Posts

शेती उत्पादक कंपनीची कामे -खरोखर आज शेकऱ्यांनी आत्मनिर्भर झालेच पाहिजे

Image
शेती उत्पादक कंपनीची कामे उत्पादन, हार्वेस्टिंग, प्रोक्युरमेंट, ग्रेडिंग, पुलिंग (एका ठिकाणी जमा करणे), हातळणी, विपणन (मार्केटिंग), विक्री, निर्यात – कंपनी सभासद सदस्य यांचे व्दारा, वस्तु किंवा सेवा आयात करुन निर्माण झालेल्या उत्पादनाचे. म्हणजेच कंपनी सभासद सदस्य यांनी उत्पादन केलेल्या किंवा कंपनीने त्यासाठी आयात केलेल्या अशा उत्पादनाचे उत्पादन, हार्वेस्टिंग, प्रोक्युरमेंट, ग्रेडिंग, पुलिंग, हातळणी, विपणन, विक्री आणि निर्यात करु शकतात. तसेच कंपनी यासर्व क्रिया स्वतः किंवा बाहेरील एखाद्या संस्थेकडून करुन घेवू शकतात. जर कंपनीला वाटते, कि, शेतक-यांना ३-४ महिने शेती वापरण्याचे भाडे म्हणुन २-३ हजार रुपये देखील द्यायचे (अर्थात हे कंपनी व्यवस्थापन ठरवणार आहे आणि कंपनी कडे किती खेळते भांडवल राहते त्यावरुन ते ठरेल) तर कंपनी ते देवू शकते. शेतकरी जमिनीचे भाडे (ऐच्छिक), मालाचा चांगला दर, प्रक्रिया केल्यानंतर विक्री होवून मिळणारा नफा, प्रक्रिया केंद्रात गावातील तरुणांना रोजगार, विक्रीसाठी रोजगार, तसेच वाहतुकीचा रोजगार हे सर्व फायदे मिळवू शकतात. प्रक्रिया उद्योगाची सब्सिडी, बँकेकडून कर्ज तसेच इतर फा...

संविधान , मुलभूत अधिकार प्रायव्हेटायशेन ( खाजगीकरण ) व समर्थन अॅड . आर . एन . कांबळे

Image
संविधान , मुलभूत अधिकार प्रायव्हेटायशेन ( खाजगीकरण ) व समर्थन अॅड . आर . एन . कांबळे जिल्हा व सत्र न्यायालय , नाशिक   मो . नं . -8208965759   मित्रांनो मी आपल्या समोर संविधान , मुलभुत अधिकार व खाजगीकरण या संदर्भात सदरचा लेख आपल्या समोर मांडण्याचा मानस का आहे ? याची कारण असे की , सदर खाजगीकरणामुळे आपल्या मुलभुत अधिकरावर गदा येतो व सदरचे खाजगीकरणच अप्रत्यक्षरित्या संविधानाला संपविण्याचा मानस ठेवतो . मित्रांनो संविधनामुळे आपल्याला मुलभूत अधिकार भेटतात व तेच मुलभुत अधिकार खाजगीकरणामुळे त्याचेवर गदा येत असेल तर अप्रत्यक्षरित्या संविधानावर घाला घालणेच होय . वस्तुतः या खाजगीकरणामुळे भारत देशामध्ये जी लोकशाही नांदत आहे तीला कशाप्रकारे गदा यत आहे याबद्दलही या लेखद्वारे मला आपल्याला सांगायचे आहे . मित्रांनो प्रायव्हटेशन म्हणजे खाजगीकरण असून संपूर्ण समाजाला , राष्ट्राला दिलेली किड आहे . आणि या किडीचे रुपांतर हे हळुहळु गुलामीकडे जाणारे प्रथम पाऊल म्हणता येईल व शेवटचे पाऊल हे मुलभुत अधिकार नष्ट झाल्यानंतर व त्या मुलभुत अधिकारांना संविधानाने स्वंरक्षण दिले असून त्या संरक्षणालाच छेद पाडण्...

हम सब भारतीय है इस संविधान के राज में अॅड . आर . एन . कांबळे

Image
  हम सब भारतीय है इस संविधान के राज में  अॅड . आर . एन . कांबळे जिल्हा व सत्र न्यायालय , नाशिक मो . नं . 8208965759  बेच बेच कर चाय बेच डाला भाई तेरे अच्छे राज मे  || 1 ||  हमने सोचा चाय बेचने वाला लायेंका अच्छे दिन भारत के राज मे || 2 ||  बेच बेचकर देश को बेच डाला भाई तेरे अच्छे राज मे वाह तेरे अच्छे दिन भाई तेरे राज मे ||3 || हमारे बन गये बुरे दिन भाई तेरे राज मे बुरे दिन हम नही कह सकते भाई तेरे अच्छे राज मे  || 4 ||  कहना तो चाहते है पर मुह पर पट्टी बांधी है भाई तेरे अच्छे राज मे वाह क्या आये है अच्छे दिन भाई तेरे राज मे ||5 ||  धरम धरम का झगडा लाया भाई तेरे अच्छे राज मे क्या यही अच्छे दिन कह रहा था भाई तेरे अच्छे राज मे || 6 ||  झगडा लाकर हमे बरबाद किया भाई तेरे अच्छे राज मे || 7 || बरबाद करना इतना मकसद था तो चाय बेचने वाला देश बेचनेवाला हो गया है भाई तेरे अच्छे राज मे ||8 ||  क्या बरबादी हमारी लाया है भाई तेरे अच्छे राज मे ||9 || वाह यही है अच्छे दिन भाई तेरे अच्छे राज मे || 10 ||  जाती जाती मे भेद लगाया झगडे लाकर देशमे वा...
 दि . ०५  ऑक्टोबर  २०२१  मंगळवार  अंक २७७  वर्ष- ४    एकुण पान -४  खंड -४  किंमत - ५ ₹ रिसोड   केशव नगर पुणे युगनायक न्युज नेटवर्क एक प्रतिष्ठित मत दैनिक संवाद युगनायकांचा पान नंबर १ पान नंबर २ पान नंबर ३ पान नंबर ४ वाशिम जिल्ह्यातुन प्रकाशित मराठी दैनिक मुख्यसंपादक-अॅड.भारत द. गवळी संवाद युगनायकांचा (मराठी दैनिक)  TITLE -CODE :- MAHMAR49273 मुद्रक - भारत दत्तराव गवळी प्रकाशक -भारत दत्तराव गवळी मालक - युग गुरु बहु. शिक्षण संस्था ,रिठद ता. रिसोड , जिल्हा. वाशिम ४४४५१० ( अध्यक्ष - भारत दत्तराव गवळी ) मुद्रण स्थळ  - सत्यम कॉम्प्युटर्स अँड प्रिंटर्स , मालेगाव रोड , मु पो रिठद ता . रिसोड जि. वाशिम ,४४४५१० (महाराष्ट्र)  प्रकाशन स्थळ - मुख्य कार्यालय  दैनिक संवाद युगनायकांचा , मु .पो. रिठद ता. रिसोड जि. वाशिम ४४४५१० (महाराष्ट्र) संपादक -भारत दत्तराव गवळी  (सर्व वाद वाशिम न्यायालया अंतर्गत) प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही. (पी. आर. बी. ऍक्ट नुसार संपादक जवाबदार) SANWAD YUG...

ताजबाग परिसराच्या अतिरिक्त कामासाठी सुधारित प्रस्ताव सादर करा – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

Image
ताजबाग परिसराच्या अतिरिक्त कामासाठी सुधारित प्रस्ताव सादर करा – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत नागपूर ,   दि.   20 :  बाबा ताजुद्दीन यांच्या मुख्य दरबाराच्या बाहेरील वऱ्हांडा, दर्ग्याच्या बाहेरील भिंतीचे सौंदर्यीकरण  यासह मुख्य दर्ग्याच्या बाहेरील प्लॅटफॉर्मवर मेन दर्ग्याच्या बाहेर लावण्यात आालेल्या  इन्ले फ्लोअरिंग लावण्यासह मोठा ताजबाग परिसरातील अतिरिक्त कामासाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ताजबाग विकास आराखडा संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला समितीचे सदस्य आमदार मोहन मते, जिल्हाधिकारी विमला आर., महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., उपायुक्त विशेष शाखा बसवराज तेली, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी, अधीक्षक अभियंता लिना उपाध्ये, मुख्य अधीक्षक अभियंता व्ही. डी. सरदेशमुख, उपायुक्त (नियोजन) धनंजय सुटे, जिल्हा नियोजन अधिकारी ‍मिलिंद नारिंगे उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला ताजबाग संनियंत्रण समिती सदस्य म्हणून आमदार मोहन मते यांची सदस्य म्ह...

राज्यपालांच्या हस्ते ‘नॅक’च्या महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण अहवालाचे प्रकाशन

Image
राज्यपालांच्या हस्ते ‘नॅक’च्या महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण अहवालाचे प्रकाशन   मुंबई, दि. 21 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मंगळवारी (दि. २१) बंगळूरु येथे राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेने {नॅक} तयार केलेल्या  महाराष्ट्र राज्याच्या अहवालाचे प्रकाशन केले. 'महाराष्ट्र राज्यातील मूल्यांकन झालेल्या उच्च शिक्षण संस्थांचे राज्यस्तरीय विश्लेषण' या अहवालाच्या प्रकाशन कार्यक्रमाला राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेचे संचालक प्रो.एस. सी. शर्मा उपस्थित होते. नॅकने आतापर्यंत १६ राज्यांचे अहवाल तयार केले असून महाराष्ट्र राज्यातील उच्च शिक्षण संस्थांचे विश्लेषण असलेला नॅकचा हा १७ वा अहवाल आहे.  तज्ज्ञ समितीने तयार केलेल्या या अहवालामध्ये महाराष्ट्र राज्याचा परिचय, राज्यातील उच्च शिक्षण संस्थांच्या मूल्यांकनाचा आढावा, गुणवत्ता विश्लेषण, संख्यात्मक विश्लेषण, अहवालातील निष्कर्ष व निरीक्षणे तसेच भावी दृष्टिक्षेप व शिफारसींचा समावेश आहे.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्यात स्मारक उद्यान उभे करावे -राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर

Image
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्यात स्मारक उद्यान उभे करावे -राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामाबाबतच्या आढावा       पुणे            दि.20 :   स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्यात स्मारक उद्यान उभे करावे तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून लोकोपयोगी व जनहिताची कामे करण्यासाठी प्राधान्य देत शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार खर्च होईल याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिल्या. कोरोना कालावधीतील कार्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात पुणे महसूल विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर या पाच जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामाबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, नियोजन उपायुक्त संजय कोलगणे, आणि संब...

घरकुलसंदर्भातील प्रस्तावांना प्राधान्याने मार्गी लावा – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

Image
घरकुलसंदर्भातील प्रस्तावांना प्राधान्याने मार्गी लावा – पालकमंत्री विजय वडेट्टीवार तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याला आढावा घेण्याचे निर्देश   चंद्रपूर , दि. 20 सप्टेंबर :   आपले हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाला वाटते. ‘सर्वांसाठी घरे’ योजनेंतर्गत घरकुल उपलब्ध करून देण्याला शासनाने प्राधान्य दिले आहे. त्यानुसार घरकुलासंदर्भात आलेल्या प्रस्तावांना त्वरीत निकाली काढून गरजूंना घरकुलाचा लाभ द्यावा, असे निर्देश मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात घरकुल योजनेचा आढावा घेतांना ते बोलत होते. घरकुल हा लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय असून लाभार्थ्यांला हक्काचे घर मिळणे, हा त्याचा अधिकारसुध्दा आहे. घरकुल मंजूर होण्यासाठी स्थानिक स्तरावर सोपी पध्दत अवलंबिणे आवश्यक आहे. विनाकारण मंजूरीची फाईल या विभागातून त्या विभागात महिनोमहिने फिरत असते. त्यामुळे लाभार्थ्यांना मनस्ताप होतो. घरकुलासंदर्भात आपल्याकडे आलेली फाईल प्राधान्याने निकाली काढा. अधिकारी जेवढ्या लवकर त्यावर निर्णय घेईल, तेवढ्या लवकर तो प्रस्ताव मंजूर होऊन ल...

चिपी विमानतळ सेवा सुरू करण्यास परवानगी – पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती

Image
चिपी विमानतळ सेवा सुरू करण्यास परवानगी – पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती   मुंबई , दि. 20 : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ सुरू करण्यास नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (DGCA) ने  परवानगी दिली आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. पालकमंत्री श्री.सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन वर्षांपूर्वी कोकण दौऱ्यावर असताना चिपी विमानतळ सुरू करण्याचा शब्द कोकणवासियांना दिला होता. कोरोना काळातसुद्धा विकास कामाला गती देऊन मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती केली आहे. सिंधुदुर्गवासियांचे अनेक वर्षांचे स्वप्न या शासनाने प्रत्यक्षात उतरवले आहे. दि.9 ऑक्टोबर 2021 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या प्रमुख उपस्थितीत चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा होणार आहे, असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.   सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी राज्य शासनाने 966 कोटी रुपयांच्या निधीच...

सीताबर्डी येथील जुन्या पुस्तक विक्रेत्यांना मेट्रोने जागा उपलब्ध करून द्यावी- पालकमंत्री

Image
सीताबर्डी येथील जुन्या पुस्तक विक्रेत्यांना मेट्रोने जागा उपलब्ध करून द्यावी- पालकमंत्री   नागपूर ,  दि.   20   :  सीताबर्डी येथील वर्षानुवर्ष जुनी पुस्तके विकणाऱ्या दुकानदारांना मेट्रोने पुस्तक विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले. स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांना तसेच विविध क्षेत्रातील संशोधक व अभ्यासक मोठ्या प्रमाणावर जुनी पुस्तके विकत घेतात. अनेक वर्षापासून हे पुस्तक विक्रेते करत असलेल्या व्यवसायाचे नुकसान होणार नाही, या दृष्टीने प्रयत्न करावे, असे श्री. राऊत यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पुस्तक विक्रेत्यांच्या अडचणीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी विमला आर., महानगर पालिका आयुक्त राधाकृष्णन बी. नागपूर पुस्तक विक्रेता कल्याणकारी संस्थचे अध्यक्ष नरेश वाहाणे, मेट्रोचे कार्यकारी संचालक प्रशासन अनिल कोकाटे उपस्थित होते. मेट्रोची 20 मजली इमारत फ्रीडम पार्क येथे होणार आहे. त्यात जुन्या पुस्तक विक्रेत्यांना  दहा बाय दहा किंवा आठ बाय दहा अशा स्वरूपात पर...

डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांच्या सायकल शर्यतीतील अनुभवावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन

Image
डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांच्या सायकल शर्यतीतील अनुभवावर आधारित पुस्तकाचे  प्रकाशन   मुंबई दि २०: वैधमापन शास्त्र नियंत्रक डॉ. रविंद्र सिंगल यांच्या सायकल शर्यतीवरील अनुभवांचे संकलन असलेल्या एका पुस्तकाचे प्रकाशन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'वर्षा' निवासस्थानी करण्यात आले. डॉ. सिंगल यांनी २०१७ मध्ये पुणे ते गोवा डेक्कन क्लिफ हँगर या ६४३ किलोमीटरच्या सायकलिंगच्या शर्यतीमध्ये भाग घेतला होता. ही शर्यत अतिशय खडतर होती तसेच विशिष्ट कालमर्यादेत ती पूर्ण करणे अतिशय आवश्यक होते. त्याकरिता मानसिक व शारीरिक तंदुरुस्ती तसेच सराव क्रमप्राप्त होते. याकरिता डॉ. सिंगल यांनी ६ महिने प्रशिक्षण घेतले. त्यांनी ४ नोव्हेंबर, २०१७ रोजी प्रत्यक्षात सदर शर्यतीत भाग घेतला. त्यांच्याबरोबर इतर काही प्रतिस्पर्धी होते, परंतु मानसिक व शारीरिक थकव्यामुळे काहींनी ही शर्यत मध्येच सोडून दिली. तथापि, डॉ. सिंगल यांनी  मानसिक तयारी असल्याने ही  शर्यत वयाच्या पन्नाशीतही पूर्ण केली. या शर्यतीचा ६४३ किलोमीटरचा सायकलवरील खडतर प्रवास करताना शारीरिक व मानसिक क्षमतांचा पूर्ण कस लागला तो  प्रव...

कलापथकांना भांडवली आणि प्रयोगासाठी अनुदान मंजुरीसाठी समिती पुनर्गठित

Image
कलापथकांना भांडवली आणि प्रयोगासाठी अनुदान मंजुरीसाठी समिती पुनर्गठित   मुंबई , दि. 20: राज्यातील लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली आणि प्रयोगासाठी अनुदान मंजूर करण्यासाठी समिती पुनर्गठित करण्यात आली आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला आहे. महाराष्ट्रातील सर्व लोककला टिकून राहाव्यात,लोककलांची पुढील पिढीला माहिती व्हावी आणि महाराष्ट्रातील एकूणच सर्व पारंपरिक लोककलांचे जतन करण्यासाठी लोककलांना उत्तेजन द्यावे या हेतूने कलापथकांना भांडवली खर्चासाठी आणि प्रयोगासाठी अनुदान देण्यात येते. या अनुदान मंजुरीसाठी शासनामार्फत समिती पुनर्गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे अध्यक्ष तर सहसंचालक हे सदस्य सचिव असतील. माया खुटेगावकर, सुधीर कलिंगण, दिनेश गोरे, अभय तेरदाळे, पुरुषोत्तम बोंद्रे, अलंकार टेंभुर्णे, सुरेशकुमार वैराळकर, अंबादास तावरे, विलास सोनावणे, मोहित नारायणगावकर हे या समितीत सदस्य असतील.  ही समिती 8 सप्टेंबर 2021 रोजी निर्गमित शासन निर्णयाच्या दिनांकापासून पुढील तीन वर्षांसाठी किंवा समितीची पुनर्रचन...

आपसातील तंटे मध्यस्थी प्रक्रियेने सोडवावेत- श्रीमती शैलजा श. सावंत

Image
  आपसातील तंटे मध्यस्थी प्रक्रियेने सोडवावेत -           श्रीमती शैलजा श. सावंत वाशिम ,  दि. २०  (युगनायक न्युज नेटवर्क) :  मध्यस्थी प्रक्रियेचा अवलंब केल्याने वेळ व पैशाची बचत होते. तसेच या प्रक्रियेमध्ये दोन्ही पक्षकारांची जीत होते. त्यामुळे आपसातील तंटे मध्यस्ती प्रक्रियेने सोडविण्याचे आवाहन वाशिम जिल्हा विधी सेवा समितीच्या अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती शैलजा श. सावंत यांनी केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य मध्यस्थी केंद्राच्या निर्देशानुसार वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधिज्ञ संघाच्या संयुक्त विद्यमाने १८ सप्टेंबर रोजी जिल्हा न्यायालयामध्ये आयोजित मध्यस्थी संबंधी जनजागृती कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य न्यायदंडाधिकारी आर. पी. कुलकर्णी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव तथा वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश संजय पां. शिंदे, जिल्हा विधिज्ञ संघाच्या अध्यक्ष अॅड. श्रीमती सी. एन मवाळ, अॅड. एस. एन. काळू, विविध बँकांचे प्रतिनिधी, विधिज्ञ व पक्षकार यांची उपस्...

जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता नववी प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्यास प्रारंभ

Image
  जवाहर नवोदय विद्यालय  इयत्ता नववी प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्यास प्रारंभ वाशिम ,  दि. २०  (युगनायक न्युज नेटवर्क) :  केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड, दिल्ली द्वारा घेण्यात येणारी जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता ९ वी निवड चाचणी परीक्षेचे प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यास सुरुवात झाली आहे. वाशिम जिल्ह्यातील मान्यताप्राप्त सरकारी, निमसरकारी अथवा खाजगी शाळेत शैक्षणिक सत्र २०२१-२२ मध्ये इयत्ता आठवीत शिकत असलेले विद्यार्थी या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करू शकतील, असे वाशिम जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस. डी. खरात यांनी कळविले आहे. इच्छुक विद्यार्थ्याचा जन्म १ मे २००६ ते ३० एप्रिल २०१० दरम्यान झालेला असावा. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती संवर्गासह सर्व संवर्गातील विद्यार्थ्यांना ही अट लागू आहे. अधिक माहितीसाठी तसेच परीक्षेचे स्वरूप, इतर विस्तृत विवरण नवोदय विद्यालय समितीच्या  www.navodaya.gov.in   किंवा  www.nvsadmissionclassnine.in   या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच ऑनलाईन सुध्दा याच संकेतस्थळावर १३ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत विनामुल्य...

जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक जिल्हास्तरावर आचारसंहिता नियंत्रण कक्ष स्थापन

Image
  जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक जिल्हास्तरावर आचारसंहिता नियंत्रण कक्ष स्थापन वाशिम ,  दि. २० (युगनायक न्युज नेटवर्क) :  वाशिम जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या ६ पंचायत समित्यांच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार १३ सप्टेंबर २०२१ ते ६ ऑक्टोबर २०२१ दरम्यान जिल्ह्यात आचारसंहिता लागू राहणार आहे. निवडणूक आचारसंहिताविषयक तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर आचारसंहिता नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सदर कक्ष २४X७ तास सुरु राहणार असून मतदार, उमेदवार व राजकीय पक्ष यांना प्रत्यक्ष नियंत्रण कक्षामध्ये किंवा दूरध्वनी क्रमांकावर, व्हाटसअपद्वारे आपल्या तक्रारी नोंदविता येतील, असे आचारसंहिता विषयक नोडल अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार यांनी कळविले आहे. आचारसंहिता विषयक प्राप्त तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील दुसऱ्या माळ्यावर नैसर्गिक आपत्ती विभागात आचारसंहिता नियंत्रण कक्षाची स्थापन करण्यात आला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली स्थापन करण्यात आलेल्या या कक्षामधील ०७२५२-२३४२३...

जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक जिल्हास्तरीय निवडणूक संनियंत्रण समिती स्थापन

Image
  जिल्हा परिषद ,  पंचायत समिती पोटनिवडणूक जिल्हास्तरीय निवडणूक संनियंत्रण समिती स्थापन वाशिम ,  दि. २० (युगनायक न्युज नेटवर्क) :  वाशिम जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या ६ पंचायत समित्यांच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून जिल्ह्यात ६ ऑक्टोबरपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. निवडणूक आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ,  पोलीस अधीक्षक ,  अपर जिल्हाधिकारी यांच्यासह आयकर विभाग उपायुक्त ,  वस्तू व सेवा कर विभागाचे सहाय्यक आयुक्त ,  राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक ,  जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक ,  महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे अधिकारी ,  महाराष्ट्र राज्य प्रादेशिक परिवहन कायालायाचे अधिकारी व जिल्हा माहिती अधिकारी यांचा समावेश आहे. सदर समिती आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करणे ,  आर्थिक बळाचा दुरुपयोग टाळणे व मतदारांवर प्रभाव टा...

जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक पेड न्यूज संदर्भातील तक्रारींच्या चौकशीसाठी समिती गठीत

Image
  जिल्हा परिषद ,  पंचायत समिती पोटनिवडणूक पेड न्यूज संदर्भातील तक्रारींच्या चौकशीसाठी समिती गठीत वाशिम ,  दि. २०  (युगनायक न्युज नेटवर्क) :  वाशिम जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या ६ पंचायत समित्यांचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या काळात मुद्रित प्रसारमाध्यमांमध्ये देण्यात येणाऱ्या पेड न्यूजच्या संदर्भातील तक्रारींची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी ,  निवासी उपजिल्हाधिकारी ,  सर्व मतदार विभाग तथा निर्वाचक गणाचे निवडणूक निर्णय अधिकारी ,  संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांचा समावेश असून जिल्हा माहिती अधिकारी हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरिता उमेदवारांनी करावयाच्या खर्चावर निवडणूक आयोगाने निर्बंध घातले आहेत. उमेदवाराने विहित मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्यास अशा उमेदवारास अनर्ह ठरविण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला आहेत. तसेच पेड न्यूजवर होणारा खर्च कुठेही दर्शवि...

जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक इलेक्ट्रॉनिक माध्यमातील जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक

Image
  जिल्हा परिषद ,  पंचायत समिती पोटनिवडणूक इलेक्ट्रॉनिक माध्यमातील जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक •     जाहिरात प्रमाणीकरणासाठी जिल्हास्तरावर समिती गठीत वाशिम ,  दि. २०  (युगनायक न्युज नेटवर्क) :  जिल्हा परिषद ,  पंचायत समिती पोटनिवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी जाहिरातीच्या ध्वनिफीत, चित्रफित, सीडी इत्यादी साहित्याची तपासणी करून दूरचित्रवाणी आणि रेडीओ ,  केबल नेटवर्कवरून प्रसारित करावयाच्या जाहिराती प्रसारित करण्यापूर्वी प्रमाणित करुन घेणे बंधनकारक आहे. या जाहिरातींचे प्रमाणीकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये अपर जिल्हाधिकारी ,  सर्व मतदार विभाग ,  निर्वाचक गणांचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचा समावेश असून जिल्हा माहिती अधिकारी हे समितीचे सदस्य सचिव आहेत. जाहिरातींचे प्रमाणिकरण करण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात प्रसारीत करण्याच्या पाच दिवस अगोदर सदर जाहिरातीची सी. डी. आणि संहिता (स्क्रिप्ट) दोन प्रतीत विहित नमुन्यातील अर्जासोबत समितीकडे...