Posts

Showing posts from December, 2022

मातंग पँथर सेना चे संस्थापक अध्यक्ष मा भैय्यासाहेब गवळी यांची मातंग समाजातील कांबळे कुटुंबाला भेट

Image
मातंग पँथर सेना चे संस्थापक अध्यक्ष मा भैय्यासाहेब गवळी यांची  मातंग समाजातील कांबळे कुटुंबाला भेट  जालना.- (युगनायक न्युज नेटवर्क ) मातंग पँथर सेना चे संस्थापक अध्यक्ष मा भैय्यासाहेब गवळी यांची मौजे देठणा, ता अंबड ,जिल्हा जालना मधील मातंग समाजातील कांबळे कुंटुबातील लोकांवर जो गावगुंड जातीवादी योगेश धांडे व सहकुटुंब परिवार व अन्य आरोपी यांनी जो हल्ला केला या घटने संदर्भात पीडित कुंटुबाना भेट देऊन मा जालना जिल्हा अधिकारी यांना तक्रारी निवेदन सादर करण्यात आले व मा जिल्हा अधिकारी साहेब यांच्या सोबत घडलेल्या घटने विषयी चर्चा करून या घटनेच गांभीर्य लक्षात आणून दिले व संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली की आरोपींना तात्काळ अटक करून तडीपारी करावी व हा खटला अंडरट्रायल चालवावा असे मा जालना जिल्हा अधिकारी साहेब यांना समक्ष भेटुन चर्चा करण्यात आली तसेच मा जिल्हा अधिकारी साहेब यांनी शब्द दिला की मी sp साहेब यांना तात्काळ कळवतो आणि लवकरात लवकर या प्रकरणात आरोपीवर कायदेशीर कडक कार्यवाही करावी असे मी सांगतो त्यावेळी निवेदन देताना उपस्थित मा भैय्यासाहेब गवळी मातंग पँथर सेना संस्थाप...

भूमिपुत्र ची सोमवार ला महत्त्वपूर्ण बैठकबैठकीला सर्वांनी उपस्थित राहावे.... उत्तमराव आरु यांचे आवाहन

Image
भूमिपुत्र ची सोमवार ला महत्त्वपूर्ण बैठक बैठकीला सर्वांनी उपस्थित राहावे.... उत्तमराव आरु यांचे आवाहन  वाशिम :(युगनायक न्युज नेटवर्क ) भूमिपुत्र शेतकरी संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक सोमवार दिनांक 19 डिसेंबर ला दुपारी 1 वाजता भूमिपुत्र मध्यवर्ती कार्यालय अकोला नाक, शिवनेरी बिल्डिंग येथे आयोजित करण्यात आली आहे.        1 जानेवारीला  भूमिपुत्र चा वर्धापन दिना आसतो. वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे. भूमिपुत्रच्या वार्षिक दिनदर्शिकेची छपाई संदर्भात चर्चा करणे. नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र  देणे. राज्यातील शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी मोफत वीज पुरवठ्या संदर्भात जनजागृती व अंदोलनाची दिशा ठरविणे, महाराष्ट्रातुन पीक विमा योजना हद्दपार करणे किंवा धोरणात्मक बदल करणे संदर्भात कार्यवाही करणे इत्यादीं बाबींवर बैठकीत चर्चा करून निर्णय घेतले जाणार आहेत. बैठकीला संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांचसह जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार, डाॅ.जितेंद्र गवळी,  देव इंगोले, संतोष सुर्वे, सचिन काकडे, श्रीरंग नागरे, भुषण मुराळे, विनोद घुगे हे उपस्थित रा...

वंचित बहुजन आघाडी वाशिम जिल्ह्याच्या वतीने चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून केला निषेध.

Image
वंचित बहुजन आघाडी वाशिम जिल्ह्याच्या वतीने चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून केला निषेध. रिसोड - तौसीफ शेख(प्रतिनिधी ) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले या महापुरुषांचा अवमान करणाऱ्या भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना तात्काळ अटक करून त्यांना मंत्री पदावरून हाटवण्यात यावे, या मागणीसाठी वाशीम जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ प्रदेश सदस्या किरणताई गिर्हे, पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ देवळे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष गजानन हुले यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी  चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून त्यांच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला. मंत्री चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळ मधून बरखास्त करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करू अटक करण्यात यावी अशी मागणी सर्व वंचित बहुजन आघाडी वाशिम च्या वतीने करण्यात आली. त्या नंतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन मा जिल्हाधिकारी वाशिम यांना चंद्रकांत पाटील यांच्यावर...

दिव्यात मा.नगरसेविका सौ.दर्शना चरणदास म्हात्रे यांच्या सहकार्याने भव्य लोन मेळावा आयोजित....

Image
दिव्यात मा.नगरसेविका सौ.दर्शना चरणदास म्हात्रे यांच्या सहकार्याने भव्य लोन मेळावा आयोजित.... अमित जाधव - प्रतिनिधी  दिव्यात गणेश नगर येथे बाळासाहेबांची शिवसेना आयोजित मा.नगरसेविका सौ.दर्शना चरणदास म्हात्रे यांच्या सहकार्याने  गणेश पाडा येथे पंतप्रधान पाठविक्रेता आत्मनिर्भर निधी शिबीर नागरिकानसाठी आयोजित करण्यात आले होते   पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी पथविक्रेत्यांसाठी विशेष पतपुरवठा सुविधा योजनेची अंमलबजावणी ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात करण्यात येत आहे. कोविड-19 च्या अनुषंगाने झालेल्या टाळेबंदीमुळे पथविक्रेत्यांच्या उपजिविकेवर विपरित परिणाम झालेला होता. शहरातील पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा उभा करता यावा यासाठी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी अंतर्गत पथविक्रेत्यांना बँकेकडून रु.10 हजार रक्कमेचे खेळते भांडवली कर्ज देण्यात येत आहे. यामध्ये पथविक्रेत्यांनी प्रथम टप्प्यात रु.10 हजार कर्ज रक्कमेची नियमित परतफेड केल्यास व्दितीय टप्प्यात रु.20 हजार भांडवली कर्ज देण्यात येते आणि रु 20 हजार कर्जाची नियमित परतफेड केल्यास तृतीय टप्प्यात रु....

दिव्यात आर पी एफ महिला पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी,गरोदर महिलेला वेळेत रुग्णालयात केलं दाखल...

Image
दिव्यात आर पी एफ महिला पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी,गरोदर महिलेला वेळेत रुग्णालयात केलं दाखल... अमित जाधव - प्रतिनिधी  दिवा स्टेशन परिसरात गरोदर म्हीललेला प्रचंड त्रास होत असल्याची माहिती आरपीएफ दिवा पोलिसांना मिळताच बीटवर तैनात LSIPF पिंकी यादव आणि LCT ममता JAT यांनी LCT अश्विनी, LCT रुशाली आणि ड्युटी पॉइंट्स सोबत त्या गरोदर असलेल्या महिलेला जवळच्या रुग्णालयात हजर केले. महिलेसोबत आणखी एक महिला तेथे उपस्थित होती, प्रसूती वेदना होत असल्याने महिला प्लॅटफॉर्म पीएफ क्रमांकावर पोहोचली. एक व दोन वरून व्हील चेअरवर बसून हॉस्पिटलसाठी घेऊन गेल्या गेटच्या पूर्वेकडील बूम उघडल्यानंतर लगेचच हॉस्पिटलकडे निघाल्यावर महिलेला तीव्र वेदना होऊ लागल्या आणि प्रसूती होण्याची शक्यता असल्यास, सर्व कर्मचाऱ्यांसोबत महिलाही होत्या.महिलांच्या विनयशीलतेची काळजी घेत ऑटो चारी बाजूंनी झाकून ठेवली होती. त्यानंतर लगेचच महिलेची नॉर्मल प्रसूती झाली. दरम्यान, महिला व बालकाला मुंब्रादेवी हॉस्पिटल दिवा येथे नेण्यात आले. जिथे महिला आणि बालक दोघांचीही डॉक्टरांनी तपासणी केली असता, दोघेही प्रकृतीत निरोगी असल्य...

ठाण्याचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी रस्त्यांची दखल घेत लवकरच रस्ते रुंदीकरण व नवीन रस्त्यांची कामे सुरू..... लवकरच म्हसोबानगर,रविना बिल्डींग आणि दातिवली ते म्हातार्डी चौक रस्ते मार्गी लागणार

Image
ठाण्याचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी रस्त्यांची दखल घेत लवकरच रस्ते रुंदीकरण व नवीन रस्त्यांची कामे सुरू..... लवकरच म्हसोबानगर,रविना बिल्डींग आणि दातिवली ते म्हातार्डी चौक रस्ते मार्गी लागणार अमित जाधव - प्रतिनिधी  दिवा (प्रतिनिधी) दातिवली परिसरातील दिवा-आगासन रोड ते म्हसोबा नगर, आगासन रोड -रविना बिल्डींग आणि दातिवली ते म्हातार्डी चौक पुढे डोंबिवली मानपाडाकडे जाणाऱ्या रस्त्यांचे बांधकाम लवकरच होणार असून सबंधित रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांनी याबाबत सहमती दर्शविली आहे.याबाबत तिनही ठिकाणी ठाण्याचे माजी उपमहापौर आणि मा.नगरसेवक श्री रमाकांत मढवी यांनी रविवारी भेट देवून पाहणी केली आहे.शेतकऱ्यांनी सहमती दर्शविलेल्या या रस्त्यांमुळे येथील जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दातिवली परिसरातील बेडेकरनगर येथील दिवा आगासन रोड ते म्हसोबा नगर या ठिकाणी कच्चा रस्ता आहे.येथील रस्त्यावर गटाराचे साम्राज्य असल्याने लोकांना येजा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.पावसाळ्यात या ठिकाणी तलावसदृश्य परिस्थिती निर्माण होत असून नागरिक हैराण होत आहेत.या रस्त्याचे काम व्हावे अशी येथील नागरिकांची मा...

वंचित बहुजन आघाडी वाशिम जिल्हा आढावा बैठक संपन्न.

Image
वंचित बहुजन आघाडी वाशिम जिल्हा आढावा बैठक संपन्न. वाशिम: (युगनायक न्युज नेटवर्क)वाशिम येथील केमिस्ट भवन लाखाळा  येथे डॉ गजानन हुले जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली  आणि मा. अरुंधतीताई सिरसाट वाशिम जिल्हा प्रभारी यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये वाशिम जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात आली. सदर बैठक महिला आघाडी किरणताई गिर्हे, पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉ सिद्धार्थ देवळे, जिल्हा महासचिव सोनाजी इंगळे, जिल्हाध्यक्ष महिला आघाडी सौ ज्योतीताई इंगळे, महासचिव सौ सुशीलताई खाडे, प्रतिभाताई अंभोरे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अनिल गरकल, जिल्हा मार्गदर्शक दत्तराव गोटे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा रंगनाथ धांडे, समाधान भगत, डॉ रवी मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.        आढावा बैठकी मध्ये वाशिम जिल्ह्यातील होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूक ही वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली घेण्यात याव्या असे आदेश मा श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आहेत. त्यानुसार सर्व पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी आदेशाचे पालन करून ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरे जावे अस्या सूचना मा अरुंधतीताई सिर...

सरपंचाने खरंच गावाचा विकास केला का..? निधी, विकासकामांची माहिती ‘येथे’ मिळणार…!!

Image
सरपंचाने खरंच गावाचा विकास केला का..? निधी, विकासकामांची माहिती ‘येथे’ मिळणार…!! सध्या वाशिम जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. निवडणूक जवळ आली, की इच्छूक उमेदवार आश्वासने देत सुटतात. दुसरीकडे आपल्या काळात किती विकासकामे केली, याची आकडेवारी सत्ताधारी मतदारांसमोर सादर करतात. त्यातून नेमकं कोणाचं खरं, हे समजत नसल्याने मतदारांचाही गोंधळ उडतो. सरपंचांनी कोणता निधी कुठे आणि कशावर खर्च केला, गावातील ज्या कामासाठी निधी खर्च केला, त्याची खरंच गरज होती का, त्यातून सरपंच व सदस्यांनी केलेल्या विकासकामांवर शंका उपस्थित होते. मात्र, आता तुम्हाला ही सारी माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. त्याद्वारे ग्रामपंचायतीने खरंच किती विकास केला, हे जाणून घेता येणार आहे.. सरपंचांनी गावाच्या विकासासाठी खरंच काम केलंय की नाही, याचा माहिती घरबसल्या जाणून घेता येते. त्यासाठी नेमकं काय करायला हवं, हे जाणून घेऊ या… अशी जाणून घ्या माहिती.. – सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवरून ‘ई-ग्राम स्वराज’ हे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच पुढील वेबसाईटवरूनही माहिती घेऊ शकता – https://egramswaraj.gov.in/financialP...