जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक जिल्हास्तरीय निवडणूक संनियंत्रण समिती स्थापन
जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक
जिल्हास्तरीय निवडणूक संनियंत्रण समिती स्थापन
वाशिम, दि. २०(युगनायक न्युज नेटवर्क) : वाशिम जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या ६ पंचायत समित्यांच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून जिल्ह्यात ६ ऑक्टोबरपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. निवडणूक आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे.
या समितीमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, अपर जिल्हाधिकारी यांच्यासह आयकर विभाग उपायुक्त, वस्तू व सेवा कर विभागाचे सहाय्यक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे अधिकारी, महाराष्ट्र राज्य प्रादेशिक परिवहन कायालायाचे अधिकारी व जिल्हा माहिती अधिकारी यांचा समावेश आहे. सदर समिती आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करणे, आर्थिक बळाचा दुरुपयोग टाळणे व मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या वस्तूंच्या वाटपावर अंकुश ठेवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करेल.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME