जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक जिल्हास्तरावर आचारसंहिता नियंत्रण कक्ष स्थापन

 जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक

जिल्हास्तरावर आचारसंहिता नियंत्रण कक्ष स्थापन





वाशिमदि. २० (युगनायक न्युज नेटवर्क) : वाशिम जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या ६ पंचायत समित्यांच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार १३ सप्टेंबर २०२१ ते ६ ऑक्टोबर २०२१ दरम्यान जिल्ह्यात आचारसंहिता लागू राहणार आहे. निवडणूक आचारसंहिताविषयक तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर आचारसंहिता नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सदर कक्ष २४X७ तास सुरु राहणार असून मतदार, उमेदवार व राजकीय पक्ष यांना प्रत्यक्ष नियंत्रण कक्षामध्ये किंवा दूरध्वनी क्रमांकावर, व्हाटसअपद्वारे आपल्या तक्रारी नोंदविता येतील, असे आचारसंहिता विषयक नोडल अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार यांनी कळविले आहे.

आचारसंहिता विषयक प्राप्त तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील दुसऱ्या माळ्यावर नैसर्गिक आपत्ती विभागात आचारसंहिता नियंत्रण कक्षाची स्थापन करण्यात आला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली स्थापन करण्यात आलेल्या या कक्षामधील ०७२५२-२३४२३८ या दूरध्वनी क्रमांकावर तसेच ८३७९९२९४१५ या व्हाटसअप क्रमांकावरसंदेशाद्वारे तोंडी, लेखी, एसएमएस अथवा दूरध्वनीद्वारे मतदार, उमेदवार व राजकीय पक्ष यांना आचारसंहिता विषयक तक्रारी नोंदविता येतील. या तक्रारींची दखल घेऊन त्यांचा निपटारा करण्यासाठी नियंत्रण कक्षामध्ये कर्मचाऱ्यांची नेमणूक २४X७ तास करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू