संविधान , मुलभूत अधिकार प्रायव्हेटायशेन ( खाजगीकरण ) व समर्थन अॅड . आर . एन . कांबळे
संविधान , मुलभूत अधिकार प्रायव्हेटायशेन ( खाजगीकरण ) व समर्थन अॅड . आर . एन . कांबळे जिल्हा व सत्र न्यायालय , नाशिक
मो . नं . -8208965759
मित्रांनो मी आपल्या समोर संविधान , मुलभुत अधिकार व खाजगीकरण या संदर्भात सदरचा लेख आपल्या समोर मांडण्याचा मानस का आहे ? याची कारण असे की , सदर खाजगीकरणामुळे आपल्या मुलभुत अधिकरावर गदा येतो व सदरचे खाजगीकरणच अप्रत्यक्षरित्या संविधानाला संपविण्याचा मानस ठेवतो . मित्रांनो संविधनामुळे आपल्याला मुलभूत अधिकार भेटतात व तेच मुलभुत अधिकार खाजगीकरणामुळे त्याचेवर गदा येत असेल तर अप्रत्यक्षरित्या संविधानावर घाला घालणेच होय . वस्तुतः या खाजगीकरणामुळे भारत देशामध्ये जी लोकशाही नांदत आहे तीला कशाप्रकारे गदा यत आहे याबद्दलही या लेखद्वारे मला आपल्याला सांगायचे आहे . मित्रांनो प्रायव्हटेशन म्हणजे खाजगीकरण असून संपूर्ण समाजाला , राष्ट्राला दिलेली किड आहे . आणि या किडीचे रुपांतर हे हळुहळु गुलामीकडे जाणारे प्रथम पाऊल म्हणता येईल व शेवटचे पाऊल हे मुलभुत अधिकार नष्ट झाल्यानंतर व त्या मुलभुत अधिकारांना संविधानाने स्वंरक्षण दिले असून त्या संरक्षणालाच छेद पाडण्याचे काम शेवटचे पाऊल म्हणजे खाजगीकरण म्हणता येईल . मित्रांनो माझ्या लेखाद्वारे नेहमी महत्वाच्या गोष्टी व बाबी मांडण्याचा नेहमी प्रयत्न असतो . वस्तुतः खाजगीकरण ह हळुहळु पाजलेले विष ( slow Poision ) होय आणि विष पूर्ण पाजले तर त्या ज्या व्यक्तीने किंवा शासनाने जिवाने प्रथम व शेवटी एकदाच मारले तर लोकांना आपोआप कळेल की या व्यक्तीने मारले , सरकारने मारले व त्या प्रमाणे समजले जाईल . परंतु हळुहळु विष पाजण्यास वेळ , काळ जास्त लागतो व शेवटी त्या विषाचे प्रमाण जास्त वाढल्यास आपल्या जिवनावर ही गदा येते व ही गदा येवू नये म्हणून मला , तुम्हाला व आपल्याला सदर मुलभुत अधिकाराचे हनन करण्यापासून वाचायचे असेल तर खाजगीकरणाला समर्थन न करता त्याला विरोध करणेच हे संपूर्ण भारतीयांचे उदिदष्ट असले पाहिजेल . आणि त्या विरोधाचे सरकारचा ध्येय धोरणाचा विरोधात जनआंदोलन उभारले जाईल . परंतु हळुहळु खाजगीकरण केल्यास जनआंदोलन नव्हे क्षम आंदोलन मध्ये रुपांतरीत होईल . क्षमआंदोलन म्हणजे काय ? न केलेले जनआंदोलन म्हणजे क्षमआंदोलन होय . त्यामुळे आपण जनआंदोलनाचा भाग व्हावा किंवा क्षमआंदोलनाचा भाग होवू नये हे आपल्याला समजायला हवे . आपल्या बुध्दीप्रमाणे वागायला हवे कारण येथील सर्व जनता ही आपल्या दैनंदीन जिवनात बुध्दीनेच काम करते . त्यामुळे बुध्दीचा उपयोग करण्याची नितांत गरज आहे व तो सर्वाचा अधिकार आहे आणि तो आपण पालन करायला हवा . अन्यथा ......... मित्रांनो आपल्या देशाचा विचार केला तर देशामध्ये संविधान आहे . परंतु सदर संविधान हे तुमच्या , माझ्या हक्क , अधिकार , मुलभुत अधिकार मिळविण्याचे महत्वाचा गाभा किंवा ध्येय म्हणता येईल . कारण संविधानामुळेच आपल्या सर्वांना हक्क अधिकार , मुलभुत अधिकार भेटतात . परंतु हे हक्क अधिकार , मुलभुत अधिकार खाजगीकरणाद्वारे नष्ट केल्यास येथे फक्त आणि फक्त गुलामीच गुलामी दिसेल . त्यामुळे आपले हक्क अधिकार व मुलभुत अधिकार यांना प्रायव्हेटेशनच्या साखळदंडामध्ये जखडून ठेवल्यास राष्ट्रियकरणाचा कुणी मुडदा पाडणार तर नाही ना ? प्रायव्हेटेशनचे साखळदंड दिवसेंदिवस वाढत चालले आहे . यालाच " मौन सर्वार्थ साधनमः " ही भुमिका आपण सर्वांनी स्विकारल्यामुळे आज देश प्रगतीच्या नाही तर अधोगतीकडे प्रवास करतांना दिसत आहे . मित्रांनो प्रायव्हेटेशन हे राष्ट्रियकरणारची जागा घेते व महत्वाची बाब म्हणजे प्रायव्हेटेशन मुळे निश्तिच सरकारचा ताबा जावून काही प्रायव्हेट व्यक्तीचा ताबा येतो व प्रायव्हेट व्यक्तीला आपण काही बोलू शकत नाही . तसेच सरकार व शासकिय यंत्रणेला देखील बोलू शकत नाही . तसेच देशावर आर्थिक संकट आल्यास किंवा कोणत्याही प्रकारचे संकट आल्यास प्रायव्हेटेशन संस्था , प्रायव्हेटायशेन उद्योग हे आपल्या सरकारला किती मदत करते याचे उदाहारण आपल्याला दिसते . मित्रांनो आपल्या देशामध्ये खाजगीकरण हा मुद्या सन 1991-1992 मध्ये निर्माण झाला असून त्याची सरुवात दिनांक 24 जुलै 1991 रोजी झाली व दिनांक 24 जुलै 2021 रोजी त्यास जवळपास 30 वर्षे ओलांडून गेले आहेत . जेव्हा हे खाजगीकरण या देशामध्ये आले तेव्हा ही भारतातील जनतेने समर्थन करीत होते व आज रोजीह करीत आहे व भविष्यात देखील करीत आहेत आणि त्यानंतरही दिनांक 24 जुलै 2021 नंतरही संपूर्ण भारतीय जनता आज रोजी ही समर्थन करतांना दिसते . त्याचे साधे उदाहारण मी खालील प्रमाणे देण्याचा माझा प्रयत्न आहे तो असा की , " अन्याय करणा - यांपेक्षा अन्याय सहन करणारा महापापी होय " म्हणजे आज रोजी सांगायचे असेल तर " अन्याय करणा - यापेक्षा अन्याय सहन करणारा व अन्यायाला समर्थन करणारा समाज महामापी आहे " असे म्हणण्यास वावगे ठरणार नाही . ज्या ज्या लोकांनी समर्थन केले ते आज कोठे गेले ? कोणत्या कोप - यात जावून बसले ? हे मला कळत नाही व त्या लोकांचा शोध घेणे हे आपले आदय कर्तव्य भारतीय या नात्याने आहे का नाही ? आपण भारतीय आहोत . आपला एकच धर्म तो म्हणजे भारतीय . येथे जात नव्हे , पंथ नव्हे , धर्म नव्हे असेच म्हणता येईल तेव्हाच हा देश प्रगतीच्या दिशेने जाईल . कारण भारतीय समाज हा जात , पंथ , धर्म याला जास्त महत्व देत आहे . परतु जात , पंथ , धर्म हे देशापेक्षा मोठे नव्हे . त्यामुळे देशालाच प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे . त्यामुळे मला आपल्याला एका कथेद्वारे सांगावसे वाटते व त्या कथेतुन आपण काही तरी शिकाल व समाजाला देखील काही तरी सांगाल . ती कथा येणेप्रमाणे की , " एका राज्यामध्ये एक राजा रहात होता व त्या राजाला वाटत असे की , आपली जनता आपल्या विरुध्द षडयंत्र करीत तर नसेल ना ? या वर त्या राजाने त्याचे प्रधानाला विचारले की , त्यावर प्रधान म्हणाले की , महाराज ही जनता तुमच्या विरोधात जावूच शकत नाही , हे सिध्द करण्यासाठी मला काही तरी अधिकार दयावे जेणेकरुन मी तुम्हाला विश्वास देवू शकतो की , ही जनता तुमच्या विरोधात जावूच शकत नाही , हे सिध्द करण्यासाठी मला काही तरी अधिकार दयावे जेणेकरुन मी तुम्हाला विश्वास देवू शकतो की , ही जनता तुमच्या विरोधात कोणतेही षडयंत्र करु शकत नाही . त्यावर त्या राजाने आपल्या प्रधानाला अधिकार दिला व दुस - याच दिवशी त्या राज्याकडे येणारा जाणा - या पुलावर प्रधानाने टॅक्स लावले . तेव्हा त्या राज्यातील जनता 25 / - रुपये टॅक्सचे समर्थन करते व जनता पुलावरुन जातांना व येतांना 25 / - रुपये टॅक्स मुकाटयाने देते व त्यानंतर जनतेमध्ये चर्चा चालु होते की , " आपल्या राजाने काही तरी चांगल्या उद्येशाने टॅक्स लावला असेल , काही प्रश्न विचारण्याची गरज नाही " व त्यानंतर अवघ्या 3 दिवसांमध्ये रक्कम रुपये 25 / - टॅक्स हा रक्कम रुपये 50 / - टॅक्स येणा - या जाणा - या पुलावर जनतेकडून लावला जातो . तेव्हा जनता विचार करते व पुन्हा समर्थन करते की , " आपल्या राजाकडे आता पहिल्या उद्येशापेक्षा जास्त चांगला उद्येश असेल म्हणून तर राजाने टॅक्स वाढविला . त्यामुळे तो टॅक्स आपण भरु " व शेवटी प्रधान त्या राज्याकडे येणा - या , जाणा - या पुलावरुन रक्कम रुपये 75 / - टॅक्स लावतो व जातांना , येतांना लोकांना त्यांच्याच पायामधील जोडे व चपला मारण्याची पध्दत चालु करतो . आता जनता विचार करु लागते की , " राजाने 25 / - रुपयांचा टॅक्स लावला त्याबद्दल हरकत नाही . त्यानंतर राजाने 25 रुपयाचा टॅक्स 50 रुपयामध्ये केला , त्याबद्दलही हरकत नव्हती . परंतु आता टॅक्स 75 / - रुपये दया आणि आपल्याच गालात जोडे , चप्पला मारुन घ्या " . आता जनता विचार करु लागली . त्यामुळे मोठा हादरा तर बसणार नाही ना ? याबाबत राजा प्रधानाला विचारतो . राज्यातील फार मोठी जनता यावेळेस राजाकडे दाद मागण्यासाठी आल्याचे पाहून राजाच घाबरतो व तो प्रधानाला विचारतो तेव्हा प्रधान राजाला सांगतो की , " थांबा महाराज , या लोकांचे काय म्हणणे आहे ते तर ऐकून घ्या " तेव्हा प्रधान राजाला म्हणतो की , " त्यांचे शिष्टमंडळ 10 ते 15 लाकांचेच बोलावावे " त्यावर राजाच्या सांगण्याप्रमाणे जनतेला सांगतो की , " तुम्ही एवढी जनता राजदरबार मध्ये जावू शकत नाही , सुरक्षततेचा प्रश्न आहे , त्यामुळे तुमचे शिष्टमंडळ 10 ते 15 लोकांचे राजदरबारमध्ये येवू शकते " तेव्हा 10 ते 15 माणसे राजदरबारात जातात . त्यापैकी प्रथम एक व्यक्ती म्हणतो की , " महाराज तुम्ही 25 / - रुपये टॅक्स लावला त्याबाबत धन्यवाद महाराज ! धन्यवाद महाराज ! " दुसरा व्यक्ती म्हणतो " महाराज तुम्ही 25 / - रुपये सोडून 50 / - रुपये टॅक्स लावला . त्याबद्दल तुमचे जेवढे मानावे तेवढे आभार आणि धन्यवाद महाराज " व तिसरा व्यक्ती म्हणतो की , " महाराज तुम्ही 25 / रुपये टॅक्स केला तेव्हा आम्हाला काहीएक हरकत नव्हती . तुम्ही महाराज 25 / - रुपयांचे 50 / - रुपये केले त्याबद्दलही काही हरकत नव्हती महाराज . परंतु महाराज तुम्ही लावलेला 75 / रुपयांचा टॅक्स व पुलावरुन जातांना येतांना स्वतःच्या गालात मारण्यासाठी जी पध्दत चालु केली , ती पध्दत चालु केल्याबद्दल जेवढे तुमचे धन्यवाद मानावे तेवढे कमीच आहे महाराज " . परंतु महाराज मला काही अधिकचे सांगायचे आहे की , " महाराज तुम्ही 75 / - रुपये टॅक्स जातांना येतांना घ्या , परंतु महाराज माझी काही तरी सुचना आहे ती सुचनेचा आदर करावा व ती स्विकारावी व ती सुचना स्विकारण्यास मी आपणांस विनंती करतो . त्यावर तो तिसरा व्यक्ती म्हणतो की , " महाराज रुपये 75 / - टॅक्स घ्या , त्यावर तुम्ही चालु केलेली जोडे व चप्पत मारण्याची पध्दत चालु केली ना त्या वर त्या पुलावरुन जातांना व येतांना मारण्यासाठी प्रत्येक जनतेच्या गालात मारण्यासाठी एक माणुस नेमावा जेणेकरुन लोकांना त्रास होणार नाही , स्वतःच्या गालात मारण्याचे दुःख सुध्दा होणार नाही , कारण महाराज आमच्या गालात आम्हाला जोरात मारता येत नाही , त्यामुळेच ही सुचना व विनंती मी आपल्याला करत आहे " व त्या सुचनेचे पालन सुध्दा होते . आणि आज भारत देशामधील जनता ही 24 जुलै 1991 ते 24 जुलै 2021 पर्यंत गालात मारुन घेत होती , आजही मारुन घेण्याची मानसिकता आहे व भविष्यात मारुन घेण्याची मानसिकता दिसत असल्यामुळे हा लेख आपल्या सर्वासमोर मांडण्याचा माझा मानस होता व तो मानस मी चांगल्या प्रकारे मांडत आहे व या कथेचा बोध घ्यावा , कारण आज आपण या कथेतील जनता जशी समर्थन करते तशी आज रोजी भारतातील राहण्या - या लोकांची स्थिती झाली आहे . समर्थन किती करावे व किती करु नये याबद्दल लोकांना बुध्दी 6 आहे . परंतु बुध्दी परंतु बुध्दी प्रमाणे विचार करावयाचा नाही यावर सर्व भारतीयांचे ठाम मत आहे , असे आज रोजी मला वाटते . शेवटी मी प्रथम भारतीय व शेवटी भारतीय या नात्याने व या भारत देशामध्ये जनता ही प्रथम भारतीय व शेवटी भारतीय या नात्याने सांगु इच्छितो की , कृपया मारुन घेण्याची पध्दत बंद करावी , जेणे करुन आपल्या देशाची प्रगती होईल आणि जेव्हा आपण मारुन घेण्याची पध्दत बंद करसाल तेव्हा आपल्या मुलभुत अधिकाराचे खाजगीकरण होणार नाही आणि खाजगीकरण झाले नाही तर संविधानाप्रमाणे आपल्या मुलभुत अधिकाराचे हनन होणार नाही आणि ज्या खाजगीकरणामुळे आपले मुलभुत अधिकार नष्ट होतात त्या खाजगीकरणालाच विरोध करणे प्रथम भारतीय व शेवटी भारतीय या नात्याने आपण सर्व भारतातील जनता कराल तर मुलभुत अधिकाराचे हनन होणार नाही व आपल्याला आपल्या संविधनाप्रमाणे जगण्याचे स्वातंत्र्य सुध्दा मिळेल . त्यामुळे आपण माझ्या या अपेक्षला साजेसे रुप देसाल व वागाला सुध्दा आणि देशाची प्रगती करसाल एवढीच अपेक्षा ठेवतो ..
Very nice.अजूनही जोडे मारून घेणे चालूच आहे.तेव्हा जागर करून शहाणे करून सोडावे सकळ जन आणि जन आंदोलन हाच एकमेव उपाय.
ReplyDelete