फेरी काढण्यात आली. राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी मुळे झालेल्या पुराणे हाहाकार उडाला आहे. त्या मध्ये घरे. अंथरुण पांघरूण. अन्नधान्य अंगावरील कपडे जीवनावश्यक वस्तू सर्व काही पुरामुळे वाहुन गेल्या. त्यामुळे त्या भागातील पिडीतांना आर्थिक मदत करण्यासाठी
जमीयत उलेमा - ए-हिंद च्या आदेशानुसार त्यांच्या आव्हानानुसार पश्चिम महाराष्ट्र व कोकण येथील पुरग्रस्तांना संकटातून सावरण्यासाठी जमीयत उलेमा - ए - हिंद शाखा लोणार पुढे आली. मदत नव्हे हे तर माणुसकीचा कर्तव्य समजून लोणार शहर वासियांनी पुरग्रस्तांना मदत केली. देशात किंवा राज्यात जेव्हा जेव्हा अशी संकटे आली त्या त्या वेळी जमीयत उलेमा - ए - हिंद ने वेळोवेळी विविध माध्यमातून त्या त्या ठिकाणी मदत केलीच आहे. अता सुध्दा या संकटातून सावरण्यासाठी जमीयत उलेमा - ए - हिंद च्या वतीने आपले कर्तव्य समजून पुरग्रस्तांना आपल्या बांधवांना भगिनींना मदतीसाठी रिमझिम पाऊसात आमच्या सर्व हिंदू मुस्लीम बांधवां पर्यंत मदत मिळाली. कोरोना सारख्या भयानक आजाराच्या प्रादुर्भावात ही लोणार वासियांनी फुल न फुलांची पाकळी म्हणून जवळपास 50 हजारांची मदत केली या पुरग्रस्त मदत फेरीत हाजी हाजी मो रिजवान खान. हाफिज मो तारिख मौलाना साहब. मो अयाज मौलाना साहब. अहेमद मौलाना साहब. सद्दाम मौलाना साहब. हाजी शमशोद्दीन सर. गफूर भाई. आबेद खान मोमीन खान नगर परिषद सदस्य लोणार. प्रा लुकमान कुरेशी. अकील सर. अमजद भाई. हाजी माबुदसेठ. डॉ ताहेर. भददु साहेब मॅकेनिक. शफी मौलाना साहब. हाफिज मौलाना साहब. अहेमद भाई. मजीद सर. फैसल सर. इरशाद भाई. सोहेल खान. व इतर समाज बांधवांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME